पिकांसाठी सॉईल कल्चर – किफायतशीर पर्याय

1

पिकांसाठी सॉईल कल्चर – किफायतशीर पर्याय

अनंतवर्षा फाऊंडेशनचा सामाजीक उपक्रम ad

मातीमधील सूक्ष्मजीवांचे प्रमाण मातीच्या एकूण वस्तुमानाच्या १ % पेक्षा कमी असते. तरीही हे सूक्ष्मजीव मातीमध्ये वाढणार्‍या वनस्पतींचे व परीणामी त्यावर अवलंबून असणार्‍या  प्राण्यांचे आधारस्तंभ म्हणून कार्यरत असतात. सूक्ष्मजीवांच्या मातीमधील सक्रीयतेमुळे मातीची संरचना, हवा खेळती रहाणे, पाणी मुरणे आणि जलधारणा या क्षमतांवर सकारात्मक परीणाम होतो. वनस्पती आणि सूक्ष्म जीवांचे सहजीवन जमिनीखालील तसेच जमिनीवरील जीवसृष्टीसाठी फायदेशीर असते.

आधुनिक शेतीच्या विविध पद्धतींमुळे मातीमधील या सूक्ष्मजीवांची संख्या व कार्यक्षमता कमी होत असून त्यामुळे मातीमधील सेंद्रीय कर्बाच्या प्रमाणामध्ये लक्षणीय घट दिसून येत आहे. 

ह्या परिस्थीतीला तोंड देण्यासाठी जमिनीतील हितकारक सूक्ष्म जीवांची संख्या व कार्यक्षमता वाढवणे आधुनीक शेतीसाठी आवश्यक झाले आहे. 

मातीमधील फायदेकारक सूक्ष्म जीवांचा जमीनीच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करुन सॉईल कल्चर विकसीत करण्यात आले आहे. जमीनीचे आरोग्य परत मिळवण्यासाठी आवश्यक अशा मातीमधील सूक्ष्म जीवांचे प्रमाण व कार्यक्षमता सॉईल कल्चरमुळे वाढीस लागते.

सॉईल कल्चरचे फायदे:

  1. सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते.
  2. जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारते.
  3. सेंद्रिय कर्बाचे पुनर्नवीकरण होऊन अन्न्द्रव्यांची उपलब्धता वाढते.
  4. अन्न्द्रव्य शोषणासाठी आवश्यक मुळांची संख्या वाढवते.
  5. जमिनीतील हानिकारक रसायनाचे विघटन होते.
  6. कीड व रोगांचे प्रमाण कमी होते.
  7. पिक वाढीसाठी आवश्यक द्रव्यांची निर्मिती वाढवते.

वापरण्याची पद्धत:

सॉईल कल्चरचे एकरी प्रमाण १०० मीली असून परीस्थीतीनुसार वेगवेगळ्या प्रकारे याचा वापर करता येतो.

बीज प्रक्रीया:- १०० मीली सॉईल कल्चर थंड गुळाच्या द्रावणामधून बियाण्यास चोळावे. बियाणे सावलीत सुकवून नंतर पेरणी करावी.

बेणेप्रक्रीया:- (ऊस / हळद / आले इ.) १०० मिली सॉईल कल्चर + ३-४ किलो गूळ २०० लीटर पाण्यात मिसळून बेणे १०-१५ मिनिटे या द्रावणात बुडवून लागवड क्ररावी. उरलेले द्रावण शेतामध्ये पाण्यासोबत पसरवावे. 

रोपेप्रक्रीया:- १०० मीली सॉईल कल्चर + ३-४ किलो गूळ २०० ली. पाण्यात मिसळून रोपांची मुळे ५ मिनिटासाठी या द्रावणात बुडवून रोपे लागवड करावी. उरलेले द्रावण शेतामध्ये पाण्यासोबत पसरवावे.

आळवणी:- १०० मीली सॉईल कल्चर + ३-४ किलो गूळ २०० ली. पाण्यात मिसळून रात्रभर भिजवून झाडांच्या मुळाशी द्यावे.

ठिबक सिंचनामधून:- १०० मीली सॉईल कल्चर + ३-४ किलो गूळ २०० ली. पाण्यात मिसळून रात्रभर भिजवून २०० ली. पाण्यातून ठिबक सिंचनामार्फत सोडावे.

जमीनीवर फवारणी:- १०० मीली सॉईल कल्चर + ३-४ किलो गूळ २०० ली. पाण्यात मिसळून रात्रभर भिजवून २०० ली. पाण्यात मिसळून ओल्या जमीनीवर फवारावे.

पाटपाण्यातून: १०० मीली सॉईल कल्चर + ३-४ किलो गूळ २०० ली. पाण्यात मिसळून रात्रभर भिजवून २०० ली. पाण्यात मिसळून नळीद्वारे वाहत्या पाण्यात मिसळावे. 

फोकून: १०० मीली सॉईल कल्चर १०० किलो कंपोस्ट/ पेंडीमध्ये मिसळून शेतामध्ये फोकावे व लगेच पाणी द्यावे.


सॉईल कल्चरचा १ एकरचा डोस वितरणासाठी फक्त रू. १०० मध्ये आता उपलब्ध असून बुकींगसाठी साठी ७५८८१०८८३७ (फक्त व्हाट्सअॅीप) या क्रमांकावर संपर्क साधा.

बुकींगसाठी साठी येथे किल्क करा

 ——————————————————————————————————————

  

1 thought on “पिकांसाठी सॉईल कल्चर – किफायतशीर पर्याय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »