हर घर तिरंगा अभियानानिमित्त काजीसांगवी येथे जनजागृती प्रभातफेरी

0

 हर घर तिरंगा अभियानानिमित्त काजीसांगवी  येथे जनजागृती प्रभातफेरी

काजीसांगवीः उत्तम आवारे

    मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कै.नरहरपंत कारभारी ठाकरे जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी  येथे  *हर घर तिरंगा* अभियान अंतर्गत स्वातंत्र दिनाच्या पाश्वभूमीवर देशातील सर्व घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे . स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशातील प्रत्येक नागरीकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी *हर घर तिरंगा* मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेची जनजागृती करण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात जनजागृती रॅली काढून जनतेमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी विविध प्रकारचे देशाभिमाचे घोषवाक्य फलक व पुढील प्रमाणे घोषणा देऊन जनजागृती केली.

*” भारत मातेचे गीत गाऊ*

    *तिरंगा घरोघरी लावू “*

*”सदैव राखू तिरंग्याचा मान*

*जगात वाढेल आपले स्थान”*

    यावेळी विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »