कापसाचे भाव स्थिरावले

0

4 Dec 2018: कापसाचे भाव स्थिरावले; भावात तेजी येण्याबाबत साशंकता

कापसाचे भाव स्थिरावले; भावात तेजी येण्याबाबत साशंकता
कृषिकिंग, जळगावः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असली, तरी परदेशात मागणी मंदावली आहे. टेक्‍स्टाइल इंडस्ट्रीजने कापसाची खरेदी बंद केली. परिणामी जळगाव बाजार समितीत कापसाचे भाव ५ हजार ६०० रुपयांवर स्थिरावले आहे.

गेल्या आठवड्यापर्यंत व्यापारी कापसाला ५ हजार ८०० चा भाव देत होते. मात्र, आगामी काळात कापसाच्या भावात तेजी येण्याबाबत साशंकता असल्याने काही शेतकरी ५ हजार ६०० रुपये भावाने कापसाची विक्री करत आहेत. मात्र, असे असले तरी ७० टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांनी साठवून ठेवला आहे.

“संक्रांतीनंतर कापसाच्या भावात अल्पशी वाढ होण्याची शक्‍यता आहे. ती वाढ १०० ते २०० रुपयांची असेल. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस बाजारात विक्रीस आणणे गरजेचे आहे,” अशी माहिती खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »