आज दि ०२/०३/२०२३ रोजी सकाळपासून प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर व सोबत ७ उपोषणकर्ते व असंख्य शेतकऱ्यंसोबत सुरु असलेल्या उपोषणाचे आज रात्री उशिरापर्यंत ९:४५ वाजेपर्यंत मार्गी लागलेले निर्णय …

0

कैलास सोनवणे (दिघवद)  : आज दि ०२/०३/२०२३ रोजी सकाळपासून प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर व सोबत ७ उपोषणकर्तेव असंख्य शेतकऱ्यंसोबत सुरु असलेल्या उपोषणाचे आज रात्री उशिरापर्यंत ९:४५ वाजेपर्यंत मार्गी लागलेले निर्णय …

सदरील निर्णय चांदवड व देवळा या दोन्हीही मार्केट कमिटींसाठीचे आहेत.

आंदोलनचे फलित पुढील प्रमाणे..

कांदा भाव घसरल्याने अडचणीतल्या शेतकऱ्याला न्याय मिळणेबाबत आपल्या कार्यालयात आज दि. ०२/०३/२०२३ रोजी आयोजित केलेल्या उपोषणासंदर्भात ल्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार तोलाई फी जसे की मार्केट मधील काट्यावर आणी व्यापाऱ्याच्या खळ्यावर असे दोन्हीही ठिकाणी शेतकऱ्यांकडून फी   आकारणी व खरेदी केलेल्या कांद्याची व्यापऱ्यांच्या खळ्यावर खाली करत असतांना वांधा काढल्यामुळे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या लुटीबाबत महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व त्या खालील नियम, १९६७ मधील तरतूदीनुसार आणी बाजार समितीच्या मंजूर उपविधीतील तरतूदीनुसार शेतकरी हिताच्या दृष्टीने उद्या दि. ०३/०३/२०२३ रोजी मा.पणन संच्यालक सो! महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील दि. १९/०३/२०११ रोजीचे परिपत्रकानुसार बाजार समिती मार्फत इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन मापाची सोय उपलबध करून दिली जाईल त्याच प्रमाणे वांधा समितीवर शेतकरी प्रतिनिधी नेमणूकीबाबत वार्षिकसभेतील प्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात येईल तसेच चांदवड व देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीतील गेटपास फी कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे  वरील अहवाल सादर …

अश्या प्रकरचे लेखी स्वरूपात  उपोषण कर्त्यांना देण्यात आले असून    पुढील व उर्वरित मागण्या अजून बाकी असल्याने सदरील उपोषण सुरूच असणार आहे सर्व मागण्या शेतकरी हिताचे पूर्ण होईपर्यंत हे प्राणांतिक उपोषण मात्र सुरूच असणार आहे…….

*प्रहार उप-जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर व सहकारी आंदोलनकर्ते..*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »