खत गोणीतून पिकास अन्नद्रव्य किती मिळतात हे महत्वाचे..!*

0

खत गोणीतून पिकास अन्नद्रव्य किती मिळतात हे महत्वाचे..!

शेतकरी बांधवांनो,
     एका विशिष्ठ Grade चे खत दिल्यास खरचं पिकास फायदा होतो का? किंवा खर्चात बचत होते का? याचा आपण कधी विचार केलाय का?
     कृषी विद्यापीठ पिकास खत मात्रा ची शिफारस करताना एका विशिष्ठ खताची शिफारस करीत नाही ,शिफारस ही नत्र : स्फुरद: पालाश (NPK) अशी करण्यात येते. त्यानुसार बाजारात उपलब्ध खतांपैकी कमी खर्चात आपल्या पिकास आवश्यक NPK देणारे खत शेतकरी बांधवांनी निवडावे. एका विशिष्ठ खतावर अवलंबून न राहता सद्य परिस्थितीत आवश्यक NPK चे प्रमाण पिकास कमी खर्चात कसे देता येईल हे पाहणे महत्वाचे आहे.
    उदा. DAP या खताच्या एका गोनीतून N- 9 किलो व P- 23 किलो आपण पिकास देऊ शकतो सध्या बाजार भावा प्रमाणे एका DAP गोणीची किंमत 1200 रू आहे. या ऐवजी शेतकरी बांधवांनी 3 SSP व एक युरिया ची गोनी घेतल्यास येणार खर्च SSP -960 रू (3 गोणी) + युरिया 266 रू =1226 रू असून त्यातून मिळणारे N- 20.7 किलो व P-24 किलो आपण पिकास देऊ शकतो तसेच एकूण खत (Quantity)विचारात घेतल्यास DAP एक गोणी फक्त 50 किलो खत येते त्याच्या ऐवजी SSP व युरिया चे मिश्रण केल्यास 195 किलो खत येते.,शिवाय 11.7 किलो N व 1 किलो P अधिक देता येईल..नाही का?
     आता SSP (सिंगल सुपर फॉस्फेट) मध्ये झिंक युक्त व बोरॉन युक्त असे पर्याय देखील उपलब्ध असून आपण आपल्या पिकास या सुष्म अन्नद्रव्यांची मात्रा देखील देऊ शकतात
      एका विशिष्ठ खतावर अवलंबून न राहता चला आता NPK (नत्र:स्फुरद:पालाश) चे गणित मांडुया व कमीत कमी खर्चात पिकास योग्य खत मात्रा देऊयात..
  आपला,
*अभिजित जमधडे*
*मोहिम अधिकारी*
*कृषी विभाग नाशिक*
🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »