तुर : पाणी व किड व्यवस्थापन..

0

तूर हे कडधान्य पीक बहुतांशी पावसाच्या पाण्यावरच येते तथापि पाऊस कमी झाला असल्यास आणि पिकास पाण्याचा मोठा तान पडलेला दिसून आल्यास खालीलप्रमाणे पाण्याचे नियोजन करावे.

पहिले पाणी – पिकास फुलकळी लागताना

दुसरे पाणी – पीक फुलोऱ्यात असताना पण जास्त फुले असल्यास टाळावे

तिसरे पाणी – शेंगांमध्ये दाणे भरताना शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावि. खते व पाणी यांचा अवाजवी वापर टाळावा.

आंतरमशागत व पीक संरक्षण :

पहिल्या वीस दिवसात एक कोळपणी व खुरपणी करावी. त्यानंतर पिकास फुलकळी लागताच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी घावी. यानंतर 10ते 15दिवसांनी हेलिओकील (10 मि. लि. प्रति 10 लिटर पाण्यात ) या जैविक *कीडनाशकाची फरवानी* करावी. आवश्यकतेनुसार तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीनंतर 10ते 15 दिवसांनी ट्रेसर स्पिनोसॅड 8 मिलि. प्रति 15 लिटर पाण्यात म्हणजेच 200 मिलि प्रतिहेक्टर किंवा फेम किंवा फेनास की फ्लूबेंडिअमाईन दोन मिलि प्रति 1 लिटर पाण्यात म्हणजेच 100 मिलि प्रतिहेक्टर या प्रमाणे फवारावे आम्लीगो 10मि15पाणी कोराजन 7मि 15लि पाणी. शेतामध्ये हेक्टरी 10 ते 12कामगंध (फेरोमोन ट्रॅप्स ) सापळे लावावेत.

🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »