लोकसभा निवडणुकांपूर्वीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारनं शेतकऱ्यांकऱ्यांना ६ हजार रुपयांपर्यंतचं आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली. तर मध्यमवर्गीय, नोकरदार, महिला, शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडला.

0

>> या अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गीय समाजाला फायदा होईलः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार
>> सरकार वाढत्या बेरोजगारीबाबत काहीच बोलत नाही. तरुण वर्ग आपलं भविष्य आहे. त्यांच्याबाबत अर्थसंकल्पात तरतूद करायला हवी होतीः मुख्यमंत्री अमरिंदर सिंह 


>> सरकारमधील सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत बोलत असतात. तर त्यांनी शेतकरी कर्जाबद्दल काय पावले उचलली हेदेखील सांगावेः पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह 


>> हा अर्थसंकल्प म्हणजे देशाची २०३० मधील ब्लू प्रींट आहेः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 


>> संरक्षण अर्थसंकल्पातील तरतूद ३ लाख कोटीपेक्षा जास्त करण्यात आली आहे. ही तरतूद ऐतिहासिक आहेः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 


>> आजचा अर्थसंकल्प शेतकरी, कामगार, महिला आणि मध्यमवर्गीयांसाठी आहेः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 


>> जीएसटी लागू करणं चुकीचं नव्हतं. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळालेः पीयूष गोयल 


>> शेतकऱ्यांना दरमहिना ५०० रुपये देणे हा त्यांचा अपमान; उद्योजकांचं कोट्यवधीचं कर्ज माफ केलं जातंः राहुल गांधी यांची टीका 


>> कर भरण्याचे प्रमाण वाढले, याचा अर्थ जीएसटी यशस्वी ठरला. यामुळे देश जलदगतीने विकास करण्यासाटी तयार झाला आहेः पीयूष गोयल 


>> नव्या कर रचनेमुळे ३ ते ३.५ कोटी नोकरदारांना याचा फायदा मिळेलः पीयूष गोयल 


>> शेतकऱ्यांना मिळणारी ५०० रुपयांची रक्कम ही अतिरिक्त मिळकत म्हणून धरली गेली पाहिजे. शेतकरी आपले अन्नदाते आहेतः पीयूष गोयल 


>> काँग्रेसनं कधी शेतकऱ्यांच्या आरोग्याबाबत विचार केला नाही का; काँग्रेसनं फक्त आश्वासनं देण्याचं काम केलंः अर्थमंत्री पीयूष गोयल 


>> हा अर्थसंकल्प अर्थ विभागानं तयार केला आहे की, रा. स्व. संघाने. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पातील तरतुदी म्हणजे कँडी देण्यासारखं आहेः कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचं केंद्र सरकार आणि संघावर टीकास्त्र 


>> या सरकारला आगामी ५ वर्षांपर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार नाही. निश्चित कालावधीनंतर सरकारची वैधता संपेल. त्यानंतर या गोष्टींना काहीच महत्त्व राहणार नाहीः ममता बॅनर्जी यांची टीका 


>> घोषणाबाज सरकारचे हे फसवे बजेट आहे. आम्ही साठ वर्षांवरील शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार पेन्शन मागत आहोत आणि सरकारने पाचशे रुपये देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांची ही चेष्टा असून, केलेल्या घोषणांचेही प्रत्यक्षात काही हाती लागणार नाही, असे वाटतेः अण्णा हजारे यांची सरकारवर टीका 


>> मुंबई उपनगरीय रेल्वेच्या एमयूटीपी प्रोजेक्टसाठी सुमारे ५८४ कोटी रुपयांची तरतूद 






>> मोदी सरकारचा हा ‘अखेरचा जुमला बजेट’: राहुल गांधी 

>> शेतकऱ्यांना प्रतिदिन १७ रुपये देऊन त्यांच्या मेहनतीचा आणि त्यांनी केलेल्या प्रत्येक मागणीचा अपमान केला आहे; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा >> अर्थसंकल्पातून सर्वांनाच दिलासा देण्याचा प्रयत्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी >> हा निराश करणारा अर्थसंकल्प आहे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची टीका

>> या अर्थसंकल्पाचं एकाच ओळीत वर्णन करायचं म्हटलं तर, हा हिशेबी अर्थसंकल्प नसून मतांसाठी मांडलेला हिशेब आहे: पी. चिदंबरम, माजी अर्थमंत्री 


>> अर्थसंकल्पातून भूमिहीन शेतकरी आणि कामगारांना कोणताही दिलासा नाहीच!: अखिलेश यादव 


>> पीयूष गोयल यांची पत्रकार परिषद सुरू 


>> देशातील ४० ते ५० कोटी लोकांना या अर्थसंकल्पाचा लाभ होईल: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 


>> हा अर्थसंकल्प ऐतिहासिक, समाजातील सर्व घटकांना या अर्थसंकल्पातून फायदा मिळेल: केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह 






>> शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय मैलाचा दगड ठरतील: अमित शहा, भाजप अध्यक्ष 


>> वार्षिक सहा हजार रुपये अर्थसहाय्य म्हणजेच महिन्याला पाचशे रुपये देऊन शेतकरी सन्मानानं जगणार का? काँग्रेस नेते शशी थरूर यांचा सवाल 


>> केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची पुन्हा घोर निराशा, किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांची प्रतिक्रिया 


>> अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा 


>> प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर लोकसभा ४ फेब्रुवारीपर्यंत स्थगित 


>> २०१४-२०१९ या कालावधीत सादर केलेल्या सर्व अर्थसंकल्पांमधून मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा: अरुण जेटली 


>> अर्थसंकल्प सर्वसमावेशक, न्यू इंडियाचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे: योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश 


>> नव्या करप्रणालीचा तीन कोटी लोकांना फायदा होणार 


>> अडीच लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कोणताही कर नाही 


>> अर्थसंकल्पात नोकरदारांना मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट 


>> मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा; ४० हजार रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त होणार 


>> पीएफ अथवा समभागांमध्ये साडेसहा लाखांपर्यंतची गुंतवणूक केल्यास कर भरावा लागणार नाही 


>> नोकरदारांना मोदी सरकारचं गिफ्ट; ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही टॅक्स नाही! 


>> २०१९-२० या वर्षात वित्तीय तूट ३ टक्के राहण्याचा अंदाज: गोयल 


>> नोटाबंदीनंतर १ कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर भरला: गोयल 


>> उत्पन्न कररचनेत कोणतेही बदल नाही, जीएसटीही जैसे थे! 


>> व्हिडिओ: केंद्राचा अर्थसंकल्प फुटल्याचा 


>> कर मूल्यांकनासाठी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत: पीयूष गोयल 


>> २४ तासांत आयटी रिटर्नची प्रक्रिया पूर्ण होणार; गोयल यांची ग्वाही 


>> प्रामाणिक करदात्यांचे आभार, कर भरणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के वाढले: गोयल 


>> रेल्वे खात्यासाठी ६४ हजार ५०० कोटींची तरतूद 


>> येत्या पाच वर्षांत १ लाख डिजिटल गावांची निर्मिती करणार 


>> डिफेन्स बजेट पहिल्यांदाच ३ लाख कोटींच्या पार: गोयल 


>> कामगाराचा मृत्यू झाल्यास सहा लाख रुपये भरपाई 


>> ‘वन रँक वन पेन्शन’ अंतर्गत ३५ हजार कोटी रुपये दिले; गोयल यांची माहिती 


>> मुद्रा योजनेंतर्गत ५ कोटींहून अधिक रुपयांचं कर्ज दिलं : गोयल 


>> उज्ज्वला योजनेंतर्गत ८ कोटी गॅसजोडणी देणार: गोयल 


>> ग्रॅच्युइटीची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रुपये; पीयूष गोयल यांची घोषणा 


>> प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची घोषणा, १५ हजार रुपये कमाई असलेल्यांना मिळणार पेन्शन 


>> पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात २ टक्क्यांच्या सवलतीची घोषणा
>> किसान सन्मान निधी योजनेसाठी ७५ हजार कोटी; पीयूष गोयल यांची घोषणा 


>> राष्ट्रीय गोकुल मिशनसाठी ७५० कोटी रुपये: गोयल
>> राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना करणार: पीयूष गोयल 


>> दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार; गोयल यांची घोषणा 


>> देशातील २२वे एम्स हरयाणात सुरू होत आहे, गोयल यांची माहिती
>> आमच्या सरकारने एक कोटी ५३ लाख घरांची निर्मिती केली; गोयल यांची माहिती 


>> सरकारने गरिबांसाठी १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला: पीयूष गोयल 


>> सध्याच्या घडीला बड्या उद्योगपतींनाही कर्ज फेडावे लागते: पीयूष गोयल 


>> आमच्या सरकारने वित्तीय तूट निम्म्यावर आणली: पीयूष गोयल 


>> गेल्या पाच वर्षांत सरकारने अनेक योजना सुरू केल्या: पीयूष गोयल
>> महागाईचा दर आतापर्यंत निचांकी पातळीवर आहे: पीयूष गोयल 


>> आमच्या सरकारने देशातील भ्रष्टाचार संपवला: पीयूष गोयल 


>> वेगाने विकास करणारी भारतीय अर्थव्यवस्था: पीयूष गोयल 


>> लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपचं सरकार बजेटमध्ये लोकप्रिय घोषणा करू शकतं. आज केवळ ‘जुमला’ असणार आहे: मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »