सोयाबिन कमी उत्पान्नाची कारणे

0

सोयाबिन कमी उत्पान्नाची कारणे

1)नविन लागवड  तंञज्ञानचा अवलंब न करणे…                                 2) नविन व उन्नत जाती न करणे..                                                 3)एकरी झाडाची संख्या न राखणे  ….                                                4)  बिज प्रक्रिया न करणे उगवण शक्तीची तपासणी न करणे….              5)योग्य खताची व माञाची शिफारसी प्रमाणे वापर न करणे….                                                                  6)तणाचा ,व  रोगाचा, किडीचा बदोबस्त वेळेवर न करणे….                7) आंतरपिक व मिश्र पिक पध्दतीचा वापर न करणे….                               *सोयाबिन उगवणशक्ती कमी होण्याची कारणे.*                                  1)       सोयाबिन ची उगवन साठवणूकी मध्ये कमी होत जाते वर्षे भर बियाणाची पोते एका जागी ठेवलेली पोते उगवण पाहून च बियाणा साठी घेवू नये……                           2) बियाणे हे कडक उन्हात वाळू घालून वाळवून साठविलेले बियाणे पेरणीस वापरू नये…                                      3) हेडब्या मधून काढलेले सोयाबिन पेरणीस उगवण पाहून बियाणाची निवड करावी….                             4) साठवणुकीमध्ये पोत्याची एकमेका वरील थप्पी लावल्यास खालच्या पोत्यातील उगवण कमी असते….                                                           5) बियाणे 4 इंच खोल पेरणी करू नये….

6)खत आणि बियाणे एका जागी मिसळून पेरणी करू नये….

7)  सोयाबिन बियाण्याची उगवण 60% हूण कमी असल्यास पेरणीस घेवू नये….

*पूर्व मशागत ::–*

* जमिन खोल नांगरणी करूण दोन वेळेस फनकटी किंवा वखर पाळी , रोट्या वेटर मारावे….

*जमिन सपाट करण्यासाठी लोड मारावा ज्या जमिनी चिंबडात असतात त्यात जमिनीत दानेदार खत टाकावे…                                    *सोयाबिन शेतात , शेण खत , कपोष्ट खत , गाळाची माती पेडखताचा वापर करून जमिनीत व्यवस्थीत टाकून खत शिंपडावे….

*पेरणीची वेळ::-*    

पावसाचा जमिनीतील ओलावा 6 इंच गेल्यावरच पेरणी करावी पेरणी करताना दोन इंचाच्या खाली बियाणे जाणार नाही यांची काळजी घ्यावी.                         दोन ओळीतील अंतर मध्यम जमिनीत सव्वा फुट व भारी जमिनीत दिड फुटा पर्यत व त्या हुन जास्त ठेवता येतो.एक मिटर लांबीच्या ओळीत 18 ते 24 झाडे अासावेत जर दाट झाले तर विरळी करावी …..                         शक्यतोवर सोयाबिन पट्टा पध्दतीने पेरावे जर साध्या तिफणी ने पेरत असाल तर दोन तिफणी नंतर फट मोठा ठेवावा व नंतर एक कोळपणी झाल्यानंतर दाड किंवा सरी पाडून घ्यावी….

*जमिनीची निवड ::-*  सोयाबिन हे पिक एक दनकट पिक आहे . हे पिक वेगवेगळ्या जमिनीत येते. चांगल्या उत्पन्नासाठी पाण्याचा चांगला निचरा जमिन निवडावी ज्या जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असलेल्या जमिनीत खुप चांगला उतारा येतो.आम्ल जमिनी चोपन जमिनी उतारा चांगला येत नाही…

*बियाणाची उगवण तपासणे ::-*  1)सोयाबिन बियाणे अंत्यत नाजूक असल्याने बाहेरूण होणा-या थोडीसी अदळ आपट या मुळे टरफले जातात ..       2) सोयाबिन बियाण्याची उगवण तपासणी करताना  मातीचा , पोत्याचा कागदाचा  वापर करावा 4ते 5 दिवस पाणि शिंपडावे असे केल्यास 5 व्या दिवसी सोयाबिन ची उगवण होते.. ति  संख्या मोजावी ति70% असावी. 30 किलो वापरावे बारीक असले तर 27 किलो वापर करावा. 60 % उगवण झाली तर 10% बियाणे वापरावे.  सोयाबिन ची उगवण दहा ते पंधरा दिवसअाधी पाहावी जास्त उन्हाळा मध्ये उगवण कमी होते हि काळजी घ्यावी….

*बिज प्रक्रिया ::-*   सोयाबिन पिकास बिजप्रक्रिया करणे खुप महत्वाचे आहे..        1) स्लेरप्रो + झेलोरा 2) गाऊचो + एवरगोल 3)कुझर + कवच 4) व्हिटाएक्स पावर, थायरम , बाविस्टीन , साफ …. जैविक  1)टायकोड्रार्मा ,  2)ह्युमिक . 3) राझोबियम 4) पि एस बि 5)जर्मेनेटर 6) शेण 7) गोमुञ 8) मास 9) दुध  वरिल कोणतीही बिज प्रक्रिया करायची असल्यास पाणि गरम करून त्यात  गुळ टाकुन  करावी …..                         *खत व्यवस्थापन::-* 1)दाणेदार 100किलो, 2)जिप्सम 200 किलो 3)डि ए पी – 60  कि. 20 पोट्याश 4) 12: 32 :16 ,65 किलो5) 14 :35:14 ,68 कि  , 6)20 :20: 0: 13 70 किलो 7)24: 24: 0 :8 67 ,कि 8) 6 किलो गंधक टाकावे पण दाणेदार, 20 ::20:: 0 ::13,…24:: 24:: 0:: 8या खता सोबत टाकू नये…  ज्या खतात पोट्याश नाही 27 कि पो टाकावे… या मध्ये ह्युमिक खत टाकलेल्या सोयाबिन ची उगवण व हिरवा रंगा पिकास चांगला दिसतो…

*तन नियंञण::–* सोयाबिन ची पेरणी झाली कि 24 ते 48 तासात तन नाशकाची फवारणी करावेचे तन नाशक बाजारात एफ एम सी, सुमोटुमो ,डाऊ आग्रो या चांगल्या कंपनी ने तन नाशक आणली आहे… पण अडचण पेरणी करताना वेळ पुरेसा नसल्या मुळे शेतकरी हे तन नाशक टाळीत आहेत ..तणनााशकाचा कालावधी 45 नियंञीत देते असे कंपनी सांगत आहेत…..  एक डवरणी झाल्यावर 18 ते 21 दिवसाच्या दरम्यान तणनाशकाची फवारणी फायद्याची असते त्या तणावर निंयञण चांगले होते…. शकेद , ओडीसी, परस्युट                  *अंतरमशागत ::-* पहिली डवरणी हि जरा लवकर 17 ते 21  दिवसानी करावी सोयाबिन ला भर बसतो सोयाबिन ची वाढ चांगली होते . दुसरी डवरणी 30ते 35 दिवसानी करावी जास्त फुलोरा असल्यावर डवरणी टाळावी उत्पन्नीत घट येते….सरी पाडावी युरिया जर टाकावेचा झालातर 10 :26 :26 मिसळून डवरणीच्या आधी टाकून डवरणी करावी…..

*#सोयाबीन  मधील महत्वाची किड माहिती##*                           सोयाबिन या पिकात खोडमाशी व चक्रीभुंग्या या किडी मुळे 80 % पर्यत नुकसान होते.या मुळे शेतक-यांनी  किडीचे नियोजन करूनच सोयाबिनची पेरणी करावी त्यामुळे अर्थीक नुकसान टाळता येते. त्यादोन किडीचे खाली प्रमाणे वर्गीकरण केले त्यामुळे शेतक-यांना समजेल अ

*खोडमाशीचा प्रादुर्भाव*

*##खोडमाशीचा प्रादुर्भाव##*

या किडीची प्रौढ माशी खूप लहान 1.9 ते 2.2 मि.मी. लांब असते. तिचा रंग चमकदार काळा असतो. फक्त पाय, स्पर्शिका व पंखांच्या शिरा फिकट तपकिरी असतात. अंडी पांढरी, अंडाकृती असतात. अळी पिवळी, तोंडाच्या बाजूने टोकदार व मागील बाजूने गोलाकार असते. कोष तपकिरी रंगाचा असतो.

नुकसानीचा प्रकार – सोयाबीन बीजदल जमिनीच्या वर आल्यानंतर मादी माशी बीजदलाच्या वरच्या बाजूला पोखरून आत अंडी घालते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर ती बीजदल पोखरते, त्यामुळे फिकट वेड्यावाकड्या रेषा दिसतात, त्या नंतर तपकिरी होतात. सुरवातीला अळी पोखरत वरच्या बाजूला व नंतर खालच्या बाजूला जाते. मादीने पानावर वरच्या बाजूला पोखरून केलेला मार्ग वेडावाकडा असतो, तर मेलॅनोग्रोमायझा सोजी प्रजातीच्या अळीचा मार्ग लहान व सरळ असतो. सुरवातीला हा मार्ग पांढरा व नंतर तपकिरी दिसतो. तीन पानांच्या अवस्थेत अळी खालच्या बाजूने पोखरते. हा पोखरलेला मार्ग लहान व सरळ पानाच्या शिरेपर्यंत असतो.

अळी पान पोखरून शिरेपर्यंत पोचून शिरेतून पानाच्या देठामध्ये शिरते. त्यानंतर खोडामध्ये शिरते. अशाप्रकारे अळी आतील भाग खात जमिनीपर्यंत पोचते व कोषामध्ये जाते.

झाड मोठे झाल्यानंतर वरून या किडीचा प्रादुर्भाव जाणवत नाही. फक्त जमिनीजवळ खोडामधून प्रौढ माशी निघाल्यास खोडाला छिद्र दिसते. यामुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. फुले व शेंगा कमी लागतात. शेंगांमध्ये दाणे लहान व सुरकुतलेले असतात.

चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव

या किडींचे प्रौढ भुंगे फिकट तपकिरी रंगाचे व सात ते दहा मि.मी. लांब असतात. पुढील टणक पंखाचा शरीराकडील अर्धा भाग गर्द तपकिरी आणि उर्वरित अर्धा भाग गर्द काळा असतो. अळी पिवळसर पांढरी, गुळगुळीत, बिनपायाची असून, तिच्या डोक्‍याकडील भाग जाड असतो. पूर्ण वाढलेली अळी 19 ते 22 मि.मी. लांब असते.

नुकसानीचा प्रकार – या किडीची अळी तसेच प्रौढ अवस्था पिकाचे नुकसान करते. मादी भुंगेरा फांदी, देठ व मधल्या पानाच्या देठावर दोन चक्रकाप तयार करते व त्याच्या मधल्या भागात तीन छिद्रे पाडून त्यात अंडी घालते. कापावरील भाग वाळतो. फांद्यांवरील चक्रकापामुळे जास्त नुकसान होते. अळी खोडातील भाग बुडापर्यंत पोखरते, त्यामुळे झाडे मोडून पडतात व उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. उत्पादनात 29 ते 83 टक्केपर्यंत घट होते. मुख्यतः मॉन्सूनपूर्व पेरलेल्या पिकाचे जास्त नुकसान होते.

*व्यवस्थापन उपाय*

👉पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.

👉पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडीच्या पर्यायी खाद्य वनस्पतींचा नाश करावा.

आंतरमशागत निंदणी व कोळपणी वेळेवर करावी.

👉खोडमाशी व चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने, फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.

जेथे खोडमाशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर येतो, अशा ठिकाणी कोळपताना मोघ्याच्या साहाय्याने फोरेट (10 टक्के दाणेदार) दहा किलो प्रति हेक्‍टर जमिनीत ओल असताना पेरून द्यावे. कीटकनाशके पेरताना रबरी हातमोज्यांचा वापर करावा.

👉खोडमाशी व चक्रीभुंगा या किडींनी अंडी घालू नये म्हणून त्याकरिता सुरवातीलाच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

👉कीड व्यवस्थापनासाठी 20 मि.लि. ट्रायझोफॉस (40 टक्के प्रवाही) किंवा  50मि.लि. इथेफेनप्रॉक्‍स (10 टक्के प्रवाही) प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारावे. पॉवर स्प्रेसाठी कीटकनाशकाचे प्रमाणे तीन पट वापरावे.                                ..👉 प्रोफेक्स सुपर या किटकनाशकाची फवारणी 40 मि  करावी…                                         👉निंबोळी पेंड , फोरट ,रिजेन्ट अल्ट्रा, फलटेरा याचा वापर करावासोयाबीन वरील किडींचे

👉 सोयाबीन पेरणीपुर्वी उन्हाळ्यात खोल नांगरट करावी.

👉 मृगाचा चांगला पाऊस झाल्याबरोबर लवकर पेरणी करावी.

👉 नत्रयुक्त खतांचा समतोल वापर करावा.

👉 खोडमाशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यास कीडग्रस्त झाडे मरतात. अशी झाडे गोळा करून नष्ट करावीत.

👉 रासायनिक औषधे फवारण्यापुर्वी ५% निंबोळी अर्क आणि स्प्लेंडरची सप्तामृताबरोबर फवारणी करणे फायदेशीर ठरते.

कोणतीही फवारणी करताना प्रथम औषध पुर्णपणे कालवून (ढवळून) घ्यावे. फवारणीही झाडांच्या वरून व पानांच्या खालील बाजूनेदेखील व्यवस्थित होईल याची दक्षता घ्यावी. व रोगांच्या नियंत्रणासाठी *एकात्मिक व्यवस्थापन -:*

किडी व रोगांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन पध्दती विकसीत करण्यात आली आहे. या पध्दतीचा अवलंब केल्याने कीड व रोगनियंत्रणाचा खर्च कमी होऊन रसायनाच्या अयोग्य वापरामुळे होणारी निसर्गाची हानीही टाळता येते. प्रस्तुत लेखात दिलेल्या पध्दतीचा अवलंब करून शेतकरी बंधुंनी उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा.

*एकात्मिक कीड व रोग* व्यवस्थापनाची मूलतत्त्वे –

१) शेताची नांगरट – उन्हाळ्यात शेताची खोल नांगरट केल्याने जमिनीतील किडींच्या सुप्त अळ्या व कोषांचा नाश होतो तसेच बुरशीजन्य रोगांच्या बुरशीचा नाश होतो.

२) फेरपालटीची पिके – खरीप हंगामात सोयाबीन पिकानंतर रब्बी अगर उन्हाळी हंगामात सोयाबीनचे पीक घेऊ नये. कारण तसे केले असता किडी व रोगांच्या जीवनक्रमात खंड पडत नाही व पुढील पिकांवर त्यांचा प्रादुर्भाव होतो. त्या दृष्टीने सोयाबीन-ऊस, सोयाबिन-गहू असा पिकांचा

क्रम योग्य ठरतो.

३) आंतरपिके घेणे – सोयाबीन  पिकांत मक्याचे आंतरपीक घेतले असता पांढरी माशी, इतर किडी व रोगांचे प्रमाण कमी होते असे आढळून आले आहे. ऊस व कपाशीमध्ये सोयाबीनचे आंतरपीक फायदेशीर असल्याचे प्रयोगाअंती आढळून आले आहे.

४) एकाच वेळी पेरणी करणे – सोयाबीनची एका शेतामध्ये तसेच आजूबाजूच्या शेतक-यांनी एकाच वेळी पेरणी करावी. म्हणजे किडी व रोगांचे नियंत्रण करणे शक्य होते. उशिरा पेरलेल्या पिकांवर किडी व रोगांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. महाराष्टातील सांगली व कोल्हापूर भागात उशिरा पेरलेल्या पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो.

५) रोग-कीडग्रस्त झाडे व किडी नष्ट करणे – शेतामध्ये वेळोवेळी लक्ष देऊन रोग व कीडग्रस्त झाडे काढून नष्ट करावीत तसेच किडींच्या अंडी, अळी या अवस्था अल्प प्रमाणात आढळून आल्यास त्या गोळा करून त्यांचा रॉकेल अगर कीटकनाशक मिश्रीत पाण्यात टाकून नाटनाट करावा. विशेषतः लष्करी अळी या किडीच्या अंड्यांचे पुंजके, बिहार सुरवंट या किडींच्या अळ्या यांचे या पध्दतीने नियंत्रण परिणामकारक ठरते.

कीड रोखण्यासाठी इतर उपाय

सोयाबीन पिकाला ते द्विदलवर्गीय असल्याने नत्र खताची अल्प म्हणजे २० किलो प्रतिहेक्टर एवढीच आवश्यकता असते. अत्यंत सुपिक जमीन असल्यास व भरपूर शेणखत वापरले असल्यास रासायनिक नत्र खत अत्यल्प लागतो. नत्र खताची मात्रा जास्त झाल्यास पीक माजते व पाने खाणा-या अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.

शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी जागा करणे – किडीच्या अळ्या, पिले व पूर्ण वाढ झालेले कीटक हे पक्ष्यांचे नैसर्गिक खाद्य असते. शेतात ठराविक अंतरावर अंदाजे हेक्टरी १०० ठिकाणी पक्ष्यांना बसण्यासाठी १०-१५ फूट उंचीच्या जागा केल्यास किडींचे परिणामकारकरीत्या नियंत्रण होते व रासायनिक कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचतो.

प्रकाश सापळा वापरणे – रात्रीच्या वेळी शेतात २०० वॅटचा दिवा लावून त्याखाली रॉकेलमिश्रित पाण्याचे घमेले ठेवल्यास रात्रीच्या वेळी दिव्याकडे आकर्षित होणारे कीटक मरतात.

मेलेल्या कीटकांमध्ये हानीकारक कीटकांच्या संख्येवरून त्यांच्या प्रादुर्भावाचे भाकित करता येते व वेळीच उपाययोजना करता येते.

कामगंध सापळा वापरणे – सोयाबीन पिकावरील लष्करी अळी व शेंगा पोखरणारी अळी या किडीसाठी बाजारात कामगंध सापळे उपलब्ध आहेत. या सापळ्यात वरील किडींचे नरपतंग आकर्षित होतात व ते नष्ट करता येतात. किडींच्या जीवनक्रमात यामुळे असमतोल निर्माण झाल्याने कीड आटोक्यात येते. या सापळ्यांचा उपयोग किडींच्या प्रादुर्भावाचे भाकित करण्यासाठी देखील होतो.

रोगमुक्त बियाणांचा वापर – पेरणीसाठी रोगमुक्त शेतात अगर उत्तमरीतीने रोग नियंत्रण केलेल्या शेतात तयार झालेले बियाणे वापरावे.

कीड व रोगप्रतिकारक जातींचा वापर – कीड व रोगप्रतिकारक जातींचे बियाणे पेरणीसाठी वापरणे हा बचतीचा व सर्वांत परिणामकारक उपाय आहे. परंतु जास्त उत्पादन देणा-या जाती आहेत, याची खात्री करून मगच पेराव्यात.

परोपजीवी कीटक- यामध्ये परोपजीवी बुरशी, परोपजीवी कीटक व जिवाणू यांच्या वापराचा समावेश होतो. सोयाबीनच्या शेंगा पोखरणारी अळी या किडीच्या नियंत्रणासाठी टड्ढायकोग्रामा हे अंड्यावरील परोपजीवी कीटक व घातक लस, पाने खाणा-या अळ्यांवर बॅसिलस थुरीजिएन्सीस व बॅव्हेरीआ बॅसिआना या जिवाणूंची कीटकनाशके बाजारात उपलब्ध असल्याने त्यांचा वापर करणे शक्य झाले आहे.

पीकव्यवस्थापन पध्दतींचा सुयोग्य वापर – यामध्ये पिकासाठी लागणा-या अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा, जमिनीचा योग्य सामू (पी.एच. ६ ते ७) हेक्टरी झाडांची संख्या (४ ते ५ लाख प्रति हेक्टर) योग्य वेळी पाण्याची पाळी देणे, झाडांमधील योग्य अंतर, पेरणीची योग्य वेळ या सर्व बाबी किडी व रोगांमुळे होणारे नुकसान कमी करण्यास सहायक ठरतात.

रासायनिक कीटकनाशकांचा समतोल वापर – किडी व रोगांना अनुकूल हवामान मिळाल्यास त्यांचा पिकांवर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो. अशावेळी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी रसायनांचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात व योग्य पध्दतीने वापर करणे शहाणपणाचे ठरते. हानीकारक कीटकांची संख्या व त्यांच्यामुळे होणारी हानी यांचे प्रमाण ठराविक पातळीपेक्षा जास्त झाल्यास नियंत्रणाचे उपाय योजावे लागतात. निरनिराळ्या किडींसाठी संशोधन करून या पातळ्या निश्चित केल्या आहेत.

वरील सर्व बाबींचा विचार करून काटेकोरपणे रोग व किडींच्या नियंत्रणासाठी नियोजन करणे यालाच त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन असे म्हणतात.

पिकावरील किडी व रोगांची माहिती…

1) तंबाखूवरील पाने खाणारी अळी – अनुकूल हवामान मिळाल्यास या किडीचा फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होऊ शकतो. किडीचा मादी पतंग पानाच्या मागील बाजूस पुंजक्याने अंडी घालतो. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या सुरुवातीला समूहाने एकाच झाडाची पाने कुरतडतात. नंतर त्या सर्व शेतात पसरतात. कोवळ्या शेंगा असताना प्रादुर्भाव झाल्यास अळ्या शेंगा कुरतडून आतील दाणे खातात.

2) बिहार सुरवंट – ही कीड भारतात सर्वत्र आढळते.

सुरवातीस अळ्या एकाच झाडावर पुंजक्याने राहतात व पानांचे हरितद्रव्य खाऊन टाकतात. त्यामुळे पाने जाळीदार होतात. त्यानंतर अळ्या सर्व शेतात पसरतात व पूर्ण पाने खातात. किडीच्या अळ्या केसाळ असून प्रथम त्यांचा रंग पिवळा असतो व नंतर तो राखाडी होतो.

3) पाने पोखरणारी अळी – कमी पाऊस व कोरडे हवामान असल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीच्या अळ्या पानाच्या वरील बाजूस नागमोडी आकारात पाने पोखरत जातात व वाढ पूर्ण झाल्यावर तेथेच कोषावस्थेत जातात. एका पानावर एकापेक्षा जास्त अळ्यांचा हल्ला झाल्यास पान वाकडेतिकडे द्रोणाकार होते व नंतर सुकून गळून पडते.

4) पाने गुंडाळणारी अळी – सतत पाऊस व ढगाळ हवामान राहिल्यास या किडीचा उपद्रव वाढतो. किडीची अळी चकचकीत हिरव्या रंगाची असते व हात लावताच लांब उडून पडते. एक किंवा अधिक पाने एकमेकांना जोडून कडा पिवळ्या पडतात व पाने आकसली जातात.

5) मावा – ढगाळ व पावसाळी हवामानात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. कीड पानाच्या मागील बाजूस व खोडावर राहून रस शोषते. या किडीच्या अंगातून साखरेसारखा चिकट द्रव स्त्रवतो. त्यामुळे झाडावर काळी बुरशी वाढते.

6) शेंगा पोखरणारी अळी – ही प्रामुख्याने कपाशी, तूर, हरभरा या पिकांवरील कीड असून गेल्या काही वर्षांत सोयाबीन पिकावर जास्त प्रमाणात दिसून येऊ लागली आहे. किडीच्या अळ्या सुरुवातीच्या काळात पाने खातात. शेंगा भरण्याच्या काळात शेंगा पोखरून आतील दाणे कुरतडतात.

7) हिरवे तुडतुडे – या किडीची पिले व पूर्ण वाढ झालेले कीटक पानाच्या मागील बाजूस राहून रस शोषतात. त्यामुळे पानांच्या कडा पिवळ्या पडतात व पाने आकसली जातात.

8) हिरवा ढेकूण – ही कीड पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषते. सोयाबीन पिकाच्या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारास ही कीड मदत करते.

9) याखेरीज महाराष्ट्रात सोयाबीन पिकावर लाल मखमली अळी, उंट अळी, पांढरा भुंगेरा, करदोटा भुंगेरा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो.

10) पांढरी माशी – ही कीड पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषते.

*किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर -*

1) खोडमाशीच्या नियंत्रणासाठी १० टक्के दाणेदार फोरेट प्रति हेक्टरी १० किलो या प्रमाणात पेरणीपूर्वी जमिनीत मिसळावे. थोयोमेथोक्झाम या कीटकनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रियादेखील परिणामकारक आढळून आली आहे. 1)क्लोरअँट्रानिलीप्रोल 18.5एससी 2)इथिओन 50% ईसी 3) थायाक्लोप्रीड 21.7 एससी 4)टायझोफाॅस 40%ईसी5)इडोक्झाकार्ब ,15.8

2) पाने खाणा-या, पाने पोखरणा-या व गुंडाळणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 1)क्विनॉलफॉस २५ इ.सी. १.५ लिटर किंवा 2)क्लोरोपायरीफॉस २० इ.सी. १.५ लिटर किंवा 3)इथोफेनप्रॉक्स १० इ.सी. १ लिटर किंवा4) टड्ढायझोफॉस ४० इ.सी. ८०० मिली हेक्टरी 5)डायक्लोरव्हास 76 % 6)इडोक्झाकार्ब 15.8 7)कोराजन  8) इमामेक्टीन बेझाइट कीटकनाशकांची आलटूनपालटून फवारणी करावी. वरील कीटकनाशकांच्या भुकटीचादेखील हेक्टरी २०-२५ किलो या प्रमाणात धुरळणीसाठी वापर करावा.*सोयाबिन वरील रोग व्यवस्थापन*  महराष्टात सोयाबिन वर रोगाचे प्रमाण वाढत  चालले आहे. त्यामुळे आपणास रोगाची माहिती व्हावी…                    *1) चारकोल राॅट :*  हा (मॅक्रोफोमीना फॅसिओलिना) हा रोग जमिनीतून व बिजा द्वारे होतो…त्यामुळे कोरड्यामुळ्या सडण आणि खोड सुकून अथवा करपून जाते…                                     *या रोगामूळे 80% पर्यत उत्पन्नात घट येवू शकते…      जमिनीत  पाण्याच्या ओलावा, उष्ण वातावरण  या काळात रोगाचा प्रसार वेगाने होतो. …                        * रोपवस्थेत पिकाची मुळे कुजून मरतात व झाड वाळते ….                   *     हि बियाणे अंशता काळसर रंगाचे असते किंवा पडते…                   *सुरूवातीला रोप लालसर तपकिरी रंगाची दिसतात लालसर तपकिरी पट्टे जमिनीपासून वर दिसतात….-.                                                    *नियंञण :-* 1खोल नांगरणी  करावी 2 वे*काॅलर राॅट :-*  हा रोग (स्क्लेरोशियम रेस्फसी बुरशीमुळे होतो)   ** या बुरशीचा प्रसार मातीतून होतो… ** या रोगामुळे 30 ते 40% नुकसान होते… **  उगवण कमी होते..** वाढ खुटते …** झाडाच्या जमनिलगत खोडावर पांढ-या रंगाचे कापसासारखे धागे दिसतात. त्याच्यावर लालसर रोगपेशी दिसतात.खोडावर प्रदुर्भाव दिसतो झाडे सुकून झुकते व कोलमडते….                      *नियंञण :-*  1) पिकाची फेरपालट करणे 2) नांगरणी करणे 3) ओपेरा, हेडलाईन , अमिस्टार टीॅप एम-45 वापर करावा अवतार या बनरशीनाशकाचा फवारणीत वापर करावा 4) बिज प्रक्रिया करणे महत्वाचे आहे झेलोरा, व्हिटाक्स पावर , बाविस्टीन ,या पैकी एक 5) शेत तणमुक्त व स्वच्छता महत्वाची आहे बांध साफ आसावा….                                        *पाॅड ब्लाइट :-* (शेंगा वाळणे  अँथ्रॅकनोज) हा रोग  (कोलेक्टोट्रीम डिमॅटियम बुरशीमुळे होतो)  …** या बुरशीचा प्रसार बियाणे द्वारे होते *** जास्त तापमान जास्त आर्द्रता या रोगास पोषक असते वातावरणातील बद्दल झाल्या मुळे हा रोग होते…**** पिक फुलो-यात असताना फुलाची वाढ थांबते शेंगाची वाढ होत नाही खोड पाने विविध आकाराची लालसर गडद डाग किंवा ठिपके दिसतात.या वर काळे आवरण  चढते…   ***** या शेंगा पिवळसर दिसत हिरव्या दिसत नाहित त्या वाळतात त्यात दाणे भरत नाहीत…****** पाने  पिवळी तपकिरी होणे वाकडी होणे गळुण पडतात…                        *नियंञण::-* 1) पेरणीसाठी स्वच्छ साफ केले बियाणे पंजीकृत बियाणे वापरावे. वापरावे…2) रोगस्त झा़े प्लाट मधु  काढावे…3)  बिज प्रक्रिया करून पेरणी करावी..4) ओपेरा , स्कोर ,आमिस्टार,टाॅप, हारू स्वाधीन ,एम-45 या बुरशीनाशकाची फवारणी करावी 5)या रोगास कमी बळी पडणा-या जातीची निवड करावी….       *तांबेरा::-* रस्ट   हा रोगा फॅकोस्पोरा पॅचीरिझी बुरशीमुळे होतो. … * अधीक पाऊस झाला नंतर तापमान कमी झाल्यानंतर पानावर सतत 3ते4 तास ओलावा  असताना हा रोग होतोच… * *राञी चे व पाहटचे धुकेया मुळे हा रोग होतो …   * *-पानावर  लालसर तपतिरी भुरकट रंगाचे चट्ट पडतात..   ****- काही दिवसानी पाने पिवळसर लालसर दिसतात **–** सेयाबिन  चि पेर दाट झाल्यावर हा रोग दिसतो…  ****पानावर हात फिरवल्यावर पांढरट भुरकट रंगाची पावडर लागते…                                   *नियंञण ::-*  1) सोयाबिन पेरणी खुप दाट नको.. 2) रोग सहनसील जाती वापर करावा डि एस 228  , 61   3) हेक्झाकोनॅझोल, 5ईसी किंवा प्रोपीकोनॅझोल 25ईसी , (टिल्ट)  4) एम -45 चा वापर दोन ते तिन वेळस फवारणी तुन घ्यावा…5) शेताच्या कडेला धुर करावा…            *येलो मोझकईक ::-*  हा रोग एमबी वाय एम व्ही या विषाणूमुळे होतो.

🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »