पपई पीक कसे घ्यावे

0
पपई पीक कश्याप़कारे घ्यावे
लागवड जून-जुलै, सप्टें-ओक्टो किंवा फेब्रु-मार्च मध्ये करावी. 
साडेसात बाय साडेसात फूट अंतर ठेवावे किंवा आठ बाय सात फूट अंतर ठेवावे
जमीन नांगरून ढेकळे फोडून घ्यावी व जमीन सपाट करावी
45x 45x 45 सेमी ते 60x 60x 60x सेमी खड्डे घेऊन दोन भाग चांगली माती एक भाग कुजलेले शेणखत, 30-40 ग्रॅम लिंडेन पावडर, पाव किलो निंबोळी पेंड पाव किलो सुपर फॉस्फेट यांनी खड्डा भरावा.
एकरी 777 रोपे बसतात 8 फुट x 7 फुट अंतरावर रोपांची लागवड करावी.
लागण संध्याकाळी करून लगेच पाणी द्यावे.
300 ते 350 ग्रॅम सुफला 2 महीन्यांच्या अंतराने 4 वेळा गोलाकार आळे काढुन द्यावे. सुरवातीच्या वेळी प्रमाण थोडे कमी घ्यावे
मुळाभोवती पाणी साचुन देऊ नये.
रोपे घेणे महाग पडते तेंव्हा शक्य असल्यास 12.5 x 7.5 सेमी पीशवीत तळाशी छीद्र पाडून शेणखत व माती 1:1 प्रमाणात मिसळून प्रत्येकी 1 ताजे बी घेऊन रूजत घालावे व नीयमात पाणी घालावे.
दीड ते दोन महीन्यांनी रोपांची लागण करावी.
बियाणासाठी जवळपासच्या कृषीसेवा केंद्रशी संपर्क साधावा.
पपईमध्ये आंतरपीक-
– पपईची मुळे उथळ असल्याने त्यात शक्यतो आंतरपीक घेऊ नये.
– आंतरपीक घ्यावयाचे असल्यास सुरुवातीच्या 6-8 महिन्यांच्या काळात मुग,उडीद, चवळी,वाटाणा,घेवड़ा, कांदा, मुळा यासारखी पिके घ्यावीत.
– वेलभाज्या, कोबीवर्गीय भाज्या, भेंडी, वांगी ह्यासारखी भाजीपाला पिके आणि उंच वाढणारी ज्वारी, मका, कापूस ही पिके आंतरपिके म्हणुन घेऊ नयेत. 
 पपई वर कोणकोणते रोग पङतात
त्यांची लक्षणे कोणती ते आटोक्यात आणण्यासाठी कोणकोणती औषधे् फवारावीत याची सवीस्तर माहीती दयावी 
– पपईवर रस शोषण करणा-या किडी मावा, पांढरीमाशी, कोळी यांच्या प्रादुर्भाव होतो तसेच विषाणूजन्य रोगाच्या प्रसार होतो त्यांच्या नियंत्रणासाठी रोगोर १० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १५ मीली कींवा मॅलोथिऑन २० मीली प्रती १० लीटर पाण्यात मीसळून फवारावे.
– पाण्याच्या निचरा होऊ द्यावा. रोगीट झाडे उपटून काढावीत.
– कोळी कीडींवर केलथेन ८ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. 
  पपई पीक कश्याप़कारे घ्यावे
तैवान पपई नं. 786
ह्याची लागवण करून १ महिना झाला आहे .रोपांची वाढ काहीच नसून ,रोपांची पाने आखडली आहेत . काही रोपे जाळून गेली आहेत .तरी रोपांच्या वाढीसाठी त्वरित मार्गदर्शन करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »