पाटोदा येथे विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ.
पाटोदा येथे विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ.
पाटोदा दि. 10 वार्तहार- महेश शेटे :- पाटोदा येथे नेहरू युवा केंद्र नाशिक व जनता विद्यालय पाटोदा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देऊन गावामध्ये ध्वज जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी हातामध्ये विविध जागृती पर घोषणा फलक घेऊन गावात घोषणा दिल्या. रॅली नंतर विद्यार्थ्यांकडून मैदानाची स्वच्छता करून घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतेचे व ध्वजाचे महत्त्व पटवून देत, ध्वज कसा लावावा, ध्वजाची काळजी कशी घ्यावी याबद्दल नेहरू युवा केंद्र युवा राष्ट्रीय स्वयंसेविका रूपाली निकम यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद सूर्यवंशी, पर्यवेक्षक डी.डी पठारे, सहाय्यक शिक्षक एस.व्ही. पाटील, सी.बी दुसाने, एस.डी.नवगीरे, बी.एस.सोमासे, श्रीमती एस.एल चंदनशिव आदींसह सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा तर्फे ही ध्वज जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते हे संयोजन मुख्याध्यापक कर्डक व सहाय्यक शिक्षक सोनवणे यांनी केले होते. यामध्ये ग्रामपंचायत उपसरपंच रईस देशमुख, सदस्य संतोष दौडे, राष्ट्रवादीचे युवा नेते अंकुश बोराडे यांनी सहभाग नोंदवला.