Nashik Crime : कत्तलीसाठी आणलेल्या दोन गायींची सुटका..

0

भद्रकालीतील बागवान पुऱ्यात कत्तलीसाठी गायी आणल्या असता, दबा धरून असलेल्या शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने एकाला अटक केली. दोन गायींची सुटका केली असून वाहनांसह सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सद्दाम अन्वर पाटकरी (३३, रा. जोगवाडा, मुलतानपुरा, भद्रकाली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे अंमलदार रमेश कोळी यांना बागवान पुऱ्यातील बिरबल आखाड्यात जिवंत गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी आणण्यात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, काल (ता.२०) बुधवारी पहाटेच्या सुमारास बागवानपुऱ्यात सापळा रचला होता. पहाटेच्या सुमारास संशयित सद्दाम पाटकरी हा दोन जिवंत गायी कत्तलीच्या उद्देशाने घेऊन आला. त्यावेळी दबा धरून असलेल्या पथकाने त्यास ताब्यात घेत टेम्पोसह गायी जप्त केल्या आहेत.

ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक गजानन इंगळे व त्यांच्या टीमने केली.याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »