मूळव्याध म्हणजे काय? जाणून घ्या करणं , लक्षण व उपचार..

0

गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्या सुजल्यावर त्यांचा दाह होतो, त्यांच्यावर अतिरेकी दाब पडल्यावर जळजळ सुरू होते. रक्तवाहिन्या सुजण्याची अनेक कारणं आहेत.

शौचाच्यावेळेस या वाहिन्यांवर वाजवीपेक्षा जास्त ताण येणं, बराच काळ शौचालयात बसणं, बद्धकोष्ठ अशी काही याची कारणं आहेचय तसेच सतत अतिसार होणं, वजन वाढलेलं असणं, आहारात तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स कमी असणं, पाणी कमी पिणं, व्यायाम करताना अतिश. जड वजनं उचलणं यामुळे गुदद्वाराजवळील भागावर ताण येतो.

महिलांना गरोदरपणात बद्धकोष्ठ आणि मूळव्याध होण्याची शक्यता वाढते.

कारणे

सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे गुदद्वारावर जोर द्यावा लागतो.खालच्या गुदाशयात दाब वाढल्यामुळे मूळव्याध होतो.या अशा गोष्टींमुळे मूळव्याध होण्याची शक्यता वाढते.

मूळव्याध असलेल्या व्यक्तीला खालील लक्षणे दिसू शकतात:

गुद्द्वार आणि आसपास वेदनादायक गाठ,गुदाभोवती खाज सुटणे आणि अस्वस्थता,मल विसर्जन करताना आणि नंतर अस्वस्थता,
रक्तरंजित मल,मूळव्याध अधिक गंभीर स्थितीत वाढू शकते.
शक्यतो अशक्तपणा होऊ शकतो.पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहते, गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवत राहते.शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना होतात.

उपचार

सुरणाचा कंद आणून त्याची वरची साल काढून टाकावी. आतील गुलाबी भागाच्या बटाट्यासारख्या काचऱ्या करून त्या गाईच्या तुपात परताव्यात व खाव्यात. यात मीठ टाकू नये.नंतर अधूनमधून ही भाजी खात जावी.
रात्री एका वाटीत १ चमचा तूप गरम करून, पातळ करून त्यात साखर घालावी.त्यात अर्धा वाटी पाणी घालून ते प्यावे. सकाळी त्रास कमी होतो.ताजे लोणी खावे. ताजे ताक प्यावे.(आंबट नव्हे.)

झेंडूची १० पाने आणि ३ ग्रॅम काळी मिरी पाण्यात वाटून गाळून प्यायल्याने मुळव्याध मधून रक्त येणे थांबते.

उच्च फायबर आहार असणे. यामध्ये मल मऊ होण्यासाठी अधिक भाज्या, फळे आणि धान्ये खाणे समाविष्ट आहे. असे केल्याने अस्वस्थता कमी होण्यास मदत होईल.

मूळव्याध धोकादायक नाही. निरोगी जीवनशैली निवडून हे सहजपणे टाळता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »