ह भ प नवनाथ महाराज गांगुर्डे चांदवड” यांना “श्रीसंतसेवा पुरस्कार २०२३ ने सन्मानित
ह भ प नवनाथ महाराज गांगुर्डे चांदवड” यांना श्री जोग महाराज सेवा मंडळ नाशिक जिल्ह्याच्या वतीने “श्रीसंतसेवा पुरस्कार २०२३ ने सन्मानित
काजीसांगवी-(उत्तम आवारे)
वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे विश्वस्त तथा अध्यापक,व योगिराज तुकाराम बाबा खेडलेकर यांचे उत्तराधिकारी थोर साधू वै.ज्ञानोबा हरी कदम तथा माऊली बाबा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निमित्ताने स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज सेवा मंडळ नाशिक जिल्हा व ह.भ.प.विनायक शंकर फंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “श्री संतसेवा पुरस्कार सोहळा २०२३” दरम्यान वारकरी संप्रदायातील आदर्शवत व्यक्तिमत्त्व ह.भ.प.सुखदेवजी महाराज राजपूत (कन्हैया महाराज) यांचे व ह.भ.प.श्रावण महाराज अहिरे कुकाणेकर यांच्या शुभहस्ते संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर चे विश्वस्त “ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे चांदवड” यांना “श्रीसंतसेवा पुरस्कार २०२३” प्रदान करण्यात आला.सन्मान चिन्ह व कदम माऊली बाबा यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला,यावेळी समवेत संतसेवक ह.भ.प.दत्ताकाका राऊत चांदवड, ह.भ.प.प्रवीणभाऊ वाघ ओझर, ह.भ.प .पांडुरंग पाटील गडकरी शिवनई, ह.भ.प.संजय आव्हाड सर चांदवड, ह.भ.प.हरिश महाराज फंड गाजरवाडी….यावेळी कार्यक्रमासाठी ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शिंदे रुई,मनोहरपंत ढमाले मामा,विश्वस्त,भंडारा डोंगर देहू,चंद्रकांत दादा आहेर,दत्तू पाटील डुकरे,विठ्ठल अण्णा शेलार,बाळकृष्ण महाराज ठोके शास्त्री,समीर खैरे,राजेंद्र महाराज गांगुर्डे,रघुनाथ गिते सर ,राजाराम पाटील मोगल,नवनाथ बोरगुडे,आदी शेकडो वारकरी उपस्थित होते यावेळी ह.भ.प. नवनाथ महाराज हे चांदवड तालुक्यातील असून ते संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त आहे त्यांना जोग महाराज सेवा मंडळ नाशिक यांनी यावर्षी सर्वात कमी वय असलेल्या नवनाथ महाराज यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या ठिकाणी नर्मदा माता पायी परिक्रमावासीय १०० वारकरी यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य भाविक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन दरवार्षीक हे स्वानंदसुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज सेवा मंडळ नाशिक जिल्हा व ह.भ.प.विनायक शंकर फंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो.