शेततळ्यातील पाणीसाठा मोजणे

0

*शेततळ्यातील पाणीसाठा मोजणे*

आपण तयार केलेल्या शेततळ्यातील पाणीसाठा किती आह हे कळल्यावर आपण त्या प्रमाणे आपणास कोणती लागवड करावयाची व किती पाणी मिळेल याचे गणित तयार करता येईल या साठी आपल्याला शेतातील पाणीसाठा कसा मोजायचा ते पाहूया.

पाणी साठा हा नेहमी
*लांबी, रुंदी आणि उंची* यावर ठरताे.
समजा ३०*३०*३ मीटर म्हणजे तळ्याची वरची लांबी १०० फूट आणि रुंदी १०० फूट खेली १० फुट आहे. यासाठी प्रथम सरासरी लांबी व सरासरी रूंदी काढली पाहीजे. समजा वरची लांबी १०० फूट व तळातील लांबी ८० फूट आहे यासाठी सरासरी लांबी काढली पाहीजे ती अशी काढता येते
सरासरी लांबी : १००+८०÷२ बाजू =९० फूट
आता वरची रुंदी १०० फूट आहे व तळातील रूंदी ८० फूट आहे. आता आपल्याला  सरासरी रूंदी  काढली पाहीजे
सरासरी रुंदी : १००+८० ÷ २ बाजू = ९० फूट
*म्हणजे सरासरी लांबी ९० फूट व सरासरी रूंदी ९० फूट आली*

आता *तळ्याची उंची १० फूट* आहे.

*पाणीसाठा काढण्याचे सूत्र*
पाणीसाठा = लांबी xरुंदी xउंची पाणीसाठा = ९० फुट x  ९० फुटx १०फुट
पाणीसाठा = ८१००० क्युबिक फूट

*१ क्युबिक फूट  = २८.३७  लिटर*

आता आपण या क्युबिक मधील पाणीसाठा  लिटर मध्ये रूपांतरित करू.
पाणीसाठा =८१००० क्युबिक फूट  x २८.३७ लीटर पाणीसाठा = २२९७९७० लिटर.

तर ३०*३०*३ मीटर चे शेततळे असेल तर त्या शेत तळ्यामध्ये २२९७९७० लिटर म्हणजे *दहा हजार लिटरचे २२९ टँकर्स*  इतका पाणीसाठा साठवता येईल..
अशाा प्रकारे तुम्ही तुमच्या गरजे नुसार १) २०*१५*३ मीटर २) २०*२०*३ मीटर ३) २५*२०*३ मीटर ४) २५*२५*३ मीटर ५)३०*२५*३ मीटर  ६) ३०*३०*३ मीटर शेततळे उभारू शकता.

पासाळयात ३०*३०*३ मीटर शेततळ्यामध्ये  विसपट पाणी भूगर्भात जिरवले जाते  म्हणजे
२२९७९७० लीटर × २० पट = ४ काेटी ५९ लाख ५९ हजार ४०० लीटर  पाणी जमिनीत जिरवण्याचे पुण्य आपणास मिळेल व येणा-या पुढच्या पिढीला पण आपण पाण्याचा ठेवा ठेवू शकताे.
Source:
                                   
                            रोहीदास राठोड .*
                                      मंडळ कृषी अधिकारी

      पाणी हेच जीवन
*मागेल त्याला शेततळे* या योजनेचा लाभ घ्यावा हि विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »