पृथ्वीवरील अमृत : देशी गाईच्या दुधाचे मनुष्य शरीरास फायदे..

1

आजकाल वाढत चाललेल्या आरोग्य विषयक तक्रारी ,
अनेक नवनवीन विकार हे दुधाची देणं आहेत असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही .
अर्थात दुधाला आपण अमृत मानतो पण ते कोणत्या ?
हेच आपण आजकाल विसरत चाललो आहे व दूध म्हणून नसत्या प्राण्यांचे विषासम दूध { विष } पिऊन आपण आपले व आपल्या भावी पीडीचे आयुष्य धोक्यात घालत आहोत.जे आयुष्यभर देशी गायीच्या दुधाचे सेवन करतात, ते निश्चितच निरोगी, वीर्यवान, बुद्धिमान, शक्तिशाली, आणि दीर्घायू होतात तसेच त्यांच्या विचारांमध्येही सात्विकता राहते. फक्त देशी गायीचेच दुध हितकार आहे; जर्सी, होल्सटीन किंवा त्यांच्या संकरीत उपजातींचे नव्हे. डेअरीच्या प्रक्रियेमुळे (उदा. पाश्चुरायझेशन) दुधाचा सात्विक प्रभाव आणि पोषक तत्वे नष्ट होतात.
दूध म्हणजे नक्की काय ? त्याचे फायदे काय ?
नुसता पांढरा कलर म्हणजे दूध अशी अंधश्रद्धा आज रूढ झालेली आहे .
युरिया युक्त दुध , नकली दूध , कोणत्याही तुच्छ प्राण्यास गाय असे नाव देऊन त्यापासून घेतलेले दूध ,म्हशीचे दूध
अश्या अनेक कॅटेगिरी मागील काही वर्षांच्या आपल्या देशी गाई प्रति असलेल्या उदासीनतेची मूर्तिमंत उदाहरण मानता येतील .
कारण आमच्या पिढीने देशी गाईचं नाही पहिली तर तिचे दूध वगैरे गोष्टी तर स्वप्नवतच .
परंतु आजकाल लोकांचा अव्हेरनेसपणा या बाबतीत कमालीचा वाढत आहे व ह्याचे श्रेय काही अंशी का होईना,
“दुधातील राक्षस ” { डेव्हील इन द मिल्क ” या पुस्तकास जाते .
यातून अ१ व अ२ हे प्रकार आपल्या समोर आले ज्यामुळे आपणास अ१ टाईप दुधातील असलेले दुष्परिणाम व अ२ टाईप दुधात असलेले उपयुक्त घटक आपण समोर येऊ शकले.
इंटरनेट युग मुळे जवळपास सर्वांच्या मोबाईल वर हा मेसेज पोचलाच आहे की त्याचे परिणाम काय ते म्हणून इथे अधिक प्रपंच मांडत नाही .
इथे आपण त्याचे काही भयानक तोटे व उपयुक्त फायदे यावर लक्ष देऊया
अ१ गायच्या विषारी दूध संबंधित विविध समस्या
– आत्मकेंद्रीपणा,
– मधुमेह
– अर्भकाचा अचानक मृत्यू
– आतड्याच्या सुजेने होणारा अल्सर,
– इन्फर्टेलिटी
– ह्रदयाचा समस्या
– कॅल्शियमचे क्षार साठने ,
– मानसिक विकार
– पार्किंसॉन्स
– स्क्रीझोफ्रेनिया.
– लठ्ठपणा

अश्या अनेक समस्या या दुधाने होतात .
न्यूझीलंड सारख्या प्रगत देशांनी याच्या विक्रीवर बंदी केली आहे .

अगदी अलीकडे गुजरात सरकारने सुद्धा याबाबतीत विचार केला आहे .
जे दूध अ१ प्रकारचे आहे त्याच्या पिशवीवर स्पष्टपणे असा उल्लेख असावा ” सदर दूध आरोग्यास हानिकारक आहे ”
या वरून आपल्याला याची घातकता स्पष्ट्पणे लक्षात येते ..

आज काल वाढलेले नैराश्य,स्वार्थी वृत्ती , आत्महत्या ,अत्याचार या सर्वांच्या वाढीवर याचाही फरक आहे असेही पाहण्यात येते .
साधारण आपण जे दूध पितो त्याचे गुणधर्म आपल्या अंगी येतात हे तर आपण पूर्वंपार पाहत अनुभवत आलो आहोत.
या प्राण्यांचे जरा गुणधर्म तपासून ,अभ्यासून पहा आपोआप आपल्याला सर्व कळून जाईल .
अ१ टाईप प्राणी
१ हे कधीही खुश नसतात
२ कितीही खायला घातले तरी असमाधानी
३ स्वैराचारी वृत्ती
४ माया ,प्रेम ,आपुलकी अजिबात नाही
५ घाणीत राहतात ,अंगाला अतिशय दुर्गंधया शरीरातील हेच गूण त्या दुधात उतरतात ,

या उलट अ२ टाईप च्या गाई

ज्यांना आपण आपल्या संस्कृती मध्ये मातेचे स्थान दिलेले आहे .
यांच्या कडे पाहल्यावर एक वेगळीच अनुभूती मिळते .
१ अत्यन्त माया .ममता ,करुणा पूर्ण डोळे
२ गळ्यात रुळणारी भरजरीत गलकम्बल
३ नाद मधुर असे हंबरणे
४ सर्वात महत्वाचे त्यांना प्रदान झालेले वशिंड

देशी गाईंना जे काही महत्व आहे ते याच मूळे ,
याचे अंतर्गत एक अशी नाडी आहे जिला सूर्यकेतू नाडी असेही सम्बोधले जाते .
सूर्यापासून मिळणारा प्रकाश घेऊन त्याचे योग्य असे “सुवर्णक्षरात” रूपांतरण करून आपल्या दूध रुपी अमृतात ते ती सोडत असते तसेच चन्द्रकेतू नाडी सुद्धा संध्याकाळच्या वेळेत चंद्राचा प्रकाश घेत असते व ते आपल्या कासे कडे प्रेषित करत असते.
प्रत्येक देशी गाई मध्ये हे पाहण्यात येतेच परंतु गीर गाईच्या या दोन्ही नाड्या अतिशय जास्त सुस्पष्ट व सुबक दिसतात.
ज्यांच्या कडे गीर गाय आहे त्यांना अनुभव असेल या जातील एक विशेष सवय आहे ती म्हणजे सरा {भाला} बांधणे .
अनेक वेळा नवीन गाय घेणाऱ्यांना पाय बांधायला लागणारी गाय म्हणजे दगेखोर पणाचे लक्षण असे वाटून ते लोक अश्या गाई टाळतात.
परंतु त्यामागे सुद्धा काही शास्त्रीय कारण असते ते हे लोक जाणून घेत नाहीत किंबहुना अनेक लोकांना ते माहित सुद्धा नसते .
सरा का बांधावा ? जर आपण नीट निरखून पहिले तर गीर गाईच्या दोन्ही पायांवर {मांडीजवळ} मोठ्या नाड्या आपल्या दृष्टीस येतात
ज्यातील उजव्या बाजूची सूर्य व डाव्या बाजूची चंद्र नाडी असते .
ज्यावेळी आपण त्यांचे पाय बांधतो तेव्हा ते अश्या स्वरूपात बांधायचे असतात कि त्या दोन्ही नाड्या प्रेस होतील व त्या दोरीची गाठ तिच्या डाव्या पायावरील नाडीवर बांधली जाईल .

यामुळे त्या ऍक्टिव्ह होऊन त्यांच्या दुधात पूर्ण क्षमतेने सूर्य,चन्द्र गुण येतात { याची प्रात्यक्षिक घेतलेली आहेत }

या सोबत या गीर गाई एका अश्या जागेवर स्थित आहेत कि जिथून पृथ्वीचा मध्यार्ध सुरु होतो
*सोमनाथ प्रांत*
त्यामुळे नैसर्गिक पणे त्या सूर्य तत्वाशी जास्त निगडित राहतात .झालेल्या गीर वरील संशोधनातून सुद्धा हे सिद्ध झाले कि इतर गाईच्या मानाने यांच्यातील सुवर्णक्षार जास्त ऍक्टिव्ह असतात .
*सर्वच गाई उत्तम असतात परंतु गीर मध्ये आम्हाला जास्त तत्वे आढळली याचा अर्थ आम्ही फक्त गिरलाच पब्लिश करतोय असा घेऊ नये*
आता दुधातून मिळणारे चांगले परिणाम पाहूया ..
गाईचे दूध व त्यापासून बनलेले पदार्थ यांत औषधिगुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.
गाईच्या दुधात २१ प्रकारची अमिनो ‌‍‍असिडे, ११ प्रकारचे फॅटी असिडे, ६ प्रकारची व्हिटॅमिने, २५ प्रकारची धातुजन्य तत्त्वे, २ प्रकारची साखर, ४ प्रकारचे फॉस्फरस व ११ प्रकारची नायट्रोजन तत्त्वे आढळून येतात .
गायींच्या दुधात कर्करोगासारख्या रोगांवर उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण घटक ‘ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिड’ असतो.
विपर्यास म्हणजे या रोगावर औषध म्हणून ‘ओमेगा-६’च्या निर्मितीसाठी एक मोठा उद्योग विकसित झाला आहे. ते ‘कॅप्सूल’च्या स्वरूपात विकले जाते; परंतु आपल्या भारतीय गायींच्या दुधात निसर्गतः उपलब्ध असलेल्या या घटकाकडे आपण दुर्लक्ष करत आहोत.
स्मरणशक्ती वाढवायला गायीचे दुध उत्तम आहे .
मातेनंतर फक्त गाईचेच दूध बाळाला योग्य मानवते .
तेजस्विता व शीतलता वाढते { अनेक वेळेस देवतत्वाला सुद्धा दुधाने अभिषेक घातला जातो .
अग्निवरील १० ग्रॅम देशी गाईच्या तुपात देशी गाईचे दूध घातल्यास उत्पन्न होणार वायू किमान १६०० kg प्राणवायू शुद्ध करतो .
*ज्याला प्रवर्ग्य असे म्हणतात*
यावर रशियात संशोधन होत आहेत .
असे एक न अनेक चांगले फायदे देशी गाईच्या दुधातून मिळतात या व्यतिरिक्त पंचगव्य हा विषय तर सर्व गणितच बदलू शकेल असा आहे या विषयी कालांतराने पाहू .
म्हणूनच आजपासून इतर प्राण्यांचे दूध पिणे बंद करून आपल्या देशी गाईचेच दूधरुपी अमृत पिणे सुरु करा.

1 thought on “पृथ्वीवरील अमृत : देशी गाईच्या दुधाचे मनुष्य शरीरास फायदे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »