जिल्हास्तरीय युवा संसदेस येवल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.

0

जिल्हास्तरीय युवा संसदेस येवल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.

सांस्कृतिक महोत्सवात नाशिकचा आर्याग्रुप प्रथम..

नेहरू युवा केंद्र नाशिक द्वारा आज बाभुळगाव येथील एस.एन.डि. इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर येथे जिल्हास्तरीय युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाचशेहून अधिक युवक युवतींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा राष्ट्रीय पुरस्कार विजेते मोहम्मद अरिफ खान उपस्थित होते. खान यांनी युवकांनी युवाशक्तीसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून नव्या समाजाचे नेतृत्व करावे व भारतास जागतिक स्तरावर सादर करावे असे आव्हान केले. तर युवा समुपदेशक मंगेश निकम यांनी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक विकासाबरोबर सामाजिक विकास व शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असल्याचे मत मांडले. प्रसंगी व्यासपीठावर कॉलेजचे प्राचार्य डी.एम. यादव, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी कमल त्रिपाठी, कवयित्री मीना शिंदे, शालिनी वालतुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रसंगी सांस्कृतिक महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक महोत्सवामध्ये नाशिक येथील आर्या ग्रुप यांनी प्रथम, हिरकणी ग्रुपने द्वितीय, तर एस.एस.एम.व्ही महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकास स्मृतिचिन्ह व रोख रक्कम 5000 रुपये, द्वितीय क्रमांकास स्मृतिचिन्ह व रोख रक्कम 3000 व तृतीय क्रमांकस स्मृतीचिन्ह व रोख रक्कम 2000 रुपये बक्षीस देण्यात आले. तसेच धारवाड कर्नाटक येथे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व करणारे प्रथमेश जाधव यांचाही स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला व येवला पैठणीला धारवाड येथील राष्ट्रीय युवा महोत्सवात सादर करणाऱ्या युवा राष्ट्रीय स्वयंसेविका रूपाली निकम यांचाही गौरव करण्यात आला. महोत्सवात सहभागी सर्व युवक युवतींसाठी भोजनाची व्यवस्था ही नेहरू युवा केंद्रातर्फे करण्यात आलेली होती. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी यु.बी पवार, एच.यु.पावार, यु.बी. अन्सारी, बी.पी रोकडे, एच.एस.राने,  युवा राष्ट्रीय स्वयंसेवक रवींद्र बिडवे, राम उडीकर, मच्छिंद्र बनकर, सावली समाजसेवी संस्था पाटोदा चे अक्षय काळे, पवन घुले, सोमनाथ तनपुरे यांनी परिश्रम घेतले. महेश शेटे यांनी सूत्रसंचालन केले.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »