रेडगाव खुर्द च्या शेतकरी पुत्राची महीला व बाल विकास अधिकारी पदाला गवसणी

0

रेडगाव खुर्द च्या शेतकरी पुत्राची महीला व बाल विकास अधिकारी पदाला गवसणी

काजीसांगव (दशरथ ठोंबरे) —: नेहमी दुष्काळग्रस्त चा टिळा लागलेल्या तालुक्यातील शेती आजही पूर्णपणे निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असून जानेवारी उजाडताच विहीरी तळ दाखवतात, पर्जन्याच्या लहरीपणाचे हिंदोळे त्यात कधीतरी हसवणारा लाल कांदा हे नगदी पीक अन् त्यावरच कुटूंबाची गुजरान अशाही विपरीत परिस्थितीत खंबीरपणे उभे राहून मुलाला लढ म्हणुन बळ देणा-या रेडगावखुर्द येथील अल्पभुधारक शेतकरी बापाच्या मुलाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जिल्हा महीला व बाल विकास अधिकारी पदाला गवसणी घालुन आई वडीलांच्या घामाच चिज केले आहे. एकेकाळी आदर्श गावाचा लौकीक लाभलेल व स्वामी यादव महाराजांच्या कर्मफळाने वारकरी सांप्रादयात चागले लौकीक असलेले गाव म्हणजे रेडगाव खुर्द परंतु दुष्काळाच्या झळा मात्र नेहमीच्याच. अशाही परिस्थितीत हार न मानता अल्पभुधारक शेतकरी उत्तम सावळीराम काळे यांनी इतरां प्रमाणे निसर्गाचे हिंदोळे घेत चार मुलींचे लग्न करुन मुलाला अधिकारी होण्यासाठी बळ देण्यासाठी खंबीर राहीले. कबाड कष्ट करणारे उत्तमरावची शेतीशी नाळ जोडली ती 76वर्षात पण कायम आहे. वडील उत्तम काळे यांचे 5वी तर आई ताराबाईंचे 4थी शिक्षण झालेल्या मातापित्यांचा रुषिकेश हा सुरवातीपासुनच हुशार, त्याचे प्राथमिक शिक्षण रेडगाव खुर्द येथील जि. प. शाळेत तर माध्यमिक शिक्षण काजीसांगवीच्या जनता विद्यालयात व लासवगावच्या लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात झाले. पुढे 12वी नंतर के. के. वाघ येथे इंजिनियरींगचे शिक्षण पुर्ण केले.कसे बसे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या आई ताराबाई त काही तरी वेगळ करायची धग होती. परंतु उच्च शिक्षणासाठी व अभ्यासासाठी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जायच म्हणजे आर्थिक तजविज महत्वाची. त्यात घरची परिस्थिती हलक्याची असल्याने ते शक्य नाही . मंग रुषिकेशने खाजगी नोकरीचा करण्याचा निर्णय घेतला चार वर्ष खाजगी नोकरी करुन पुढील शिक्षणासाठी व अभ्यासासाठी पुण्याकडे प्रयाण केले. जिद्द चिकाटी कठोर परिश्रम ,या तपस्ये दरम्यान सुरवातील थोडक्यात यशाने हुलकावणी दिली.मध्येच कोरोना आला. बरोबरचे मुल स्थिर स्थावर झाले.कुटूंबाला व थेट देखील विचारणा व्हायची अजुन किती दिवस परंतु हे सर्व कडु गोड घोट पचवुन 2022च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत 133 वा क्रमांक मिळवुन रुषिकेश उत्तम काळे याने सहाय्यक आयुक्त तथा जिल्हा महीला व बालविकास अधिकारी पदाला गवसणी घालुन आई वडीलांच्या घामाचे चिज करुन दाखवले. हार मानायची नाही म्हणत लढण्याच बळ देणारांचा विश्वास सार्थ केला. रेडगावसह परिसरीतील एमपीएससी मार्फत थेट वर्ग एक चे अधिकारी पद मिळवणारा रुषिकेश पहीला ठरला आहे. रेडगावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा ऱोवला आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. प्रतिक्रया:-* पहिल्यापासून प्राथमिक शिक्षकांचे मिळणारे मार्गदर्शन मोलाचे ठरले व घरच्या हालाक्याचे परिस्थितीत वर मात करत जिद्द आणि चिकाटी ठेवून अभ्यास केला या सर्व गोष्टींमुळे यश संपादन करता आले.यात आई-वडिलांचा खारीचा वाटा आहे :– रुषिकेश काळे, ( महीला, बाल विकास अधिकारी) ** नेहमी दुष्काळ परिस्थिती त्यात निसर्ग च्या पाण्यावर शेती व्यवसाय अवलबुन असताना कबाड कष्ट करून त्यातून मिळणारी तुटकुंजी रक्कम त्यावर घर गाडा व मुलांच्या शिक्षणा खर्च याचे नियोजन करून मुलांचे शिक्षण केले मुलाने परिस्थितीवर मात करून अधिकारी पदावर गवसणी घातल्याने अभिमान वाटतो आमच्या कष्टाच चिज झाल. :-उत्तम काळे (वडील शेतकरी) **लहान पणापासुन रुषिकेश हुशार होता. त्याने अधिकारी होऊन एक दिवस माझ्या खुर्चित बसाव अस इच्छा होती. माझा विद्यार्थी वर्ग एक अधिकारी झाला याचा खुप आनंद व अभिमान वाटतो. नोकरी केल्याच समाधान वाटते. सयाजी ठाकरे प्राथमिक शिक्षक फोटो- एमपीएससी च्या यशा नंतर रुषिकेशला पेढा भरुन आनंद साजरा करतांना प्राथमिक शिक्षक सयाजी ठाकरे समवेत आई वडील..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »