माती परीक्षण
आवश्यकता असते . सामू PH ,विदयुत वाहकता EC,
चुनखड़ी CaCO3 , सेंद्रिय कर्ब Organic Carbon, नत्र N,
स्फुरद P, पालश K, कॉपर Cu, फेरस(आयर्न) Fe, झिंक
Zn, मॅगनीज् Mn, कॅल्शियम Ca, मॅग्निशियम Mg, सल्फर
S, सोडियम Na त्यापैकी एखादे जरी मातीत कमी
किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम लगेचच
झाडावर दिसून येतो जसे पाने पिवळी पडणे ,पान
गळणॆ ,शिरा सोडून इतर
पानांचा सर्व भाग वाळून जाणॆ इत्यादी लक्षणॆ
अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किवा अभावामुळे
वनस्पतीमध्ये दिसून येतात .अठरा अन्नद्रव्याशिवाय
पीकांची वाढ पूर्ण होत नाही . ती अन्नद्रव्ये
मिळता आपोआपच खुंटलेली वाढ परत सुधारते .
विशेषत: या अन्नघटकांचा वनस्पती वाढीच्या
एखाद्या जैविक कार्यात प्रत्यक्ष सहभाग असतो.
त्यामुळे माती परिक्षण करणॆ आवश्यक आहे .त्याद्वारे
शेतक-यांना समजेल की मातीत कोणत्या
अन्नद्रव्याचे प्रमान कमी आहे किंवा जास्त आहे .
माती परीक्षणचा उद्देश :-
१) मुख्य आणि महत्त्वाचा उद्देश म्हण्जे माती
परीक्षणावरुन जमीनीत पीक वाढीसाठी कोणत्या
अन्नद्रव्याची कमतरता आहे व ती कमतरता नाहीशी
करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे हे ठरवता येते.
२) माती परीक्षण व पीक उत्पादन यांच्या
संबंधावरून पीकांना जमीनीतून किती प्रमाणात
अन्नद्रव्ये मिळतात व कम्पोस्ट ,हिरवळीचे खत ,गांडूळ
खत इत्यादी खतापासून किती प्रमाणात अन्नद्र्व्ये
द्यावयास पाहिजेत ही माहिती मिळ्ते.
३) मातीच्या नमून्याचे प्रयोगशाळेत सामू PH ,
विदयुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3 , सेंद्रिय कर्ब
OC, नत्र N, स्फुरद P, पालश K, कॉपर Cu, फेरस
(आयर्न)Fe, झिंक Zn, मॅगनीज् Mn, कॅल्शियम Ca,
मॅग्निशियम Mg, सल्फर S, सोडियम Na यासाठी
परीक्षण केले जाते .
४) जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा
नाही ते समजते .
५) विद्राव्य क्षाराच्या प्रमाणावरून पीकांच्या
वाढीवर होणा-या परिणामाचा अंदाज होतो .
मातीचा नमुना घेण्याची पध्दती :-
१) जमिनीचा रंग ,चढ -उतार , खोली , खडकाळ
किंवा पाणथळ ठिकाणे निच-याची परिस्थिती
तसेच क्षारयुक्त
किंवा चोपण जागा इत्यादी बाबीचा विचार करून
शेताचे
निरनिराळॆ विभाग पाडावेत आणि प्रत्येक
विभागातून स्वतंत्रपणॆ प्रतिनिधीक नमूना घ्यावा .
२) मातीचा नमूना हा त्या शेतातील प्रतिनिधीक
नमूना असावा .कारण आपण शेतातून फक्त अर्धा ते एक
किलो माती परिक्षणासाठी वापरतो
.प्रतिनिधीक नमूना शेतातील ८-१0 वेगवेगळ्या
ठिकाणाहून जमा करावा .
३) नमूना घेताना गिरमीट किंवा स्टील इत्यादी
आणि एक स्वस्छ घमेले किंवा पोते वापरावे मातीच्या
पूष्ठभागावरील काडीकचरा बाजूला करून एका
शेतातील सुमारे १५ ठिकाणाहून १५ से .मी (1.5 फुट
कटाच्या ड्रिपचे पाणी पड़ते तेथील कटाच्या कोसवर
1.फुट समन्तर व् जमिनीच्या आत 1.5 फुट घ्यवा द्राक्ष
बागेसाठी ) खोली पर्यत मातीचा थर गोळा
करावा .
४) .खड्ड्यातील एका बाजूची साख्या जोडीची
माती वरपासून खालपर्यत खुरपी अथवा
फावड्याच्या साह्याने
घावी .प्रत्येक ठिकाणाहून साधारण पणॆ एक किलो
मातीचा नमूना घ्यावा .
५) प्रत्येक विभागातून सुमारे १५ ठिकाणचे मातीचे
नमूने करुन ते स्वस्छ पोत्यात किंवा घमेल्यात ठेवावेत.
मातीतील काडीकचरा काढून .ती चांगली एकत्र
करावी .या सर्व मातीचे सारखे चार भाग करुन
समोरा समोरचे दोन भाग घ्यावे. हे दोन भाग एकत्र
मिसळुन त्याचे परत चार भाग करावेत व स्मोरा
समोरच दोन भाग घ्यावेत .असे
शेवटी अर्धा ते एक किलो मिळेपर्यत करावे .ही
माती एका स्वच्छ कापडाच्या पिशवीत टाकावी .
शेतक-याचे नाव सर्वे नंबर बागायती /कोरडवाहू
अ) जमिनीचा प्रकार :(हलकी / मध्यम / भारी )
ब) चूनखडीचे प्रमाण (कमी /मध्यम /जास्त )
क) चिकन मातीचे प्रमाण : (कमी /मध्यम /जास्त )
जमीनीची निचरा शक्ती
जमीनीची खोली
ओलिताचे साधन
नमूना घेतल्याची तारीख
मागील हंगामात घेतलेली पिके ,त्यांचे उत्पादन
,वापर्लेली खते ,त्यांचे प्रमाण पुढील हंगामात
घ्यावयाची पिके ,त्यांचे वाण व अपेक्षीत उत्पादन.
मातीचा नमुना घेतांना घ्यावयाची काळजी
१) शेतातील जनावरे बसण्याच्या जागा, खत
साठवण्याची व
केरकचरा टाकण्याची जागा ,विहीरीचे
किंवा शेताचे बांध इ . जागेमधून मातीचे घेऊ नये.
२) मातीचा नमुना साधारणपणे पिकांची कापणी
झाल्यानंतर परंतु
नांगरणीपूर्वी घ्यावा .
३) शेतात पीक उभे असल्यास दोन ओळीतील
जागेमधून मातीचा नमुना घ्यावा.
४) वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा
निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू
नयेत
५) मातीचा नमुना घेण्यासाठी स्वच्छ आणि
कापडाच्याच पिशव्या वापराव्यात .
(रासायनिक खतांच्या ,सिमेंटच्या वापरु नयेत )
६) फळझाडासाठी जमिनीच्या खालील थरातील
प्रत्येकी ३० ते ९० से.मी .अंतरापर्यतचे नमुने घ्यावे
लागतात यासाठी गिरमीटचा उपयोग करावा .
फावड्याच्या सहाय्याने माती परीक्षण जमीनीची
रचना व डोळस गुणधर्म विचारात घेवून जमिनीची
सुपीकता तपासण्यासाठी ही पध्दत सोपी आहे.
फावड्याच्या सहाय्याने चराचा १५ से .मी .चा थर
बाजुला करुन नंतरऑगर किंवा स्टीलच्या साहयाने
माती नमूना गोळा करावा . आता यामध्ये आपण
मातीचे विविध थर पाहू शकतो .जसे ह्युमस ,
पोकळीची संख्या ,घनता ,मुळांची खोली
,गांडूळाच्या हालचालीने मातीवर पडलेली चिन्हे
आणि इतर जीवजंतू व जमीनीचा आतील भाग
मातीचा नमुना किती खोली पर्यत घ्यावा
पालाशचे कार्य –
* पाण्याचा ताण पडल्यास पिकास तग धरण्यास
मदत करणे.
* कीड-रोग प्रतिकार क्षमता वाढवणे.
* घडांचा तसेच मण्याचा आकार, रंग, चवीसाठी
महत्त्वाचे.
* द्राक्षात ऍस्कॉर्बिक आम्लाचे प्रमाण वाढविणे.
* द्राक्ष घडाचे आयुष्य वाढविणे.
* शर्करा, पिष्टमय व प्रथिने यांचे पिकामध्ये चलनवलन
वाढविणे.
कमतरतेची लक्षणे –
* पानाच्या कडा व टोके प्रथम पिवळसर पडून तो
भाग करपतो, वाळल्यासारखा दिसतो.
* घड लहान व घट्ट होतात.
* घड उशिरा तयार होतात.
* मणी एकसारखे पिकत नाहीत.
* घडाचे वजन कमी होते.
पालाशयुक्त खते वापरण्याच्या पद्धती –
1) द्राक्षपिक पालाश अन्नद्रव्य k + स्वरूपात
मुळांवाटे घेते. बाजारामध्ये उपलब्ध पालाशयुक्त
खतांमध्ये K2O स्वरूपात आढळतो. साधारणपणे म्युरेट
ऑफ पोटॅश (KCI) व सल्फेट ऑफ पोटॅश (KSO4) ही घनरूप
खते बाजारामध्ये उपलब्ध आहेत.
2) सल्फेट ऑफ पोटॅश हे खत वापरणे फायदेशीर ठरते.
कारण द्राक्षपिकावर क्लोराईडचा विपरीत
परिणाम होतो.
3) घनरूप खते देताना, शक्यतो भारी जमिनीमध्ये
छाटणीच्या वेळी (एप्रिल किंवा ऑक्टोबर
महिन्यात) एकाच वेळी द्यावीत. हलक्या
जमिनीमध्ये घनरूप खते दोन वेळेस विभागातून द्यावीत.
एकदा छाटणीच्या वेळी व दुसऱ्यांदा घडांच्या
सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये ही खते द्यावीत.
4) पालाशयुक्त खते खोडाजवळ जमिनीच्या
पृष्ठभागावर टाकून मातीने झाकावीत. त्वरित
पाणी द्यावे.
5) घनरूप खतांपेक्षा ठिबक सिंचनातून द्यावयाची
द्रवरूप खतांचा उपयोग अधिक फायदेशीर आहे. द्रवरूप
खते ही 0ः0ः50, 0ः52ः34 तसेच 13ः0ः45 अशा
ग्रेडमध्ये उपलब्ध आहेत. द्रवरूप खतांचे आठवड्याचे
नियोजन करावे.
6) द्रवरूप खते ऑक्टोबर छाटणीनंतर बोद वाफशामध्ये
असताना 50 दिवसांपासून ते 120 दिवसांपर्यंत
नियोजन करून द्यावीत.
7) पालाशयुक्त जैविक खतांचा वापर द्राक्ष पिकात
करणे अत्यंत फायदेशीर आहे. अशी खते घनरूप व द्रवरूप
स्वरूपामध्ये बाजारात उपलब्ध आहेत. घनरूप खते
छाटणीच्या वेळेस सेंद्रिय खतांसोबत द्यावीत. तसेच
द्रवरूप खते ही ठिबक सिंचनातून सुलभरीत्या देता
येतात. बाजारामध्ये पालाशयुक्त जैविक खत’
वेगवेगळया नावाने उपलब्ध आहेत. जमिनीतील स्थिर
झालेला पालाश उपलब्ध करून देण्याचे कार्य ही
जैविक खते करतात, त्यामुळे रासायनिक खतांचा
मर्यादित वापर होऊन बचत साधते.
8) माती व पाणी परीक्षणानुसार घनरूप तसेच द्रवरूप
खताच्या मात्रा तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवावीत.
वाढवा पालाशयुक्त खतांची कार्यक्षमता –
1) पालाशयुक्त खते देण्यापूर्वी बोद विळ्याच्या
साह्याने चाळावा.
2) अधिक कार्यक्षमतेसाठी सेंद्रिय पदार्थ, पालाश
पुरविण्यास मदत करणारे जैविक खत व द्रवरूप खतांचा
वापर करावा.
3) खते देण्यापूर्वी बोद वाफशामध्ये असावा. द्रवरूप
खते सायंकाळी द्यावीत.
4) घनरूप खते हलक्या जमिनीत विभागून तर भारी
जमिनीत एकाचवेळी द्यावीत. शेतीच्या खर्चातील
एक प्रमुख बाब आहे खतांवरील खर्च. फ़क्त रासायनिक
ख़त वापरण्या ऐवजी एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीचा
वापर केल्यास हा खर्च कमी करता येवू शकतो.
१) माती आणि पाणी परीक्षण नुसार उपलब्ध
अन्नद्रव्यांचे प्रमाण, कमतरता असलेली अन्नद्रव्ये
इत्यादींचे योग्य निदान करूनच खतांचा वापर
फायदेशीर ठरतो.
२) ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य
स्वरूपाची खते पिकाच्या गरजेनुसार दिल्यामुळे
अन्नद्रव्यांची कार्यक्षमता खूप मोठ्या पटीने
वाढविता येते. खताचा योग्य प्रकार, गरजेनुसार
मात्रा, वापरण्याची योग्य पद्धत, ठिकाण आणि
योग्य वेळ इत्यादी बाबींचे काटेकोर पालन करून
अन्नद्रव्यांचा पुरवठा शाश्वत शेतीसाठी गरजेचा
आहे.
३) जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या दृष्टीने
एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीस फार महत्त्व आहे. सध्या
रासायनिक खतांच्या अयोग्य आणि जास्त
वापरामुळे आणि सेंद्रिय खतांच्या अभावामुळे
जमिनीच्या सुपीकतेत मोठी घट येऊन अन्नद्रव्यांच्य
ा प्रमाणात तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी
आणि अन्नद्रव्यांचा भविष्यातील ऱ्हास
थांबविण्यासाठी विविध पिके आणि पीक
पद्धतींना एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीनुसार
नियोजनबद्ध खत व्यवस्थापन करण्याची गरज आहे.
सुपीक जमिनींवर खतांना प्रतिसाद योग्य मिळतो
आणि घटक उत्पादकतेत वाढ होऊन खर्चात बचत होते.
४) पिकांच्या गरजेएवढ्या अन्नद्रव्यांच्या मात्रेचा
पुरवठा जमिनीतून खते वापरूनच करावा लागतो.
५) फवारणी पद्धतीने अतिशय अल्प प्रमाणात
अन्नद्रव्ये पुरविली जातात; विशेषतः कमी
प्रमाणात लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी ती
योग्य ठरते.
६) काही विशिष्ट परिस्थितीत जमिनीतील
खतांचा पुरवठाच होत नसेल. उदा. पाणथळ जमिनी,
चुनखडीयुक्त जमिनी इत्यादीमध्ये फवारणीचा वापर
फायद्याचा ठरतो. उभ्या पिकावरील काही
अवस्थां मध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता
जाणवल्यास लगेच फवारणी पद्धतीने पुरवठा करता
येतो. फवारणी पद्धतीनुसार अन्नद्रव्यांची
कार्यक्षमता खूप वाढविता येते; परंतु तिच्या
मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात.
७) शाश्वत शेतीसाठी जमिनीची सुपीकता टिकवून
ठेवण्यासाठी आणि पीक उत्पादकता शाश्वत ठेवून
पोषणमूल्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी सदर
पद्धतीनुसार अन्नद्रव्यांचे काटेकोर व्यवस्थापन गरजेचे
आहे.
८) पिकांची घटत चाललेली उत्पादकता, अन्नातील
पोषणमूल्यांची कमी, शेतीतील खर्चातील वाढ,
कीड व रोगांच्या वाढत आलेल्या समस्या, फळे,
भाजीपाल्याची गुणवत्ता व दर्जा, सेंद्रिय
निविष्ठांची टंचाई, सिंचनाच्या अपूर्ण सोई-
सुविधा, अवर्षणामुळे वाढणाऱ्या पाणी आणि
अन्नद्रव्यांच्या जमिनीतील समस्या, खालावलेली
जमिनींची सुपीकता इत्यादी समस्या युक्त
बाबींमध्ये गुंतलेली शेती शाश्वत ठेवण्यासाठी योग्य
व्यवस्थापन पद्धतींची गरज आहे.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन बाबी:
कंपोस्ट व गांडूळ खत प्रक्रियेद्वारे वनस्पतीचा
पालापाचोळा व टाकाऊ पदार्थांचा
अन्नद्रव्यांसाठी पुर्नउपयोग करणे.
नत्र, स्फुरद व पालाशची उपलब्धता
वाढविण्यासाठी जैविक खतांचा वापर करणे.
हिरवळीची खते, निळे हिरवे शेवाळ आणि
अझोलाचा पिकांसाठी उपयोग करणे.
पीक फेरपालट व आंतरपीक पद्धतीमध्ये द्विदल
वनस्पतींचा समावेश करणे.
शेतातील टाकाऊ काडी कचऱ्यापासून कंपोस्ट करून
त्याचा वापर करणे. पीक अवशेषाचा (उसाचे पाचट,
गव्हाचे काड, इत्यादी) जागच्या जागी कुजवून पीक
अन्नद्रव्यासाठी वापर स्फुरद चे कार्य –
1) प्रकाश संश्लेषण क्रियेत अत्यंत गरजेचे.
2) पिकात अन्ननिर्मितीसाठी गरजेचे.
3) बीज आणि फळ निर्मितीसाठी गरजेचे.
4) उर्जा निर्मिती, साठवणुक
आणि वापरासाठी गरजेचे.
5) पेशी विभाजन आणि पेशी तयार होण्यात गरजेचे.
6) प्रथिने, संप्रेरके, न्युक्लिक असिड, आणि डि.एन.ए.
चा घटक.
स्फुरदचा पिकाच्या रोग व किड नियंत्रणात ठळख
असे
कार्य असल्याचा उल्लेख कोठेही आढळुन येत नाही.
मुख्यत्वे करुन जमिनीत फारच कमी प्रमाणात स्फुरद
उपलब्ध स्वपरुपात आढळुन येतो. कोठल्याही वेळेस
जमिनीत पिकास उपलब्ध स्फुरदचे प्रमाण इतक्या कमी
अंतरात हालचाल करते. पिकाची मुळे
त्वरील २ ते २.५ मि.मी. इतक्या परिसरातील स्फुरद
शोषुन घेतात, आणि अजुन स्फुरद हवा असल्यास
त्यांना त्वरीत नविन जागेत वाढणे गरजेचे आहे.
पिकास द्यावयाच्या स्फुरद स्वरुपास P2O5 खतांत
आढळुन येत
नाही
1 पी.पी.एम. म्हणजे Parts per milion मिलीलीटर
प्रति 1 किलो किंवा 1 लीटर = 1 पी.पी.एम.
जमिनिचि सुपिकता / सेंद्रिय कर्ब
सेंद्रीय कर्ब
जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा अनेक प्रकारच्या
स्वरूपात दिसून येतो. जमिनीत सूक्ष्म जीवाणु त्यांचे
विघटन करीत असतात.या विघट्नातुन जे नवीन सेंद्रिय
पदार्थ तयार होतात ते बऱ्याच प्रमाणात स्थिर
स्वरुपाचे असतात. वैद्न्यानिक अर्थाने आपण त्यांना
ह्युमस असे नाव् देतो. हयुमसयुक्त सेंद्रिय पदार्थ चार
घट्कांमध्ये विखुरलेला असतो. त्याला ह्युमिक
आसिड, फुलविक अॅसीड, ह्युमिन व् हेमाटोमेलानिन
या नावाने संबोधले जाते. यांचे प्रमाण वेगवेगळे असते
त्यामुळे जमिनीच्या गुणधर्मावर व अन्न्द्रव्य
शोषणावर वेगावेगले परिणाम दिसून येतात.
ह्युमसमुळे भौतीक रासायनिक व जैविक
गुणधर्मात क्रांतिकारी बदल होतात.या बदलामुले
जमिनिनिची सुपिकता पातली तर वाढ़तेच पण त्या
बरोबरच तिची उत्पादन क्षमताही वाढते.
महाराष्ट्रातिल हवामान तसे उष्ण असलेणे
जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी सतत कमी होंत
असते आणि ती 0.6 च्या आसपास स्थिरवते. ही
पातळी 0.8 च्या वर असावी. पण तसे पातळी गाठणे
खुप जिकिरिचे असते.
सेंद्रिय कर्बाची पातळी योग्य ठेवाणेसाठी सेंद्रिय
खते मुबलक पुरवावित.
शेणखत,कम्पोष्ट ख़त, गान्डुल ख़त, अखाध्य पेंडीचे
मिश्रण, लेंडी ख़त, पोल्ट्री ख़त इत्यादि आणि या
शिवाय अति महत्वाचे म्हणजे हिरवळिचे ख़त होय.
आणखिणहि आपापल्या परिसरात उपलब्ध असणारे
सेंद्रिय खते जमिनिस योग्य प्रमाणात पुरवावित.
महत्वाचे- सेंद्रिय कर्बामुळे जिवानुंचि संख्या आणि
कार्यक्षमता सुधारते आणि अन्न घटकाचे उपलब्धिकरन
मोठ्या प्रमाणात होत. उत्पादन वाढीसाठी या
बाबी अत्यंत महत्वाच्या आहे.~
मँगंनीज चे पिकातील कार्य –
प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डाय ऑक्साईडचे रुपांतर
शर्करेमध्ये होण्यात कार्य करते. हरीत लवक निर्मितीत
आणि नायट्रेट असिमिलेशन (वापर) मध्ये कार्य करते.
कॅल्शियम आणि बोरॉन सोबत पेशी विकसित
होण्यासाठी आवश्यक
राबोफ्लॅविन, अस्कोर्बीक असिड, आणि कॅरोटीन
तयार करण्यात गरजेचे आहे.
प्रकाश संश्लेषण क्रियेत ईलेक्ट्रॉन ची देवाण घेवाण
करण्यात गरजेचे आहे. तसेच पाण्याचे विघटन करण्यात
गरजेचे आहे.
मँगनीज पिकास उपलब्ध होण्यावर परिणाम करणारे
घटक –
जमिनीचा सामु – मातीचा जास्त सामु (पीएच)
मँगनीजची उपलब्धता कमी करते, तर कमी सामु वाढवते.
सेंद्रिय पदार्थ – जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ
असलेल्या जमिनीत मँगनीज त्या पदार्थांसोबत
स्थिर होते व त्याची कमतरता जाणवते.
मँगनीज फेरस संबंध- जास्त प्रमाणातील फेरस (लोह)
मँगनीजची उपलब्धता कमी करते.
मँगनीज सिलिकॉन संबंध – सिलिकॉनच्या वापराने
मँगनीजची विषबाधा कमी करता येते.
नत्राच्या कमतरतेमुळे मँगनीजची उपलब्धता कमी होते.
मँगनीज चे विविध स्रोत –
प्रकार मँगनीजचे प्रमाण
मँगनीज सल्फेट 23-28%
मँगनीज ऑक्साईड 41-68%
चिलेटेड मँगनीज 5-12%
★सुक्ष्म अन्नद्रव्याचा वापर★
मायक्रोन्युटन खताचा वापर जमिनित होतो
त्यावेळेस अतिशय वेगाने ते मातितील कणावरति
प्रतिक्रिया दाखवतात.शिवाय जमिनित असलेले
क्षार बरोबर त्याची अभिक्रिया घडवुन येते
☆फेरस :-
कॅलशियम कारबोनेट (चुनखडी) असलेल्या जमिनित
फेरसची कमतरात निर्माण होते. अमोनियम नत्राचा
वापर झाल्यासही फेरसचि मागणि झाडात
निर्माण होत असते.जास्त तण असणारया बागामध्ये
वापरल्या जाणा-या अन्नद्रव्या मध्ये फेरस हे एक
अन्नद्रव्य आहे. पी.एच ७.५ च्या पुढे असल्यास EDDHA
चागले काम करते.
☆मॅग्निज:-
मॅग्निज हे ही जमिनित लवकर प्रतिक्रिया देणारे
न्युट्रन असुन त्याची जमिनितिल निगेटिव्ह चार्च
असलेल्या जमिनित प्रतिक्रिया जलद गतीने होते.
मॅग्निज खताची विद्राव्यता त्याच्या परिणामा
वरती अडसर ठरते.
☆बोरान:-
मुळी वाढ साठी किवा पिक वाढिच्या काळात व
फुलधारणेच्या काळात बोरान म्हत्तवाची भुमिका
बजावते. शिवाय कॅलशियमच्या वाहुतिकीसाठी
बोरनचा म्हत्तवपुर्ण हि झाडामध्ये असते.
☆झिंक:-
जास्त पी.एच असलेल्या जमिनित ह्याची कमतरात
जाणवत असते शिवाय कमि प्रमाणात सद्रिय पदार्थ
जमिनित असल्यास किवा वापसा स्थिति नसल्यास
हे अन्नद्रव्य उपल्बधतेवर परीणाम होत असतो. किवां
मुळाची कमी वाढ हे ही एक कारण हे अन्नद्रव्य उपलब्ध
तोवर परिणाम करते.
☆मॉलिब्डेनम:-
ह्या अन्नद्रव्याचा मुख्य हेतु हा नायट्रेला झाडामध्ये
शिरकाव करू वा प्रवाही बनु देणे होय
☆कॉपर:-
कॉपर हे अन्नद्रव्य अतिशय कमी प्रमाणात वनस्पतीना
अवश्यक असले तरी जमिनीतिल ७ च्या पढिल पी.एच,
जमिनितील कमि सेद्रिय पद्रार्थ ,कमि मुळाचि
वाढ ह्यामुळे झाडामध्ये ह्या अन्नद्रव्याची गरज
निर्माण करते.
मायक्रोन्युटन पी.एच नुसार असलेली उपल्बधता
फेरस ४.० ते ६.५
मॅग्निज ५.० ते ६.५
झिंक ५.० ते ७.०
कॉपर ५.० ते ७.५
बोरान ५.० ते ७.५
मॉलिब्डेनम ७.० ते ८.५
सध्य स्थितित जमिनिचा वाढता पी.एच बघता
सल्फेट फॉर्म बघता चिलेट हा फार्म जास्त फायदेशीर
ठरतो किवा सल्फेट फॉर्म हा शेणकाल्यातुन चागंला
वापरात येऊ शकत एवढ असले तरी मायक्रोन्युट्रंन
देण्याच्या अावस्था जमिनीतील मुळाची वाढ
वापसा स्थिति ह्याही महत्वाच्या ठरतात.
माती परीक्षण करुन पिकाना खतांची मात्रा द्या.
संपूर्ण माहिती व मार्गदर्शन केले