खंडू श्रीराम आहेर यांची ” ग्लोबल हुमिनिटी पुरस्कार- २०२३ ” या राष्ट्रीय पुरस्कार साठी निवड
कैलास सोनवणे (दिघवद) : खंडू श्रीराम आहेर यांची ” ग्लोबल हुमिनिटी पुरस्कार- २०२३ ” या राष्ट्रीय पुरस्कार साठी निवड
सामजिक व रक्तदान क्षेत्रातील अमुलाग्र काम केल्याबद्दल राज्यस्थान येथे होणार सत्कार
नाशिक:लोकांच्या अंधकारमय जीवनात प्रकाश आणण्यास आपला हातभार असावा समाजाचा विकास नवी पहाट घेऊन उदयास यावा ही संकल्पना घेऊन खंडू आहेर यांनी सकल मराठा परिवाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना नोकरी, व्यवसाय मार्गदर्शन केले , अनेक सामाजिक उपक्रम राबवले. कोरोना काळामध्ये नासिक मध्ये सकल मराठा परिवाराच्या माध्यमातून व निर्मल गंगा ॲग्रो टुरिझम यांच्या सहकार्याने 30000 मोफत टिफिन चे वाटप केले अनेक गरजू रुग्णांना बेड , इंजेक्शन v प्लाझ्मा ऊपलब्ध करून देणे तसेच अतिवृष्टी झालेल्या पूरग्रस्त भागात मदत केली. गरीब कुटुंबांना अन्नधान्य वाटप व आरोग्य सेवेसाठी रक्तदान कॅम्प घेतले मोफत आरोग्य शिबीर घेतले व आजपर्यंत अनेक लोकांना मोफत रक्त उपलब्ध करून दिले व देत आहे तसेच गरीब लोकांना महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यासाठी मदत केली तसेच अनेक भागात वृक्षारोपण केले सकल मराठा परिवाराच्या माध्यमातून गड किल्ल्यावर साफसफाई चे कामे त्यांनी केले व रक्षाबंधनाच्या वेळी सीमेवरील सैनिक बांधवांना राखी पाठवून हा सण साजरा ते करतात त्यांच्या या कामाची दखल घेऊन सैन्य दलातील अधिकारी वर्गाने त्यांना पत्र देत सन्मान केला आहे . तसेच मुलांच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी वकृत्व स्पर्धा त्यांनी घेतले आहे व दहावी, बारावी बोर्ड उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करणे असे अनेक समाज उपयोगी काम ते कायम करत असतात म्हणूनच या सर्व कामाची दखल घेत राज्यस्थान राज्यातील बिकानेर मधील राष्ट्रहित फाउंडेशन मार्फत 12 मार्च 2023 रोजी एका भव्य दिव्य राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात
” ग्लोबल ह्युमिनिटी पुरस्कार – 2023 ” या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान कारगिल युद्धामध्ये आपले दोन्ही पाय व एक हात गमावलेले वीर योद्धा रामसुख यांच्या हाताने दिला जाणार आहे. या कार्यक्रमात 200 देशातील आणि भारतातील 780 जिल्ह्यातील समाजसेवक येणार आहे. काही माणसात रक्ताचे नाते जरी नसले तरीही माणूसकीचया नात्याने रक्त देण्यासाठी व कायमस्वरूपी मदत करण्यासाठी आपण कायम तत्पर राहावे असा सल्ला ते नेहमी देतात. त्यांचा सकल मराठा परिवार हा संपूर्ण महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्र बाहेर पण काम करतो.
आणि करत रहाणार आहेत त्या मुळे त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने सकल मराठा परिवार व नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील विविध स्तरातील लोकांनी त्यांना खूप खूप शुभेच्छा अभिनंदन करण्यात आले आहे