काजीसांगवी विद्यालयाचा दहावीचा निकाल 100%

2

यशस्वी वाटचाल जनता विद्यालय काजी सांगवी

काजीसांगवी (पत्रकार: उत्तम आवारे) :काजीसांगवी  विद्यालयाचा दहावीचा निकाल 100%

 लागला आहे. विद्यार्थ्यांनी घवघवीत यश  संपादन केले.

उत्तीर्ण विद्यार्थ्यां मध्ये प्रथम क्रमांक चव्हाण उर्मिला विक्रम( 92.80 %) द्वितीय क्रमांक आहेर तेजस्विनी पंढरीनाथ (91.60 % ) तृतीय क्रमांक ठाकरे प्रतीक्षा शहाजी  (91.20%) चतुर्थ क्रमांक ठाकरे स्नेहा साहेबराव (89.40%) पाचवा क्रमांक शिंदे अक्षदा प्रकाश  (88.80%) , व जाधव पियुष भास्कर

इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यालयातून एकूण 81विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी  

23 विद्यार्थी है विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेत 35 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर 21 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे म.वि.प्र.सरचिटणीस मा.श्रीमती नीलिमाताई पवार,चांदवड तालुका ‘ मविप्र ‘ संचालक माननीय उत्तमबाबा भालेराव तसेच शालेय  समिती अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट श्री दिनकरराव ठाकरे , उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष श्री. सुनील ठाकरे व शालेय समितीचे सर्व सदस्य, विद्यालयाचे  मुख्याध्यापक  श्री.न्याहारकर सी .डब्ल्यू.प्रभारी पर्यवेक्षिका सौ. पाटील एम.एस.तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.💐💐💐💐💐

2 thoughts on “काजीसांगवी विद्यालयाचा दहावीचा निकाल 100%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »