कृषी सल्ला खरीप

0
कृषी सल्ला
Related imageसोयाबीन : 
       सोयाबीन पेरणीसाठी सुधारित जातींची निवड करावी.
– वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीने विकसित केलेल्या एमएयूएस-७१ (समृद्धी), एमएयूएस-८१ (शक्ती), एमएयूएस-१५८, एमएयूएस-१६२ इ.
– महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने विकसित केलेल्या केडीएस-३४४ (फुले अग्रणी).
– जबलपूरने विकसित केलेल्या जेएस-३३५ (जवाहर), जेएस ९३-०५, जेएस ९५-६०.
– सोयाबीन संचालनालय, इंदौर यांनी विकसित केलेल्या एनआरसी-३७ (अहिल्या ४). 
Image result for jowarखरीप ज्वारी : 
खरीप ज्वारीसाठी खालीलपैकी एका संकरित किंवा सुधारित वाणाची निवड करावी.
– सीएसएच-१४, सीएसएच-१६, सीएसएच-२५ (परभणी साईनाथ), पीव्हीके-४००, एसपीव्ही-९६० (पांचाली), सीएसव्ही-१५, एसपीव्ही-९४६, पीव्हीके-८०१, पीव्हीके-१३३३ (परभणी श्वेता)
– सुधारित वाण – पीव्हीके-८०९, एसपीव्ही-१४७४ . 


Related imageबाजरी : 
बाजरीच्या पेरणीसाठी संकरित वाण (जीएचबी-५५८, सबुरी, श्रद्धा, शांती, एएचबी-१६६६, पीकेव्ही-राज, सुधारित वाण (आयसीटीपी, एआयएमपी – ९२९०१ (समृद्धी), पीपीसी-६ (परभणी संपदा), एबीपीसी-४-३, पेरसाळ वाण (अंबिका, तेरणा, प्रभावती (परभणी-१), सुगंधा, पराग, परभणी अाविष्कार या वाणांचा वापर करावा. 

ऊस : 
Image result for ऊस :
सुरू उसाची पक्की बांधणी करून घ्यावी. त्याचबरोबर नत्र खताचा चौथा हप्ता द्यावा. 
हळद : हळदीच्या बियाण्यास क्विनॉलफॉस २ मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर किंवा डायमेथोएट १ मि.लि. अधिक मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून बीजप्रक्रिया करावी. बियाणे किमान १० ते १५ मिनिटे वरील द्रावणात बुडून राहतील, याची काळजी घ्यावी. 

Image result for संत्रा/मोसंबी :संत्रा/मोसंबी :
 लिंबूवर्गीय फळपिकात जून महिन्यात मृगाचा पाऊस पडल्यानंतर (ताण तोडतेवेळी) प्रतिझाडास ६०० ग्रॅम नत्र (१२० ग्रॅम युरिया) अधिक ४०० ग्रॅम स्फुरद (२.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) अधिक ४०० ग्रॅम पालाश (७०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) खतमात्रा द्यावी. 

Image result for डाळिंब

डाळिंब : 
डाळिंब पिकावर या काळात होणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी पिकातील रोगग्रस्त अवशेषांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. बागेतील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. 
चिकू :
Image result for चिकूचिकू बागेत फायटोफ्थोरा या बुरशीमुळे पावसाळा संपल्यानंतर फळगळीचे प्रमाण वाढते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पावसाळ्यापूर्वी एकदा एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. पावसाळा सुरू झाल्यानंतर जेव्हा उघडीप असेल तेव्हा मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब या संयुक्त बुरशीनाशकाची २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 
फूलशेती :
गलांडा फुलपिकाच्या अधिक उत्पादनासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी हलकी ते मध्यम (सामू ५-८) जमीन निवडावी. पाण्याचा निचरा न होणाऱ्या, खारवट चोपण जमिनीत लागवड करू नये..
भाजीपाला : 
खरीप हंगामात वांगी, मिरची, टोमॅटो या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्यावर बी पेरून रोपे तयार करावीत. 
चारापिके : 
ओट (जव) या चारापिकाच्या लागवडीसाठी केंट, जेएचओ-८२२, आरओ-१९ (हरिता), यूपीओ-९४ या वाणांची निवड करावी. 
कृषी अभियांत्रिकी : 
फळबागेतील पावसाचे अतिरिक्त पाणी शेताबाहेर जाण्यासाठी उताराच्या दिशेने प्रत्येकी दोन ओळींनंतर ३० सें.मी. खोल व ३० सें.मी. रुंद असलेले चर खोदावेत.
Source:
संपर्क : ०२४५२ – २२३२७६
(कृषी हवामानशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »