आयुर्वेद अध्यापकांसाठी ‘स्मार्ट (SMART) 2.0’ कार्यक्रमाची सुरुवात
आयुर्वेद अध्यापकांसाठी ‘स्मार्ट (SMART) 2.0’ कार्यक्रमाची सुरुवात
(कृषी न्यूज PIB ): केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (सीसीआरएएस) आणि भारतीय औषध प्रणालीसाठीचा राष्ट्रीय आयोग (एनसीआयएसएम) यांनी एकत्र येऊन, ‘स्मार्ट (SMART) 2.0’ म्हणजेच स्कोप फॉर मेनस्ट्रीमिंग आयुर्वेद रिसर्च अमंग टीचिंग प्रोफेशनल्स (अध्यापन व्यावसायिकांमध्ये आयुर्वेद संशोधनाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी) हा कार्यक्रम सुरू केला आहे. देशभरातील आयुर्वेद प्रशिक्षण संस्था/रुग्णालयांच्या परस्पर सहयोगाने, आयुर्वेदाच्या प्रमुख क्षेत्रांमधील वैद्यकीय शिक्षणाला चालना देणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे.
बाल कासा, कुपोषण, अपुरे स्तनपान, गर्भाशयातून अती रक्तस्त्राव, महिलांमधील रजोनिवृत्तीनंतरचा ऑस्टिओपोरोसिस आणि मधुमेह (डीएम) II या प्राथमिक संशोधन क्षेत्रांमधील सुरक्षितता, सहनशीलता आणि आयुर्वेद सूत्रांचे पालन हे या अभ्यासाचे उद्दिष्ट असल्याचे सीसीआरएएस चे डीजी, प्रा. (व्हीडी) रबीनारायण आचार्य यांनी सांगितले.
सीसीआरएएस ही आयुर्वेदातील वैज्ञानिक आधारावरील संशोधनाची निर्मिती, समन्वय, विकास आणि प्रोत्साहनाला चालना देणारी सर्वोच्च संस्था असून, ही संस्था आयुष मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. आंतरविद्याशाखीय संशोधन पद्धती वापरून आयुर्वेदिक उपचारांची परिणामकारकता आणि सुरक्षितता प्रदर्शित करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये त्याचा उपयोग करण्यासाठी ठोस पुरावे निर्माण करणे, हे ‘स्मार्ट 2.0’ कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. ‘स्मार्ट 1.0’ अंतर्गत, 38 महाविद्यालयांमधील अध्यापन व्यावसायिकांच्या सक्रिय सहभागाने सुमारे 10 रोगांवर काम करण्यात आले.
‘स्मार्ट (SMART) 2.0’ कार्यक्रमा अंतर्गत सहयोगी संशोधन उपक्रम राबवण्यासाठी उत्सुक आयुर्वेद शिक्षण संस्थांनी, सीसीआरएएस वर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यामध्ये ‘सहयोगासाठीचा’ आपला अर्ज दाखल करावा.
वेबसाईट http://ccras.nic.in/sites/default/files/Notices/02012024_SMART.pdf माहिती अथवा प्रश्न 10 जानेवारी रोजी किंवा त्यापूर्वी ccrassmart2.0[at]gmail[dot]com या ईमेलवर आणि त्याची एक प्रत President.boa@ncismindia.org येथे पाठवावी.