चांदवड येथे स्वच्छता पंधरवाडा साजरा
चांदवड वार्ताहर : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार व नेहरू युवा केंद्र नाशिक जिल्हा युवा समन्वयक देवेंद्र फुंदे सर तसेच चांदवड येथील तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘रविंद्र निवृत्ती गांगुर्डे’ आणि विक्रम गुंजाळ यांच्यातर्फे ‘स्वच्छता पंधरवाडा’ उपक्रमांतर्गत सर्व युवक युवतींना शपथ देऊन स्वच्छते बद्दल मार्गदर्शन केले, यात यांनी स्वच्छते चे माहिती, सामाजिक बांधिलकी इ. विषयांवर युवकांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी चांदवड येथील आनंद तिडके, चंद्रशेखर बागुल, गणेश गुंजाळ, सुनील शिंदे, अनिल ढोले, मयुरी गवांदे, पुजा महाजन, अशा अनेक युवक युवती उपस्थित होते .