दुपारी झोपणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या आरोग्यासाठी चांगलं की वाईट…
दुपारच्या जेवणानंतरची झोप म्हणजे अनेकांचा जिव्हाळ्याचा आणि बाकीच्यांसाठी टीकेचा विषय असतो.बहुतांश लोक दुपारच्या जेवणानंतर तास – दोन तास झोप काढणे पसंत करत, विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी जास्त झोपतात.दुपारी जेवल्यानंतर खूप छान झोप येते.झोप ही आपल्या शरीराच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे.पण दुपारी झोपने प्रत्येकासाठीच योग्य असतं असं नाही. आरोग्य तज्ज्ञांच्यामते दुपारी झोपल्यानं पोटाशी संबंधित समस्या गॅस, अपचन याशिवाय लठ्ठपणा, डायबिटीस यांसारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो.
आयुर्वेदानुसार दिवसा झोपल्यानं कफ आणि पित्ताचं संतुलन बिघडू शकतं. याद्वारे तुम्ही आजारांपासून बचाव करू शकता. आयुर्वेदात काहीजणांना दुपारी झोपण्याची सवलत दिली आहे. त्यात विद्यार्थी, मजूर, वयस्कर लोक यांचा समावेश आहे.
अनेकांना झोप लागणे आणि भूक लागणे यात गोंधळ असतो. वास्तविक, असे लोक झोप लागल्यावर काहीतरी खाऊन ते दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि भूक लागल्यावर झोपण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून भूक शांत होईल. पण हे अजिबात करू नये, जर वेळेची कमतरता असेल तर तुम्ही पॉवर नॅप घेऊ शकता. तज्ज्ञांच्यामते दुपारी पॉवर नॅप घेणे ठीक आहे, परंतु यामुळे रात्री झोप न येण्याची समस्या देखील होऊ शकते. पॉवर नॅप मुळे तुमचा थकवा दुर होऊन तुम्हाला फ्रेश वाटू शकतं आणि तुमचा मूड सुद्धा चांगला होऊ शकतो. पण, ती नॅप ३० मिनिटांपर्यंतच असावी.अभ्यासानुसार, सुमारे 50% लोकांना दुपारी झोपेचा फारसा फायदा होत नाही. अशा लोकांमध्ये सर्केडियन रिदम असतो. सर्कॅडियन रिदम शरीराला कधी झोपायचे आणि कधी उठायचे हे सांगतो. जर तुम्हाला दिवसा झोप येत नसेल तर तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज नाही हे दिसून येते.
निरोगी लोक फक्त उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी झोप घेतात. उन्हाळ्याच्या दिवसात रात्र लहान असते. यामुळे अनेकदा झोप पूर्ण होत नाही. याशिवाय थकवा येतो म्हणून रात्री जास्तीत जास्त झोप मिळायला हवी. जे लोक सकाळी लवकर दिवसाची सुरूवात करतात त्यांना दुपारी झोपायची आवश्यकता असू शकते.
दुपारी जास्त वेळ झोपल्याने पचनाचे आजार सुद्धा होण्याची शक्यता जास्त असते असं तज्ञ सांगतात.
दुपारी झोपल्यामुळे होणारे दुष्परिणाम :
संशोधनानुसार, स्पेनसारख्या देशातही दुपारी वामकुक्षी घेतल्यामुळे लोकांच्या आरोग्याचं मोठ नुकसान होतं. या संशोधनात असं आढळून आलं आहे की, दिवसा झोप न घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत दुपाराच्या वेळी 30 मिनीटापेक्षा जास्त वेळ झोपणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाला आहे. यामध्ये त्यांच्या बॉडी मास इंडेक्स, हाय ब्लड प्रेशर ( BP) आणि हार्ट अॅटक यासारखे आजार होण्याचा धोका वाढू शकतो. तसेच, डायबिटीजही होण्याचा धोका अधिक असतो.
दुपारच्या डुलकीमुळे लठ्ठपणा वाढतो का?
दुपारच्या वेळी काही मिनीटे झोपल्यामुळे आरोग्याला कोणताही धोका नसल्याचं आढळून आले. दुपारी 10-15 मिनीटे झोपणाऱ्या लोकांमध्ये दुपारी कधीच न झोपणाऱ्या लोकांच्या तुलनेत ब्लड प्रेशर न वाढता नॉर्मला असल्याचं दिसून आलं. अर्थात, दुपारी थोडा वेळ झोपणं हे खरंच फायदेशीर आहे का? यावर आणखीन संशोधन करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही दिवसा किती वेळ झोप घेता हे खूप महत्वाचं आहे, असंही या संशोधनात सांगितले आहे. दुपारच्या वामकुक्षीला पावर नॅप म्हणतात. यामध्ये व्यक्ती स्वत: ला रिफ्रेश करण्यासाठी 10 ते 15 मिनीटांची झोप घेतात. यामुळे तणावमुक्त आणि एनर्जेटिक वाटतं आणि आरोग्यही चांगलं राहतं.
(Tip: वरील सर्व बाबी कृषी न्यूज केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. कृषी न्यूज कोणताही दावा करत नाही. त्यामुळे उपचार आणि औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी.)