सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी, मेंदूचे विकार का होतात, जाणून घ्या हा त्रास कशाने होतो…

0

सद्गुरुंवर मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.डोक्याला सूज आणि ब्लिडींगमुळे ब्रेन सर्जरी करावी लागली. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात ही सर्जरी पार पडली न्युरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या हवाल्याने सांगण्यात आले. गेल्या ४ आठवड्यांपासून सद्गुरुंना तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मेंदूला सूज आली होती आणि ती प्राणघातकही ठरू शकते. ही गंभीर स्थिती लक्षात आल्यानंतर सद्गुरूंवर मेंदूची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्गुगुरूंची तब्येत आता पूर्णपणे ठीक असून हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

मेंदूला सूज आणि ब्लिडींग का होते? (Causes of Brain Disease)

मेडीकल टु डे च्या रिपोर्टनार मेंदूला सूज आणि ब्लिडींग होणं ही एक गंभीर स्थिती आहे. ज्याला इंट्राक्रायनियल हॅमरेज असंही म्हटलं जातं. ही स्थिती अशावेळी उद्भवते जेव्हा शरीरात तरल पदार्थ वाढतात आणि मेंदूच्या नसा फुटतात. मेंदूला सूज येणं आणि ब्लिडींगची अनेक कारणं असू शकतात. ज्यात हाय ब्लड प्रेशर, डोकेदुखी, रक्ताच्या गुठळ्या तयार होणं, ब्रेन ट्युमर यांचा समावेश आहे. जखम होणं, स्ट्रोक, सबड्युरल हेमेटोमा, एपिड्युरल हेपेटोमा यांमुळे मेंदूचे त्रास उद्भवतात.

लक्षणे

मेंदूसूजेमध्ये खूप ताप, डोकेदुखी, उलटया, झटके, अतिझोप, चिडचिडेपणा.

क्षयरोगाच्या मेंदूसूजेच्या प्रकारात ही लक्षणे सौम्य असतात. ताप त्या मानाने कमी असतो. यात डोकेदुखी, उलटया कमी प्रमाणात असतात व वागण्या-बोलण्यातला फरक एक-दोन आठवडयांत दिसायला लागतो.मेंदूला सूज येणं, ब्लिडींग, डोकेदुखी, कमकुवतपणा, चक्कर येणं, बोलायला त्रास होणं, उलट्या, सुस्ती येणं, कंन्फ्यूजन, अशा अशी लक्षणं उद्भवतात.

उपाय (Brain Disease Solution)

या वैद्यकिय स्थितीचे मूळ उपचार म्हणजे ब्लिडींग रोखणं, डोक्याची सूज कमी करणं आणि मेंदूच्या डॅमेज भागांना होणारं नुकसान कमी करणं हे आहे. औषधं आणि सर्जरी या दोघांच्या कॉम्बिनेशन्सने उपचार करता येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »