शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता..

0

पंतप्रधान किसान निधी योजनेचा 16 वा हफ्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता.लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हफ्ता  खात्यात जमा होणार.योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये लाभ मिळतो. शेतकऱ्यांना आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे.लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पंतप्रधान निधी योजनेचा 16 वा हफ्ता फेब्रुवारी महिन्यात जमा झाला होता, त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा पुढील 17 वा हफ्ता त्याच्या चार महिन्यानंतर म्हणजेच जून किंवा जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता जून किंवा जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे.पीएम किसान योजनेच्या सतराव्या हफ्त्याचे लाभार्थी होण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना जमिनीच्या नोंदी करणेही आवश्यक आहे.

जमिनीच्या नोंदींच्या पडताळणीसाठी, जमिनीची कागदपत्रे अपलोड करा आणि त्यांची पडताळणी करा. शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. याबाबतची सविस्तर माहिती pmkisan.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. याशिवाय, तुम्ही पीएम किसान ॲपद्वारे सहजपणे ई-केवायसी देखील करू शकता.

याशिवाय, तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी करू शकता.असे असूनही, शेतकरी बांधवांना काही समस्या आल्यास ते पीएम किसान हेल्पलाइन क्रमांकावरही मदत घेऊ शकतात. शेतकरी बांधव 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »