झिंक ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे मका पिकामध्ये महत्व व वापरण्याची पद्धत

0

 झिंक ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे मका पिकामध्ये महत्व व वापरण्याची पद्धत

झिंक

👉 झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य सर्व पिकांसाठी महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून ओळखले जाते, जेकी पिकाच्या वाढीसाठी व उत्पादनासाठी खूप कमी प्रमाणात पण अति महत्वाचे असते

👉 झिंक ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे पिकांमध्ये खूप महत्त्वाचे कार्य असते जसे की हरितद्रव्याची निर्मिती, एन्झाइम रिॲक्शन, प्रकाशसंश्लेषण, DNA ट्रान्सस्क्रिपशन, ऑक्सिन ची निर्मिती

👉 झिंक ची कमतरता आपल्या भागातील बऱ्याच जमिनींमध्ये जास्त आहे त्यातल्यात्यात हलक्या ते मध्यम जमिनींमध्ये ती कमतरता जास्त आढळून येते

👉 इतर सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता मका या पिकावर खूप मोठ्या प्रमाणात दिसते म्हणजे ह्या पिकाला झिंकची गरज इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांपेक्षा जास्त प्रमाणात लागते व त्यामुळे उत्पादनात 10 ते 15 % ने वाढ होते

🅾️मका पिकामध्ये शेतकऱ्यांची झिंक वापरण्याची पद्धत🅾️

👉 बरेच शेतकरी मका पिकामध्ये झिंक सल्फेटचा वापर प्रति एकर 10 किलो या प्रमाणात करत असतात, परंतु शेतकरी या झिंक सल्फेटचा वापर इतर स्फुरदयुक्त रासायनिक खतासोबत मिक्स करून करत असतात व त्यामुळे त्या झिंक सल्फेट मधील झिंकचे मोठ्या प्रमाणात स्फुरदयुक्त खतामधील स्फुरद बरोबर स्थिरीकरण होते व तो झिंक पिकांना खूप कमी प्रमाणात उपलब्ध होते

👉 दुसरे म्हणजे बरेच शेतकरी कमी किमतीच्या झिंक सल्फेटचा वापर जास्त करतात, परंतु एक लक्षात घेतले पाहिजे की जेवढे झिंक सल्फेट स्वस्त तेवढे त्यामध्ये जडधातूंचे प्रमाण किंवा अशुद्धता जास्त असतात व त्याचा विपरीत परिणाम जमिनीच्या पोतावर होत असतो

👉 म्हणून झिंक सल्फेट चा वापर शेतकऱ्यांनी स्फुरदयुक्त खतासोबत टाळावा जसे की 18 : 46, 10:26:26, 12:32:16, 15:15:15, 24:24:0, म्हणून झिंक सल्फेट चा वापर शेतकऱ्यांनी टाळावा व खालील सोप्या पद्धतीने *चिलेटेड झिंक व झिंकाबोर* चा वापर मका पिकात करावा

🅾️झिंक चा वापर मका पिकामध्ये कसा करावा🅾️

1.  बीज प्रक्रिया:-

👉 EDTA स्वरूपातील *चिलेटेड झिंक* 100 ग्रॅम प्रति तीन ते चार किलो बियाण्यासाठी वापरून बीज प्रक्रिया करावी, ती करत असताना एका पिशवीतील बियाणे एका घमेल्यात ओतावे व त्यामध्ये 100 ग्रॅम *चिलेटेड झिंक* टाकावे व त्यामध्ये थोडेसे 20 ते 30 मिली पर्यंत पाणी टाकावे, ते चांगले मिक्स करावे व दहा मिनिटे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.

👉 किंवा हे शक्य नसल्यास बियाण्याच्या पिशवीमध्ये 100 ग्रॅम *चिलेटेड झिंक* टाकून त्यामध्ये 20 ते 30 मिली पाणी टाकून पिशवी चांगली हलवून घ्यावी व नंतर ते बियाणे पेरणीसाठी वापरावे.

रिलीज झिंकच का ? :-

👉 *चिलेटेड झिंक* हे EDTA युक्त सूक्ष्मअन्नद्रव्य आहे जे की उत्कृष्ट स्प्रे ड्राईंग टेक्नॉलॉजिने बनवलेले आहे

👉 *चिलेटेड झिंक* एका एकर साठी 200 ग्रॅम जर वापरले तर इतर झिंक युक्त खते वापरण्याची गरज नाही

 👉 जर बियाण्याला बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची प्रक्रिया केलेली असेल किंवा करणार असेल तर त्या बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची कार्यक्षमता वाढवण्याचे काम *रिलीज झिंक* करते

👉 *चिलेटेड झिंक* चे बियाण्या सोबत कोटिंग असल्यामुळे शंभर टक्के मुळीच्या जवळ राहते व पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते

👉 *चिलेटेड झिंक* मुळे ऑक्सिन (IAA) ची निर्मिती फास्ट होऊन उगवण जोमदार व हिरवीगार होते

👉 *चिलेटेड झिंक* कमी प्रमाणामध्ये वापरून सुद्धा जास्त फायदे देणार सुक्ष अन्नद्रव्य आहे

👉 *चिलेटेड झिंक* EDTA चिलेटेड स्वरूपात असल्यामुळे इतर स्फुरदयुक्त खतांसोबत स्थिरीकरण होत नाही व त्या अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवते

*2. युरिया बरोबर रिलीज झिंक चा वापर*

वरील दोघी प्रयोग शक्य न झाल्यास प्रति एकर 250 ग्रॅम *चिलेटेड झिंक* घेऊन ते 5 ते 6 किलो युरिया मध्ये सुरवातीला चांगले मिक्स करावे व नंतर तो 5 ते 6 किलो युरिया उरलेल्या युरिया मध्ये मिक्स करून त्याचा वापर मक्याच्या बुडाजवल करावा.

*फायदे:-*

👉 युरिया बरोबर *चिलेटेड झिंक* ची खूप छान कोटिंग होते

👉 युरिया सोबत दिल्यामुळे झिंक ची आणि युरिया मधील नत्राची कार्यक्षमता वाढते

*3. फवारणीद्वारे झिंक चा वापर*

👉 शेतकरी जेव्हा मक्यावर तणनाशक फवारतो किंवा फॉल आर्मी वर्म (FAW) अळीसाठी एखादे कीटकनाशक फवारत असेल तर त्यात चिलेटेड झिंक 30 ग्रॅम (15 लिटर पाण्यासाठी)

  फवारणी करावी.

*बीज प्रक्रिया, युरिया बरोबर किंवा फवारणीद्वारे झिंक चा वापर केल्यास मका पिकावर झिंकची कमतरता येणार नाही व मका पिकाच्या उत्पादनांमध्ये 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ होईल*

लेख संकलीत आहे..!

धन्यवाद…?🙏🏻🙏🏻🙏🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »