छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी ३ कोटी निधी मंजूर
छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून
येवला मतदारसंघात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या
विकासासाठी ३ कोटी निधी मंजूर
नाशिक, येवला, दि.२० फेब्रुवारी :- जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेकडील ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेमधून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदार संघातील ५६ विकासकामांसाठी ३ कोटी १ लक्ष ५७ हजार रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे. या कामांमध्ये रस्ता काँक्रीटीकरण, स्ट्रीट लाईट, भूमिगत गटार, पाण्याची टाकी, पाईपलाईन, पेव्हर ब्लॉक या कामांचा समावेश असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.
यामध्ये निफाड तालुक्यातील ब्राम्हणगांव विंचूर जोशीवाडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, ब्राम्हणगांव विंचूर येथील गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष, बोकडदरे येथे दलित वस्तीत भूमिगत गटार करण्यासाठी ५ लक्ष, धारणगांव वीर येथे भूमिगत गटार करण्यासाठी ५ लक्ष, धारणगांव वीर देवीमंदिर येथे भूमिगत गटार करण्यासाठी ३ लक्ष, कानळद येथे दलित वस्ती येथे भूमिगत गटार करण्यासाठी ५ लक्ष, खडक माळेगांव येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, लासलगांव येथील गोविंद नगर, श्रीरामनगर, सप्तशृंगी नगर, नंदनगर, शांती नगर, सर्व्हे न. ९३ येथे काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ४.९० लक्ष, मरळगोई खु. येथे स्ट्रीट लाईट व भूमिगत गटार करण्यासाठी प्रत्येकी ४.९० लक्ष, पिंपळगाव नजीक येथील पंचरत्न नगर, सिद्धार्थ नगर, इंदिरा नगर २, गोपीनगर, देविका नगर येथे काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ४.९० लक्ष, तर चर्मकार वस्ती येथे स्ट्रीट लाईटसाठी ५ लक्ष, पाचोरे बु. येथे आंबेडकर नगर स्ट्रीट लाईटसाठी ४ लक्ष, वेळापूर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लक्ष रुपयांच्या २३ कामांसाठी १ कोटी १५ लक्ष ९० हजार रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.
तर येवला तालुक्यातील अंदरसुल येथे अण्णाभाऊ साठे नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ४.९० लक्ष, अंदरसुल येथे आंबेडकर नगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी ४.९० लक्ष, आंबेगाव येथे दलित वस्ती येथे पाण्याची टाकी व पाईप लाईन करण्यासाठी १.९२ लक्ष, अंगुलगाव येथे अण्णाभाऊ साठे नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५.९० लक्ष, अंगुलगाव रमाई नगर येथे स्ट्रीट लाईटसाठी ५ लक्ष, आहेरवाडी येथे हडपसावरगाव रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ४.९० लक्ष, भाटगाव जगताप वस्ती येथे स्ट्रीट लाईटसाठी २.९९ लक्ष, बोकटे येथे दलित वस्तीत काँक्रीटीकरण करण्यासाठी ९.९० लक्ष, चिचोंडी बु. येथे दलित वस्तीत भूमिगत गटार व रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रत्येकी ४.९० लक्ष, चांदगाव येथे दलित वस्तीत स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी ४.९० लक्ष, येवला देवळाने दलित वस्ती महादेववाडी येथे पाणी पुरवठा करण्यासाठी ५.७३ लक्ष, धानोरे येथे कांबळे वस्तीत स्ट्रीट लाईटसाठी २.४ लक्ष, पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी २.९९ लक्ष, देवरगाव मातंगवस्ती आनंदनगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ४.९० लक्ष, गवंडगाव राजवाडा येथे स्ट्रीट लाईटसाठी ४.९० लक्ष, इंदिरानगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ११.९० लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे.
तसेच जळगांव नेऊर राजवाडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, राजवाडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ३ लक्ष, कुहाडे वस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ लक्ष, खिर्डीसाठे गौतमनगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ९.९० लक्ष, मुखेड आंबेडकर नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ९ .९० लक्ष, अण्णाभाऊ साठे नगर येथे भूमिगत गटार करण्यासाठी ४.९० लक्ष, महालखेडा दलित वस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ४.९० लक्ष, नागडे येथे दलित वस्तीत भूमिगत गटार करण्यासाठी ८ लक्ष, पिंपळगाव लेप समाजमंदिर दुरुस्तीसाठी १ लक्ष, सातारे येथे दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ४.९० लक्ष, सावरगाव येथे आंबेडकर नगर समाजमंदिर दुरुस्तीसाठी ६.९० लक्ष, चर्मकार वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ४.९० लक्ष, मातंगवस्तीत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी २.९० लक्ष, उंदीरवाडी दलितवस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ४.९० लक्ष, विखरणी येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ३ लक्ष असे एकूण ३३ विकास कामांसाठी १ कोटी ८५ लक्ष ६७ हजार रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.