मर रोग व उपाय यावर थोडस

बदलत वातावरण जेवढं महत्वाचं आहे तेवढ महत्वाचं आहे एकाच जमिनीत एकाच कुळातील पिके घेणे….
म्हणजे
आपल्या भागात खरीप मध्ये सोयाबिन तूर तर
रब्बी मध्ये हरभरा पेरल्या जातो..
आणि महत्वाचे म्हणजे सोयाबीन, तूर,हरभरा हि तिन्ही पिके मर रोगाला बळी पडतात

सोयाबीन

तूर

हरभरा 

कारण मर रोगाला कारणीभूत असलेली बुरशी ला वर्षभर जगण्यासाठी साधन पिकाच्या रूपाने मिळत असत…
अन दिवसे दिवसे मर रोगाची बुरशी एवढी प्रतिकार होत चालली आहे की
बीजप्रिक्रिया केलेले बियाणे,तसेच काही प्रतिकार असेलेले बियाणे सुद्धा काही प्रमाणात या रोगाला बळी पडताना दिसत आहेत…!
*यावर सध्या उपाय म्हणजे पिकाची आणि मर रोगाची साखळी तोडणे हा आहे…*
आणि तो करण्यासाठी 
महत्वाचे पिकाची फेरपालट करणे अंत्यत महत्वाचे आहे …
त्या शिवाय दुसरे पर्याय जास्त प्रमाणात उपलब्ध नाहीत…!
शेतकरी बंधूनी 
एक डाळ वर्गीय जसे सोयाबीन, तूर खरीप 
किंवा 
रब्बी हरभरा मसूर
यापैकी कोणतेही एक
आणि एक कड धान्य
ज्यामध्ये खरीप ज्वारी,मका,बाजरी, सूर्यफूल
किंवा रब्बी
सुरफुल,करडई,रब्बी मका,गहू
या पैकी एक 
किमान घ्यावे
*म्हणजे डाळ वर्गीय पिकावर येणार मर रोग हा कड धान्य पिकावर येत नाही…*
त्यामुळे त्या च्या साखळीत खंड पडून बऱ्यापैकी त्याचा प्रादुर्भाव कमी करता येतो…!
ज्वारी,सूर्यफूल हे पिके त्यांच्या मुळातून जमिनितं एक रासायनिक द्रव सोडत असतात त्यामुळे हानिकारक बुरशीची वाढ होत नाही…
व मर तसेच मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव ज्वारी वर दिसत नाही….!
*त्यामुळे पीक फेरपालट करणे अत्यंत महत्वाचे आहे…!*
*तसेच तीन वर्षातून एकदा हिरवळीचे पिके जसे ताग, बोरू ,चवळी,उडीद,मूंग घेऊन फुलोरा अवस्थेत शेतात गाडने गरजेचे आहे त्यामुळे शेतात असलेली सेंद्रिय कार्बनी कमतरता, भरून निघू शकेल,तसेच नत्र ची उपलब्धता होईल व रासायनिक खते वापर कमी होईल,तसेच सुष्मजीवांचे प्रमाण सुद्धा वाढेल…!*
*तसेच रासायनिक खते नियंत्रणात वापर वापरावी,अतिरिक्त वापरामुळे जमिनीतील महत्वाचे सुष्मजीव,बुरशी नष्ट झाल्याने हानिकारक बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे…*
तसेच शेणखताचा वापर करताना *Trichoderma या मित्र बुरशीचा* त्यातून वापर करावा…!
अन महत्वाचे म्हणजे 
आपण बियाण्याला केलेली *बीजप्रक्रिया आपल्या पिकाला फक्त सुरवातिच्या अवस्थेत मर रोगापासून वाचवू शकते कायम स्वरूपी * नाही ही गोष्ट ध्यानात घेणे
 गरजेचे आहे….!
कारण बीजप्रिक्रिया केलेली तूर अचानक शेंगा लागलेल्या असताना पूर्ण वाळू शकते या वरून मर रोगाचा ताकद अंदाज येतो….
मर रोग हा तीन टप्यात येतो….
म्हणून याच्या नियंत्रणासाठी Chemical वर भर देण्यापेक्षा आपल्या मातीला सुष्मजीवाणी समृद्ध केल्यास नक्की नियंत्रण मिळेल…
हाच एक आशावाद आहे…!
 अन जैव विविधता हाच निसर्गाचा पाया आहे…!
हवं सुद्धा महत्वाचं आहे..!
मनपूर्वक धन्यवाद…!
वरील माहिती स्वलिखित असून गेल्या एक वर्षा पासून स्वतः केलेल्या निरीक्षण,संशोधन,प्रत्यक्ष लागवड ची आधारे दिलेली आहे…
यातील प्रत्येक मुद्दे आपल्याला पटतील असे नाही पण जर समृद्ध शेती करायची असेल तर वरील गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करणे महत्वाचे आहे…!
*सदैव शेतकऱ्यांच्या सेवेत:-
*©️कृषिमित्र महेश भागवत आखरे पाटील*
*ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम*
*विवेकानंद कृषि महाविद्यालय हिवरा आश्रम ता.मेहकर जि. बुलढाणा 443303
🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »