अॅस्परॅगसची लागवड

0

अॅस्परॅगसची लागवड

महाराष्ट्रातील शेतकरीही आता लेट्युस, स्कॅश, ब्रोकोली, लाल कोबी यांसारख्या परदेशी भाजीपाला पिकांच्या लागवडीकडे वळू लागला आहे. अॅस्पॅरॅगस ही भाजी युरोपीय देशांत मोठ्या क्षेत्रावर लागवडीखाली आहे. महाराष्ट्रातील हवामानातही ही भाजी चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकते. अॅस्पॅरॅगसच्या लागवडीबद्दलची ही माहिती. भारतात शतावरीच्या जातकुळीतील अॅस्पॅरॅगस ही भाजीची जात अॅस्पॅरॅगस ऑफिसिनॅलिस या वर्गातील आहे. या भाजीचे कोवळे कोंब सूप, लोणचे तयार करण्यासाठी वापरतात.
जमीनपोयट्याची, सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असलेली व मातीत रेतीचे प्रमाण असलेली जमीन चांगली. पाण्याचा चांगला निचरा होईल, अशी जमीन निवडावी. मुरमाड, खडकाळ त्याचप्रमाणे पाणी जास्त काळ धरून ठेवणारी सखल, पाणथळ जमीन अॅस्पॅरॅगस भाजीसाठी योग्य नाही. ज्या जमिनीचा
आम्ल-विम्लता निर्देशांक ६.o ते ६.५ आहे अशी जमीन चांगली. जास्त पाऊस पडत असलेल्या भागात थोड्या उताराची जमीन निवडावी.
पूर्वमशागत
● लागवड करावयाचे क्षेत्र समपातळीवर असावे. एका बाजूस थोडा उतार चालतो; पण शेताच्या मध्येच खोलगट भाग नसावा. कारण त्या खोलगट भागात पाणी साचून तेथील पीक चांगले येत नाही.
जमीन चांगली खोल नांगरावी व माती उन्हात चांगली वाळू द्यावी. नंतर जमिनीत हेक्टरी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे.
● त्यानंतर आडवी-उभी नांगरट करून ते जमिनीत मिसळावे. दोन ओळींतील अंतर एक मीटर व दोन रोपांतील अंतर ५० सेंमी ठेवून लागवड करावी.
● नांगरुन झालेल्या शेतात दर एक मीटर अंतरावर ३o सेंमी खोल व ३0 सेंमी रुंदीचे समांतर चर खोदावेत. या चरात अॅस्पॅरॅगसची रोपे लावावयाची आहेत.
● चर खोदून झाल्यानंतर ते चांगले वाळू द्यावेत. त्यानंतर चरांतील खोदून वर काढलेल्या मातीत भरपूर शेणखत मिसळून त्या मिसळलेल्या मातीने चराची निम्मी खोली (अंदाजे १५ सेंमी) भरून टाकावी. बाकी राहिलेले निम्मे खोल चर अॅस्पॅरॅगसच्या रोपांची
लागवड केल्यावर राहिलेल्या मातीने भरावयाचे आहेत. म्हणून निम्मी माती चराच्या वरच्या बाजूस शिल्लक ठेवावी. हेक्टरी २० हजार रोपांची लागवड होते.
रोपांची निर्मिती
रोपे तयार करण्यासाठी हेक्टरी २.५ किलो बियाणे लागते. प्रथम नर्सरीत तयार केलेली रोपे १o ते १५ आठवड्यांची झाल्यावर शेतात लागवड करावयाची असतात. रोपे तयार करण्यासाठी मेरी वेंॉशिंग्टन या जातीचे बियाणे वापरावे. ही जात तांबेरा प्रतिबंधक असून, हिरव्या रंगाची कोंब येणारी व कोंबाच्या शेंड्यावर जांभूळसर रंगाची छटा असणारी आहे. ही जात आपल्या महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे वाढून उत्पादन चांगले मिळते. परफेक्शन आणि ब्लोक इम्पेरिअल-८४ या जातीसुद्धा व्यापारीदृष्ट्रया चांगल्या आहेत.
रोपे लावण्यापूर्वी काळजी
नर्सरीत तयार केलेली रोपे जमिनीत लावण्याअगोदर शेतात रोप लावण्यासाठी जे चर खोदले आहेत, त्यांना एक दिवस अगोदर पाणी देऊन ते ओले करून घ्यावेत. त्यामुळे चरातील माती ओलसर होईल व थंडावा निर्माण होईल. पाणी दिल्यानंतर एका दिवसाने रोपे लावण्यास घ्यावी. रोपे लावण्याचे काम सकाळी व संध्याकाळी करावे. भर उन्हात रोपांची लागवड करू नये. रोपे काढून ताबडतोब लागवड केलेली बरी. म्हणून सकाळीच रोपे खणून सकाळीच लावावीत व संध्याकाळी खणलेली रोपे संध्याकाळीच लावावीत. रोपांची मुळे फार नाजूक असतात. वाफ्यातून रोपे काढताना ती तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे रोपे काळजीपूर्वक काढावीत. वाफ्यांतील रेतीच्या मिश्रणामुळे मुळांना दुखापत न होता रोपे निघतात.
अॅस्पॅरॅगस रोपांमध्ये नर व मादी फुले निरनिराळ्या झाडांवर येत असल्याने लागवडीसाठी नर रोपेच वापरावीत. रोपे लहान असल्याने नर व मादी झाडे ओळखता येत नाहीत. रोपांची चांगली वाढ, जास्त फांद्या व मुळांची वाढ असलेली रोपे नर म्हणून लागवडीसाठी निवडून घ्यावीत. लागवड केलेल्या नर झाडांना जास्त प्रमाणात कोंब येतात. तयार केलेल्या चरांत एका ठिकाणी २-२ रोपे एकत्र लावावीत व ती दर ५0 सेंमी अंतराने लावावीत. चराच्या १५ सेंमी खोलीत रोप सरळ उभे हाताने धरून ठेवावे. चरावरील शिल्लक राहिलेली माती चरातील मोकळ्या जागेत टाकून चर बुजवून टाकावा.
खत व्यवस्थापन
● पहिली खुरपणी व भर देण्याचे काम सुरू करण्याच्या अगोदर प्रत्येक रोपाच्या बुध्याजवळ, पण बुध्यापासून ७ ते ८ सेंमी अंतरावर १६: १६:१६ या प्रमाणाचे मिश्रखत प्रत्येक रोपास १o- १५ ग्रॅम याप्रमाणे जमिनीवर ठेवून द्यावे. या खतांवर मातीची भर येणार आहे. अशाच प्रकारे प्रत्येक महिन्यात बुध्यावर भर देण्याच्या कामाच्या वेळी भर देण्याच्या अगोदर रासायनिक खताची मात्रा द्यावी.
● प्रत्येक वेळी १०-१५ ग्रॅम खत वाढवून द्यावे. अशा प्रकारे दहा महिन्यांनी लागवड झाल्यावर रासायनिक खत हेक्टरी २५० किलो नत्र : २०० किलो स्फुरद : २00 किलो पालाश वर्षासाठी, पण ते ८ -१० हप्त्यांत विभागून द्यावे. म्हणजे पावसाळ्याचे दिवस सोडून दरमहा एकदा रासायनिक खत द्यावे. म्हणजे महिन्यातून एकदा हेक्टरी २५ किलो नत्र, २० किलो स्फुरद, २० किलो पालाश द्यावे. खत मातीत हलवून झाल्यावर पाणी द्यावे.
रोग व किडीअॅस्पॅरॅगस पिकावर रोग आणि किडीचे प्रमाण अतिशय कमी आढळते. अॅस्पॅरॅगस रस्ट (तांबेरा), फ्युजारियम विल्ट यांसारखे रोग व बीटलसारखी कोड मुख्यत्वेकरून आढळते.
काढणी व साठवण
अॅस्पॅरॅगस रोपे एका वर्षांची झाली, की कोवळे कोंब कापून काढण्यास सुरुवात करावी. अॅस्पॅरॅगसच्या रोपांच्या बुध्यातूनजमिनीमधून म्हणजे वरंब्यातून कोवळे कोंब येतात.
या कोवळ्या कोबांची उंची २o ते २५ सेंमी झाल्यावर जमिनीच्या सपाटीपासून हे कोवळे कोंब धारदार सुरीने किंवा कात्रीने कापावेत. नुकताच वरंब्यावर दिसावयास सुरुवात झालेला कोंब एक ते दीड दिवसाने २0 ते २२ सेंमी उंच वाढतो. तो कोंब कापावयास तयार म्हणून कोंब कापल्यावर ते थंड पाण्यात बुडवून ठेवावेत.त्यासाठी कोंब कापताना अधीं बादली पाणी घेऊन त्यात कापलेले कोंब ठेवावेत.
कोंब फार काळ आडव्या स्थितीत राहिल्यास शेंड्याकडचा भाग वळून वाकडा होतो व असे वाकडे कोंब पॅकिंग करावयास अडचणीचे होते. पॅकिंग करण्यासाठी प्रतवारी करून २५० ग्रॅम, ५oo ग्रॅम वजनाच्या अशी ७-८ सेंमी उंचीची कागदाची पट्टी गुंडाळावी. त्यामुळे वाहतुकीत त्या माध्यमातून ओलावा पुरवला जाईल.
कागद गुंडाळलेल्या सर्व जुड्या थंड पाण्यात १० मिनिटे बुडवून ठेवाव्यात व त्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅकिंग करावे. पॅक केलेली सर्व बंडल विक्रीसाठी जाड पुठ्याच्या खोक्यात पॅक करून पाठवावीत.
उत्पादन : रोपांचे वय वाढत जाईल, तसे उत्पादन दर वर्षी वाढत जाते.
लागवडीला चार वर्षे झाल्यानंतर वार्षिक हेक्टरी उत्पादन अंदाजे चार ते पाच टनांपर्यंत मिळते. पुढे उत्पादन दर वर्षी वाढत १५ ते २० टनांपर्यंत मिळते.
🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »