डाळिंब पिकाला स्लरिचा वापर
डाळिंब पिकाला स्लरिचा वापर
⭕खालील तिन्ही स्लरींचा वापर २ महिन्यातून एकदा असा कमीतकमी तीन दा करावा, त्यामध्ये पहिले पाणी दिल्यानंतर ० ते ४५ दिवसांमध्ये एकदा, ४५ ते ९० दिवसांमध्ये एकदा व ९० ते १२० दिवसांमध्ये एकदा करावा…
१. जिवाणू खते स्लरी
२० किलो शेणखत + १० लिटर गोमुत्र + २ किलो काळा गूळ + ५०० ग्रॅम ऍझोटोबॅक्टर + ५०० ग्रॅम फॉस्फेट सोलुब्लिझिंग मिक्रोऑर्गॅनिझम + ५०० ग्रॅम पोटॅश सोलुब्लिझिंग मिक्रोऑर्गॅनिझम + १ लिटर एएम २ द्रावण + ३०० लिटर पाणी.
<< स्लरी
२. जिवाणू बुरशीनाशके स्लरी…
२० किलो शेणखत + १० लिटर गोमुत्र + २ किलो काळा गूळ + १ किलो ट्रायकोडर्मा + १ किलो स्पिडोमोनास + १ लिटर स्पासिलोमायसीज + ३०० लिटर
३. सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरी…
२० किलो शेणखत + १० लिटर गाेमुञ 15किलाे जायटाँनिक-एम २५ किलो निंबोलीपेन्ड + ५ किलो झिंक सुल्फेट + ५ किलो फेरस सुल्फेट + ५ किलो मॅग्नेशिअम सुल्फेट + १ किलो बोरॉन + ३०० लिटर पाणी.
⭕वरील तिन्ही स्लरी आधी १०० ते १५० लिटर पाण्यात बनवून ५ ते ६ दिवस सावलीत ठेवायची, दररोज २ मिनिट हलवायची किंवा चांगली मिक्स करायची व ७ व्या दिवशी उरलेले पाणी त्यात टाकून वापश्यावर जमिनीत पिकास आळवणी म्हणजे ड्रिंचिंग करावी साधारणतः १ लिटर प्रति झाड, एक एकर साठी…
⛔ टिप.. शक्यतो जिवाणू खते स्लरी आणि जिवाणू बुरशीनाशके स्लरी एकत्र करू नये व वरील स्लरी वापरताना दोन स्लरीनमध्ये कमीत कमी २ दिवसाचे आंतर ठेवl
ड्रीप द्वारे विद्राव्य खतांचा वापर…
पहिले पाणी दिल्यानंतर ० ते ३० दिवसापर्यंत १२ : ६१ व १३ : ४० : १३ दोन्ही मिळून ४ किलो पर एकर ५ दिवसाच्या आंतराने ५ वेळेस द्यावे…
पहिले पाणी दिल्यानंतर ३० ते ६० दिवसापर्यंत १३ : ४० : १३ व ०० : ५२ : ३४ दोन्ही मिळून ४ किलो पर एकर 5 दिवसाच्या आंतराने ५ वेळेस द्यावे…
पहिले पाणी दिल्यानंतर ६० ते ९० दिवसापर्यंत ०० : ५२ : ३४ व १३ : ०० : ४५ दोन्ही मिळून ४ किलो पर एकर ५ दिवसाच्या आंतराने ५ वेळेस द्यावे…
पहिले पाणी दिल्यानंतर ९० ते १२० दिवसापर्यंत पोटेशिअम सोनाईट व ०० : ५२ : ३४ दोन्ही मिळून ४ किलो पर एकर ५ दिवसाच्या आंतराने ५ वेळेस द्यावे…
पहिले पाणी दिल्यानंतर १२० ते १५० दिवसापर्यंत ३ किलो पर एकर ०० : ०० : ५० ५ दिवसाच्या अंतराने ५ वेळेस द्यावे…
कॅल्शिअम नायट्रेटचा वापर ५ किलो पर एकर ड्रीपद्वारे किंवा ५ ग्रॅम प्रति लिटर फवारणीद्वारे २ महिन्यातून एकदा गरजेनुसार करा
ड्रीप द्वारे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर…
ड्रीप द्वारे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर…
पहिले पाणी दिल्यानंतर ० ते ४५, ४५ ते ९० आणि ९० ते १२० दिवसामध्ये ३ वेळेस ३ लिटर पर एकर चिलेटेड मिक्स/मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट द्यावे…
फवारणीद्वारे खत मात्रा…
फुले येण्यापूर्वी २ ग्राम प्रती लिटरने चिलेटेड मल्टि मिक्रोनुट्रिएन्टचा स्प्रे घ्यावा…
फुलगळ होत असेल तर २ प्रती लिटरने बोरॉनचा स्प्रे घ्यावा…
५० % फुले आल्यानंतर २ ग्राम प्रति लिटर ने चिलेटेड मल्टि मिक्रोनुट्रिएन्ट व ५ ग्राम प्रति लिटर १२ : ६१ चा दुसरा स्प्रे घ्यावा…
फळ तोडण्यापूर्वी १० दिवस ५ ग्राम प्रति लिटर पोटेशिअम सोनाईटचा स्प्रे घ्यावा
Sir WhatsApp no द्या