उर्धुळ ला टॅंकर द्वारे किंवा 44गाव योजनेचे पाणी वेळेवर मिळावे म्हणून निवेदन
उर्धुळ गावाला टॅंकर द्वारे किंवा 44गाव योजनेचे पाणी वेळेवर मिळावे चे निवेदन सरपंच सौ कविता ठाकरे यांनी दिले संबंधित विभागला
दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे . उर्धुळ ता, चांदवड ग्रामपंचायतने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल विभाग क्रमांक तीन अंतर्गत 44 गाव नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत तरी या विभागाचा भोंगळ कारभारामुळे ही योजना चांदवड तालुक्यात पूर्व भागासाठी कागदावरच आहे त्यामुळे आपल्या चांदवड तालुक्यातील भौगोलिक विचार केला तर माहे डिसेंबर ते जानेवारीच्या जवळपास आपले स्थानिक जलसोत्र जेमतेम असते तरी पुढील चार ते पाच महिने तालुक्यात पाण्याची टंचाई असते तरी या योजनेचे पाणी दहा ते वीस दिवसांनी किंवा महिना पण जातो तरी पाणी येत नसल्याने स्थानिक ग्रामपंचायतीला पाणीपट्टी वसुलीत अडचण निर्माण होते तरी या विभागाकडून पाण्याच्या बिलाच्या वसुली करता तगादा कायम असतो या विभागाने चांदवडच्या पश्चिम पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या नावाखाली शेतीसाठी नळ कनेक्शन दिलेले आहेत तरी याची चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा असे निवेदन उर्धुळ ग्रामपंचायत च्या सरपंच सौ कविता श्रीहरी ठाकरे यांनी संबंधित विभागाला दिले आहे आमच्या गावाला टँकर द्वारे पाणीपुरवठा करावा किंवा योजनेचे पाणी वेळेवर सुरळीत करावा आजची मागणी उपविभागीय प्रांत कार्यालय चांदवड व गट विकास अधिकारी चांदवड तसेच तहसीलदार कार्यालय चांदवड यांना देण्यात आले आहेत यात राजाराम ठाकरे शरद ठाकरे मधुकर ठाकरे पांडुरंग खुटे गणपत नवले अशोक ठाकरे बाळू ठाकरे प्रभाकर ठाकरे रामदास ठाकरे रंगनाथ खुटे बाळासाहेब ठाकरे खंडू खुटे काशिनाथ खुटे रमणखुटे दगुखुटेमाधवखुटे बंडू ठाकरे गणेश सोनवणे रामदास ठाकरे शरद ठाकरे नितीन कुठे कमलाकर ठाकरे देविदास ठाकरे भाऊराव ठाकरे नितीन ठाकरे देविदास नवले किसन खुटे भाऊसाहेब खुटे भिकाजी खुटे सचिन खुटे अनिता पवार किसनराव खुटे आदि ग्रामस्थांच्या सह्या आहे