कापुस पिकामधील सापळा पिके

0
कापुस पिकामधील सापळा पिके
कापूस पिकाचे नियोजन,कापुस पिक,कापुस पिकांचे नियोजन,कापुस पिकाची सविस्तर माहिती,कापुस पिक पद्धत माहिती,कापूस लागवड,मका पिकावरील कीड,मका पिकावरील अळी,कापूस पिकावर लिओसिन,कामगंध सापळे,कापूस पिकांवर फवारणी,कोणत्या देशात कापूस पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होते,मका पिकावरील लष्करी अळी,मका पिकावरील कीड नियंत्रण,कापुस पातेगळ व उपाययोजना,प्रकाश सापळे,कापूस फवारणी,भेंडी पिकातील एकात्मिक किड आणि रोग व्यवस्थापन,कापूस एकात्मिक किड व्यवस्थापन,कपाशी पिकावरील रोग व्यवस्थापन,कापूस फवारणी वेळापत्रक
परभक्षी कीटकांची संख्या वाढवण्यासाठी सापळा पिक म्हणून मका व बाजरी या
पिकांची शेताच्या कडेने एक ओळ पेरा.
भविष्यातील धोक्यांपासून वाचण्यासाठी कापसामध्ये कापुस:ज्वारी:तूर:ज्वारी
6:1:1:1 किंवा 3:1:1:1 याप्रमाणात आंतरपिकांची लागवड करावी

कापसाच्या 10 ओळींनंतर एरंड किंवा झेंडूची एक ओळ लावावी,ज्यामुळे रस शोषक
किडी व अन्य किडी त्याकडे आकर्षक होतील व हि पिके सापळा पिकांची भूमिका
निभावतील.
कोरडवाहू शेतीमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी मोकळ्या ओळींमध्ये उडीद किंवा
मुगाची 3-5 किलो/एकर याप्रमाणात पेरणीनंतर 30 दिवसांनी लागवड करा.
जमिनीची तयारी
1.बुरशीजन्य रोग व किडींच्या नियंत्रणासाठी शेताची नांगरणी उन्हाळ्यामध्ये करून जमीन चांगली तापून द्यावी,यामुळे बुरशीजन्य रोगांचे व किडींचे जिवाणू नष्ट होतात.
2. शेताची नांगरट उताराच्या काटकोनात करावी,त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडवला जावून पाणी शेतामध्ये मुरण्यास कालावधी मिळेल.
3. पिकाची लागवड करण्यापूर्वी शेताची खोल नांगरट करून शेताची स्वच्छता करावी,तसेच माती परिक्षणाच्या अहवालानुसार खतांचे व पिकाचे नियोजन करावे.
4. लागवडीपूर्वी शेताच्या बांधाची स्वच्छता करून घ्यावी,तसेच किडींना संरक्षण देणारे गवत जसे कि, जंगली भेंडी यांचे नियंत्रण करावे.
जाती
चांगल्या जाती:मल्लिका बीटी, रासी BG 2, विक्रम-5, अजित-155, डॉक्टर सीड्स, सोलर 76, रासी 656, RCH2, अंकुर-जय इत्यादी.
बीज प्रक्रिया
1.पेरणीपूर्वी बियाण्यास Dentatsu or  थायरम 3gm/kg बियाणे याप्रमाणात
बीजप्रक्रिया करावी.
  2. मुळ्यांच्या चांगल्या वाढीसाठी मुळांची वाढ उत्तेजक (रॅलीगोल्ड) 1gm +
ट्रायकोडर्मा व्हिरिडी 4gm + स्यूडोमोनास 10gm/kg बियाणास लावावे.
  3. सुरवातीच्या काळात येणा-या जिवाणूजन्य पानांवरील ठिपक्यांच्या
नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसाइक्लिन 15gm / 15Ltr पाण्याच्या द्रावणात बियाणे 20
मिनिटे भिजत ठेवावे.
  4. कमी पावसाच्या प्रदेशात चांगली उगवण होण्यासाठी बियाणे पोटेशियम क्लोराइड
20gm/Ltr पाणी याप्रमाणात घेवून 650 मिली द्रावण तयार करून त्यामध्ये 10 तास
भिजत ठेवून सुकवावे.
  5. रसशोषक किडीपासून संरक्षण करण्यासाठी इमीडाक्लोप्रिड 70 WS @ 7.5 gm /
kg  किंवा थायमेथोक्सॅम 2.8gm/kg सोबत बीजप्रक्रिया करा.
1.जर पाण्याची सुविधा असेल तर चांगल्या वाढीसाठी व विकासासाठी कापसाची लागवड मे महिन्याच्या दुस-या पंधरवड्यात किंवा जुन महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.
2. लागवड दक्षिण-उत्तर केल्याने पिकाला चांगला सूर्यप्रकाश मिळतो,तसेच पिकाच्या वाढीला व विकासाला चालना मिळते.
3. कापसाचे बियाणे महाग असते त्यामुळे बियाणे 4-5 सें.मी. खोलीवर हाताने लावावे.
लागवडीचे अंतर
– भारी जमिनीत कमीतकमी 6-7 X 2
-मध्यम जमीनत कमीतकमी 5-6 X 1.5-2 फुट ठेवावे(शक्यतो जोडओळ पध्दतीने लागवड करावी)
जेणेकरुन सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील.
यासाठी प्रती एकर 500-600 ग्रॅम बियाणे लागते.
पिक पोषण जैविक खते
पेरणीच्या 10 दिवस आधी 10-12 टन शेणखत प्रती एकर देवून मातीने झाकून घ्यावे,ज्यामुळे खताचा उन्हाशी संपर्क येणार नाही.लवकर खत दिल्याने पोषक तत्वांचे विघटन होवून फायदा होतो.
रासायनिक खते
1.बागायती कापसामध्ये 24 नत्र ( 125 किलो यूरिया ) + 20 किलो स्पुरद (125 किलो SSP ) + 10 किलो पोटॅश ( 16 किलो MOP ) प्रती एकर लागवडीच्या वेळी द्यावे.
2.कोरडवाहू कापसामध्ये 24 नत्र ( 120 किलो यूरिया ) + 16 किलो स्पुरद (100 किलो SSP ) + 10 किलो पोटॅश ( 16 किलो MOP ) प्रती एकर लागवडीच्या वेळी द्यावे.
3. कोरडवाहू कापसामध्ये चांगल्या वाढीसाठी लागवडीनंतर 25 दिवसांनी 12 नत्र ( 60 किलो यूरिया ) + 8 किलो स्पुरद (50 किलो SSP ) + 10 किलो पोटॅश ( 16 किलो MOP ) प्रती एकर द्यावे.
4. बागायती कापसामध्ये चांगल्या वाढीसाठी लागवडीनंतर 25 दिवसांनी 12 नत्र ( 60 किलो यूरिया ) + 10 किलो स्पुरद (62 किलो SSP ) + 10 किलो पोटॅश ( 16 किलो MOP ) प्रती एकर द्यावे.
5.कोरडवाहू कापसामध्ये चांगल्या वाढीसाठी लागवडीनंतर 50 दिवसांनी 12 नत्र ( 60 किलो यूरिया ) + 10 किलो पोटॅश ( 16 किलो MOP ) प्रती एकर द्यावे.
6. लागवडीनंतर 75 दिवसांनी चांगल्या वाढीसाठी व विकासासाठी 12 नत्र ( 60 किलो यूरिया ) + 10 किलो पोटॅश ( 16 किलो MOP ) प्रती एकर द्यावे.
7. नत्राच्या कमतरतेमुळे उत्पादनात 50% घट होते,त्यासाठी सुक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण 5 किलो+ बोरॅक्स 5 किलो लागवडीच्या वेळी प्रती एकर द्यावे..
विद्राव्य खतांचे वेळापत्रक. 
1.बोंडांचा विकास होण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (13:0:45) 150 ग्रॅम/15 लिटर पाण्यातून 8 दिवसांच्या अंतराने 3 वेळा बोडांचा विकास होत असताना फवारा आणि कॅल्शियम नाइट्रेट 225 ग्रॅम/15 लिटर पाण्यातून बोडांचा विकास होत असताना फवारा.
हे नत्र शोषण्याची शक्ती वाढवते.
2. कमी पावसात बोंडांचा आकार वाढवण्यासाठी 100 ग्रॅम 0:52:34 + 30 मिली हुमिक एसिड 15 लिटर पाण्यातून 10 दिवसांच्या अंतराने 3 वेळा फवारा.
3.बोंडांची चांगली वाढ व आकार वाढवण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश (0:0:50) 100 ग्रॅम 15 लिटर पाण्यातून बोंड वाढीच्या काळात फवारा.
4. बोंडांचे वजन आणि धाग्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी 12:61:0 100 ग्रॅम + क्‍लोरमेक्वॉट क्‍लोराईड (लिहोसीन) 15 मिली 15 लिटर पाण्यातून बोंड वाढीच्या काळात फवारा.
संजीवके(Growth Regulater) 
1.पिकावर फुलांची संख्या वाढविण्यासाठी व फुलगळ थांबविण्यासाठी एनएनए 4.5% SL(प्लॅनोफिक्स/सुपरफिक्स) 40 मिली 180 लिटर पाण्यातून प्रती एकर पिक फुलोर्यात असताना फवारा.
2. बोंडे लवकर उघडण्यासाठी पानगळ होणे महत्वाची असते.पिकावर पानगळ होण्यासाठी पॅराक्वेट 24SL ( ग्रामोक्सोन,ग्रामेक्स) 1 लिटर 200 लिटर पाण्यातून फवारा.
हे पिकामध्ये ओलावा निर्माण करते.
किड नियंत्रण पिठ्या ढेकुण
1. पिठ्या ढेकुण प्रवावीत तणे जसे की,कॉंग्रेस गवत फेब्रुवारी पूर्वी जाळून शेतात गाडून टाका.
2.बाधित भागात शेळ्या मेंढ्या व इतर प्राण्यांना चरायला सोडू नका.भाधित भाग एकत्र करून शेतात जाळून टाका.
3.बाधित भागात वापरलेली अवजारे निरोगी पिकामध्ये वापरण्यापूर्वी ती साफ करावी,त्यावर कीटकनाशकांची फवारणी करावी.
4.पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी मका ज्वारी,बाजरी हि पिके सापळा पिके म्हणून लावावीत,तसेच काटेरी गवत,माकड झुडूप जंगली भेंडी,कॉंग्रेस यासारख्या तणांचा बंदोबस्त करावा.
5.पिकाचे वेळोवेळी निरिक्षण करावे,सुरवातीच्या काळात क्लोरोपायरीफोस 2%10 किलो प्रती एकर याप्रमाणे जमिनीत व बाधित भागावर टाकावे,जास्त प्रादुर्भाव असेल तर बुप्रोफेजिन 25SC ( एपलुड / बूपरो / बुप्लोन )  30 मिली 15 लीटर पाण्यातून फवारा..
मावा
मावा पानातील रस शोषून पिकाचे नुकसान करतो,जर मावा किडींची संख्या प्रती रोप 10 पेक्षा कमी असेल तर घायपात (केतकी)चा अर्क 350 ml / 15Ltr पाण्यातून फवारा,जर 10 पेक्षा जास्त असेल तर इमिडाक्लोप्रीड(कॉनफ़िडॉर, टाटामीडा) 3 ml किंवा थायामेथोक्सॅम 25WG (अक्टारा, अनंत) 4gm 10 Ltr पाण्यातून फवारा किंवा एसिफेट 50% + इमिडाक्लोप्रीड 1.8%SC (लान्सरगोल्ड) @ 50 gm किंवा फ्लोनीकामिड ( उलाला ) @ 6 मिली 15 लीटर पाण्यातून फवारा.
तुडतुडे
तुडतुडे पानातील रस शोषून पिकाचे नुकसान करतो,जर तुडतुडे किडींची संख्या प्रती पान 2 पेक्षा कमी असेल तर घायपात (केतकी)चा अर्क 350 ml / 15Ltr पाण्यातून फवारा,जर 2 पेक्षा जास्त असेल तर इमिडाक्लोप्रीड(कॉनफ़िडॉर, टाटामीडा) 3 ml किंवा थायामेथोक्सॅम 25WG (अक्टारा, अनंत) 4gm 10 Ltr पाण्यातून फवारा किंवा एसिफेट 50% + इमिडाक्लोप्रीड 1.8%SC (लान्सरगोल्ड) @ 50 gm किंवा फ्लोनीकामिड ( उलाला ) @ 6 मिली 15 लीटर पाण्यातून फवारा.
फुलकिडे
फुलकीड्यांचा प्रादुर्भाव ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये जास्त दिसून येतो,
Source:
कृषि विभाग, नंदुरबार.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »