Irrigation Management : स्मार्ट सिंचन नियोजन कसे असावे? त्यांची सुधारित प्रणाली कशी असावी?

0
smart Irrigation Management

Irrigation Management : स्मार्ट सिंचन नियोजन कसे असावे? त्यांची सुधारित प्रणाली कशी असावी?

स्मार्ट फुले इरिगेशन शेड्यूलर प्रणाली ही प्रत्यक्ष वेळेनुसार (Real Time) स्थान व वेळ परत्वे बदलत जाणारे सिंचन प्रभावित करणारे घटक गृहीत धरून काटेकोर व कार्यक्षम सिंचन व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे. यामध्ये संपूर्ण शेत जमिनीमधील वेगवेगळ्या भागांमध्ये असलेल्या पीक आणि सिंचन प्रणालीनुसार कार्यान्वित करता येते.
या प्रणालीद्वारे विशिष्ट पिकाला त्याच्या नियमित सिंचन पद्धती (प्रवाही, तुषार किंवा ठिबक) द्वारे प्रत्यक्ष परिस्थितीनुसार (Real time) स्थान व वेळपरत्वे बदलत जाणारे किंवा सिंचनाला प्रभावित करणारे सर्व घटक (हवामान, पीक व पिकाच्या वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, सिंचन पद्धत, सिंचन प्रणालीची वैशिष्ट्ये इ.) मिळवून किंवा गृहीत धरून पिकास पाणी किती आणि केव्हा द्यावे हे निश्चित केले जाते.
त्याप्रमाणे सिंचन प्रणालीला दूरस्थ पद्धतीने किंवा स्वयंचलितपणे सूचना दिल्या जातात. ती यंत्रणा योग्य वेळेवर चालू होते आणि ठरलेले सिंचन पूर्ण होताच बंद होते. त्यामुळे ‘ॲटो फुले इरिगेशन शेड्यूलर’ ही प्रणाली जेव्हा संपूर्ण शेतासाठी एकाच वेळी (किंवा एकाच वेळापत्रकाप्रमाणे) सिंचन द्यावयाचे असते तेव्हा उपयुक्त ठरते.
म्हणजेच शेतामध्ये किंवा उपलब्ध पाण्याच्या स्रोतावरून पंपाद्वारे जेव्हा एकावेळी एकाच पिकास सिंचन द्यावयाचे आहे, त्या वेळी उपयुक्त ठरते. साधारणतः जेव्हा शेतीचे क्षेत्र लहान आहे, जमिनीचा प्रकार सारखा आहे, एकाच प्रकारचे व साधारणतः एकाच वेळी पेरणी केलेली पीक एकाच प्रकारच्या सिंचन पद्धतीद्वारे भिजवायचे आहे अशा परिस्थितीमध्ये ते उपयुक्त ठरते असे म्हणता येईल.
मात्र प्रत्यक्षामध्ये शेतासह वरील बाबींमध्ये असा सारखेपणा उपलब्ध असेलच असे नाही. एकाच प्रकारच्या जमिनीमध्ये अनेक पिके असू शकतात, त्यांची लागवडीची वेळ वेगवेगळी असू शकते. त्यानुसार अशा पिकांच्या सिंचनाचे वेळापत्रकही बदलत असते.
उदा. १. शेतजमीन जरी एकाच प्रकारची असेल तरी एका वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या पिकास सिंचन देणे :
– अशा वेळी पिकाच्या प्रकाराप्रमाणे सिंचन वेळापत्रक वेगवेगळे असते.
२. संपूर्ण शेत जमिनीवर जरी एकाच प्रकारचे पीक घेतले असले तरी जर जमीन वेगवेगळ्या प्रकारची असेल तेव्हा :
– जमिनीच्या प्रकाराप्रमाणे पिकास पाणी केव्हा देणे बदलत असते.
३. शेत जमीन व पीक जरी सारखेच असले तरी त्यातील पिकाची लागवड वेगवेगळ्या केली असेल :
– अशा वेळी सिंचन प्रभावित करणारे हवामानाचे घटक बदलत असल्याने वेगवेगळ्या वेळी लागवड केलेल्या त्याच पिकाचे सिंचन वेळापत्रक वेगवेगळे असते.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »