चांदवड तालुक्यात त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ यांच्या दर्शनासाठी दिंड्या चे आगमन

0

चांदवड तालुक्यात त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ यांच्या दर्शनासाठी दिंड्या चे आगमन व प्रस्थान त्रंबकेश्वर येथे

दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे.     ‌.           ‌. चांदवड तालुक्यात त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ यांच्या दर्शनासाठी दिंड्या चे आगमन झाले आहे आज चांदवड तालुक्यामध्ये मालेगाव नांदगाव चाळीसगांव अधिक बाहेरील जिल्ह्यातील आगमन झाले असून उद्या निफाड तालुक्यात प्रस्थान होईल सालाबादप्रमाणे दरवर्षी निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी दिंड्या चांदवड तालुक्यात येत असतात चांदवड तालुक्यातून 40 ते 45 दिंड्या गावागावातून जात असतात तसेच दिघवद येथील वैकुंठवासी यादव स्वामी महाराज व वैकुंठवासी वामानांनंद महाराज वबाळाबाबा ढगे  शाम महाराज शास्त्री यांच्या कृपाशीर्वादाने वर्ष सातवे दिंडी त्र्यंबकेश्वर येथे जात आहे दिंडीचे हरिभक्त परायण नामदेव महाराज गांगुर्डे लक्ष्मण महाराज गांगुर्डे शाम महाराज गांगुर्डे सिताराम महाराज शेळके व गावकरी मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीच्या आयोजन करण्यात येत आहे सालाबादप्रमाणे दिघवद ते त्रंबकेश्वर दिंडी आज दिघवद येथुन प्रस्थान होत आहे तर या सात दिवसांत खडक ओझर देवरगाव  शिवडी   ओझर व आडगाव टप्पा  सातपुर मार्गाने प्रस्थान होणार आहे यावेळी ठिक ठिकाणी चहापाणी फराळ  जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे यादिंडीला या वर्षी ह भ प उद्धव महाराज यांचे मार्गदर्शन लाभले आहे तर ठिक ठिकाणी हरी जागर  किर्तन प्रवचन हरीपाट भारूडचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या वेळी शाम महाराज नामदेव महाराज  लक्ष्मण महाराज स्वाती ताई महाराज उद्धव महाराज व वेळेनुसार बाहेरच्या महाराज पण प्रवचन व कीर्तन आयोजित करण्यात येणार असल्याचे ह भ प नामदेव महाराज गांगुर्डे यांनी सांगितले  एकादशीला फराळाचे आयोजन करण्यात आले आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी नामदेव महाराज यांचे काल्याचे किर्तन होवून  महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहेत तरी भाविकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन नामदेव महाराज  यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »