काजी सांगवी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी…..

0

 काजी सांगवी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी…….

काजीसांगवीः  (उत्तम आवारे) : चादंवड तालुक्यातील काजीसांगवी येथील कै.नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय काजी सांगवी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील शिक्षिका शितल राठोड होत्या. जेष्ठ शिक्षिका दर्शना न्याहारकर यांच्या  हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

             व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर,पर्यवेक्षक सुभाष पाटील,मविप्र सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर,जेष्ठ शिक्षक अर्जुन आहेर,दत्तू ठाकरे,सतिश महाले,माणिक कुंभार्डे,शोभा जाधव, ज्योती ठाकरे उपस्थित होते.

           याप्रसंगी विद्यालयातील वेषभूषा केलेल्या विद्यार्थिनींचा  पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील शिक्षिका भारती पगारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य न्याहारकर सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शितल राठोड यांनी सर्व विद्यार्थ्यांना बालिका दिनाच्या शुभेच्छा देऊन  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ९ची विद्यार्थिनी अक्षदा पठाडे हिने केले.तसेच सर्व कार्यक्रमाचे नियोजन ९ वी अ च्या विद्यार्थिनींनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »