ओळखा अन्नद्रव्यांची कमतरता

ओळखा अन्नद्रव्यांची कमतरता( Deficiency Syndromes):
💧🌾 1) नत्र – झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते,
फूट व फळे कमी येतात.
💧🌾 2) स्फुरद – पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.
🌾💧 3) पालाश – पानाच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात.
खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.
🌾💧 4) जस्त – पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो.
पिकांची वाढ खुंटते. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.
💧🌾 5) लोह – शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, झाडांची वाढ
खुंटते.
🌾💧 6) तांबे – पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद
वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात.
💧🌾 7) बोरॉन – टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन
पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने
मरतात.
💧🌾 9) मॉलिब्डेनम –
पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात.
पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.
💧🌾 10) गंधक – झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी-पांढरी पडतात
(Synergism & Antagonism)
*P पचवन्यासाठी पिकाला– Zn Mn Fe B लागते.
*N पचवन्यासाठी– Mo Cu S B लागते.
*K पचवन्यासाठी — Ca Mg B लागते.
*N जास्त झाल्यावर– K Mo Ca Mg कमी पडते.
*P जास्त झाल्यावर — Zn Cu Fe N कमी पडते.
*K जास्त झाल्यावर– Mg N Ca B Mg K Ca कमी पडते.
*Ca जास्त झाल्यावर–P Mg Zn B कमी पडते.
*Zn जास्त झाल्यावर — Ca Fe K कमी पडते.
*Fe जास्त झाल्यावर– Cu Zn P Mn कमी पडते.
*Cu जास्त झाल्यावर– Mn Fe कमी पडते.
*Na जास्त झाल्यावर– K Ca Mg कमी पडते.
म्हणून अन्नद्रव्ये बेलेन्स करून दिली पाहिजेत.
म्हणजे एक जास्त झाल्यावर दूसरे कमी पडू नये आणि पिकामधे अडचणी येवू नये या साठी प्रथम पाण्याचा ph मेंटेन करा.
Mala wangi pikabaddal mahiti dya