पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी केंद्र सरकार देणार 50 टक्क्यांच्या सबसिडीसह 50 लाखापर्यंत कर्ज ; जाणून घ्या अर्ज कसा करायचा..

0

राज्यात कुकुट पालन योजनेचा मुख्य उद्देश राज्यात कुकुट पालन उद्योगाला चालना देऊन युवकांना पशु पालनासाठी प्रोत्साहित करणे आहे जेणेकरून युवक स्वतःचा उद्योग सुरु करून राज्यातील बेरोजगारी कमी होईल.पोल्ट्री फार्म विकसित करण्यासाठी सरकारकडून 50 लाखांपर्यंत कर्ज दिले  जाणार असून यावर 50 टक्के सबसिडी मिळणार आहे.उदाहरणार्थ जर तुम्ही 50 लाखाचे कर्ज घेतले तर तुम्हाला 25 लाख परत करावे लागतील. पण हे पैसे त्या संबधित बँकेत दोन हफ्त्यांत जमा करावे लागतील.योजनेसाठी कोणतीही राष्ट्रीयकृत बँक कर्ज देते.

अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावयासाठी सरकारने खास राष्ट्रीय पाळीव पशू मिशन पोर्टल (नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन पोर्टल) काढले आहे.कर्ज घेणाऱ्याच्या नावावर कमीत कमी एक एकर शेतजमीन असावी.

कोणते आवश्यक कागदपत्रे लागतात?
१.सविस्तर प्रकल्प अहवाल
२.आधार कार्ड
३.जिथे पोल्ट्री फार्म उभे करायचे आहे त्या जागेचे फोटो
४.जमिनीची कागदपत्र
५.पॅन कार्ड
६.मतदान ओळखपत्र
७.ज्या बँकेतून कर्ज घ्यायचं आहे त्या बँकेत असलेल्या तुमच्या ८.खात्याचे दोन कॅन्सल चेक
९.रहिवासी दाखला
१०.आवश्यक फॉर्म
११.जात प्रमाणपत्र (गरजेचे असल्यास)
१२.कौशल्य प्रमाणपत्र
१३.स्कॅन सही

तुम्ही लॉगिन करण्याचा प्रयत्न केल्यावर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. आपली सगळी कागदपत्रं नीट असावीत ही काळजी घ्यावी.तुम्हाला नेमक्या किती कोंबड्या पाळायच्या आहेत,त्यांच्या पालनासाठी किती खर्च येणार, ही सगळी माहिती खरी असावी.पडताळणी दरम्यान कोणतीही माहिती खोटी किंवा संशयास्पद आढळली तर अर्ज रद्द होऊ शकतो.ही योजना राबवण्यासाठी राज्य सरकारची नोडल एजन्सी असणार आहे. ऑनलाईन जरी अर्ज केल्यानंतरही तुमचे अर्ज याच एजन्सीव्दारे बँकांपर्यंत पोहचवले जातील.

अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्याला संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »