करंजी येथे जाग्या झाल्या होळकर शाही पाऊलखुणा

0

करंजी येथे जाग्या झाल्या होळकर शाही पाऊलखुणा.. 🚩🚩

कैलास सोनवणे (निफाड )करंजी येथे द्वितीय तुकोजीराव होळकर यांचा जन्मोत्सव सोहळा आनंदात पार पडला प्रसंगी धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक या टीमकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये तुकेश्वर मंदिराचा अभिषेक नानासाहेब होळकर( सहपत्नीक )वंशज होळकर घराणे यांच्या हातून पार पडला , शस्त्र सलामी तसेच व्याख्यान अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे निमित्ताने रामदास काळे यांच्या व्याख्यानामध्ये रामदास काळे यांनी करंजीचा इतिहास सांगताना मल्हार होळकर यांचे पंजोबा ते द्वितीय तुकोजीराव होळकर यांचे आई वडील यांच्यापर्यंतचा संपूर्ण वंशावळीचा इतिहास करंजीकरांना उकडून सांगितला त्याचप्रमाणे द्वितीय तुजराव होळकर यांनी केलेली समाज उपयोगी कामे इंजिनिअरिंग कॉलेज दवाखाने लोकांच्या सोयीसाठी केलेली कामे त्याचप्रमाणे कापड मिल रेल्वेची निर्मिती किंवा इंग्रजांना साडेचार टक्के दराने दिलेले कोटी रुपये या सर्व गोष्टी सांगण्यात आल्या त्याचप्रमाणे द्वितीय तू गुजरात होळकर यांच्या 51 वर्षे निधन झाल्यानंतर द्वितीय तुकोजीराव होळकर यांची पुत्र शिवाजीराव होळकर यांच्या कार्यकाळामध्ये करंजी गावाचा इतिहास शोधून या गावाचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे करंजी गावातून दरवर्षी जेजुरी देवस्थान या ठिकाणी खंडेराव महाराजांची पालखी जात असते आणि या पालखीचा मान त्या ठिकाणी जेजुरी या ठिकाणी होत असतो हा ही प्रसंग व्याख्या त्यांनी उलगडून सांगितला त्याचप्रमाणे भाऊ गंधारे भाऊ होळकर यांचाही परिचय करंजीकरांना करून दिला करंजीकरांच्या गावातून एक भारतातील प्रसिद्ध राजा जन्माला आला आणि करंजीच्या गल्लीबोळांमध्ये वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत खेळत बागडत मोठा झाला आणि त्यानंतर इंदूरचा राजा म्हणून त्याने इंदूरच्या प्रजेचे कल्याण केलं अशा लोक उपयोगी राजाला जन्म देणार करंजी गाव आहे असं व्याख्या त्यांनी या निमित्ताने सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक येथे संस्थापक अध्यक्ष समाधान जी बागल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यात करंजी येथील मंदिराची डागडुजी, करणे धर्मशाळा यांची दुरुस्ती करणे कमी माहिती दिली त्याचप्रमाणे श्याम गोसावी यांनी अनुमोदन देण्याचे काम केले व्याख्याते रामदास काळे यांनी व्याख्यानातून इतिहासाची जागृती करून गावचे इतिहासावर प्रकाश टाकला त्याचप्रमाणे सामाजिक नेते मच्छिंद्र व बिडकर यांनी आपल्या पूर्व अनुभवाच्या गोष्टी सांगून करंजीकरांचे आभार मानले कार्यक्रम प्रसंगी होळकर यांच्यातील फणसे घराण्याचे वंशज नानासाहेब होळकर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते प्रमुख उपस्थिती म्हणून श्री मच्छिंद्र भाऊ बिडगर, मुकुंद राजे होळकर विनायक जी काळदाते देशाची सेवा करणारेसैनिक दीपक भाऊ ठोंबरे, पंडित सोनवणे पीआय मुंबई भाऊसाहेब रजोळे सरदार घराणे वंशज सुरळीकर सर, व नवीन भाई पठाण हे सरदार घराण्याचीवंशज कार्यक्रमाला हजर होते प्रसंगी कार्यक्रमाला शेकडो ग्रामस्थांनी उपस्थिती लावली आणि सर्वांच्या उपस्थित हा कार्यक्रम आनंदी वातावरणात पार पडला याप्रसंगी समितीचे बंडूभाऊ अडसरे, भारत भाऊ तांबडे शरद जोशी,दत्ता आरोटे जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना, जयेश जगताप,शाम गोसावी, वैभव रोकडे पप्पू व्हलगडे, साहेबराव बागल तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते. ज्ञानेश्वर ढेपले यांनी आभार मानले पानसरे सर यांनी सूत्रसंचालन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »