शिमला मिरची लागवड तंत्र पेरणी तंत्र
पीक नियोजन
चांगले उगवण क्षमतेचे, चांगल्या
प्रतीचे आणि प्रमाणित बियाणे
वापरा. आपल्या क्षेत्रानुसार
शिफारस केलेल्या वाणांचा
वापर करा.


ढोबळी मिरचीसाठी दिवसाचे
तापमान 25 ° से व रात्रीचे
तापमान 14 ° से उत्तम मानले
जाते,तसेच तापमान 10 ° से पेक्षा
खाली गेले व पिकावर ठिपके पडले
तर वाढीवर परिणाम होतो.
जमिनीची तयारी
चांगल्या वाढीसाठी व
विकासासाठी पाण्याचा
निचरा होणारी, सुपीक व
मध्यम-भारी काळी जमीन
निवडावी.नदीकाठची पोयटा
माती असलेली जमीन
योग्य.जमिनीचा सामू 6-7 च्या
दरम्यान असावा. प्रथम
जमिनीची आडवी-उभी नांगरट
करून घ्या,तसेच पूर्वीच्या
पिकाची धसकटे वेचून शेत स्वच्छ
करावे.दोन कुळवांच्या पाळ्या
देऊन जमीन भुसभुशीत करावी.
जाती
सुधारित
जाती:कॅलीफोर्निया
वंडर,अर्का मोहिनी,अर्का
गौरव इ.
संकरीत जाती: यलो
वंडर,भारत,इंद्रा इ.
बिज प्रक्रिया
पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम
3gm किंवा कार्बनडॅझिम
(बाविस्टिन,सहारा) 1gm/kg
ची प्रक्रिया करा.
रासायनिक प्रक्रीये नंतर
ट्रायकोडर्माची@5gm/kg
प्रक्रिया करा. नंतर बियाणे
सावलीत सुकवून पेरणी करा.
लागवडी आधी रोपांची VAM +
नत्र स्थिरिकरण जीवाणू सोबत
प्रक्रिया केली असता सुपर
फॉस्फेटची 50% तर नत्राचि 25%
बचत होते.
पेरणी आणि लागवड पद्धती
लागवड शक्यतो ऑगस्ट-सप्टेंबर
महिन्यात केल्याने जानेवारी-
फेब्रुवारीत फळे काढणीस येतात
रोपवाटिका तयारी. 3x1m
आकाराचा व 15cm उंचीचा
गादी वाफा करून घ्यावा.
पुनर्लागवडीसाठी 60cm
अंतराच्या स-या पडून त्याच्या
दोन्ही बाजूस 30cm अंतरावर एक
रोप याप्रमाणे लागवड करावी.
बिज दर
हेक्टरी 3 किलो बी पेरणीसाठी
लागते.
तण व्यवस्थापन
लागवडीनंतरचे 45 दिवस शेत
तणमुक्त ठेवा. पुनर्लागवडीनंतर 2-3
दिवसांनी फ्लूक्लोरॅलीन
(बसालीन) @ 44 ml / 10 Ltr ची
उगवण होण्याआधी फवारणी
करा
पीक-पोषण
सेंद्रीय खते, आणि जैविक खते
15-20 टन कुजलेले शेणखत प्रती हेक्टर
जमिनीच्या मशागतीच्या वेळेस
द्यावे.
फर्टिगेशन
रोपाच्या लावणीपासून ते
वाढीपर्यंत 19:19:19@1.5kg/
acre/दिवस, 10 दिवस द्या
फुल ते फलधारणा होईपर्यंत
12:61:00@0.4kg/acre/दिवस, 10
दिवस , 13:00:45@0.6kg/acre/
दिवस 15दिवस आणि
Urea@0.8kg/acre/प्रती दिवस 20
दिवस द्या
पाण्यात विरघळणारी खते
चांगल्या वाढीसाठी
लागवडीनंतर 20-25 दिवसांनी
19:19:19 5gm/Ltr पाण्यातून
फवारा.
पीक फुलोरा अथवा फळ
धरणेच्या अवस्थेत असेल तर 0:52:34
किंवा 13:0:45 @ 5-7gm/Ltr
फवारा. त्यामूळे जास्त उत्पन्न
मिळण्यास मदत होते.
सुक्ष्म अन्नद्रव्ये
फुलो-याच्या वेळी. सल्फर १०kg/
acre
फळ धारणेच्या वेळी बॉरॅकल
(BSF-12) 50 kg/acre द्यावे.
किंवा
लागवडीनंतर 10-15 दिवसात
19:19:19 आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये
2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात
मिसळून फवारावे.
लागवडीनंतर 40-45 दिवसांनी
२० टक्के बोरॉन 1 ग्रॅम आणि
सूक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 ते 3 ग्रॅम प्रती
लिटर पाण्यात मिसळून
फवारावे.
पिक फुलोरा अवस्थेत असताना
0:52:34 4 ते 5 ग्रॅम +
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5
ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात
मिसळून फवारावे.
पिक फळ धारणा अवस्थेत
असताना 0:52:34 4 ते 5 ग्रॅम +
बोरान 1 ग्रॅम प्रती लिटर
पाण्यात मिसळून फवारावे.
पिक फळ पोसत असतांना 13:0:45
4 ते 5 ग्रॅम + कॅल्शियम नायट्रेट 2 ते
2.5 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात
मिसळून फवारावे.
संप्रेरके
निरोगी, मजबूत रोपनिर्मिती
आणि पुनर्लागवडीचा ताण सहन
करण्यासाठी लिहोसिन @ 1
ml / Ltr ची लागवडीनंतर 20
दिवसांनी फवारणी करा.
जास्त तापमानामुळे फुलांची
गळ- पीक फुलावर आल्याबरोबर
एनएए ( 50 पीपीएम ) 50g प्रति
लिटर पाण्यात मिसळून
फवारावे. त्यानंतर दुसरी
फवारणी 20 ते 25 दिवसांनी
द्यावी
सिंचन
सिंचन वेळापत्रक
ढोबळीला लागवडीपासून-
सुरवातीच्या वाढीच्या
काळात पाण्याची गरज
भासते.फुले व फळे आल्यानंतर
नियमित पाणी
द्यावे.साधारणपणे एका
आठवड्याच्या अंतराने पाणी
द्यावे.
कीड नियंत्रण
कोळी
अबामेक्टीन ( अफर्म, अग्री- मेक )
@ 1-2 ml / Ltr किंवा
फेनाझाक्विन (मॅजिस्टर, डीई
436) @ 1 ml / Ltr फवारा.
80WP सल्फर (थायोवेट, सल्फेक्स)
@ 2gm/Ltr ची फवारणी करा.
फळपोखर अळी
फळपोखर किडीच्या
नियंत्रणासाठी 16 कामगंध
सापळे / एकर समान अंतरावर
पुर्नलागवडीनंतर 20 दिवसांनी
लावा. 20 दिवसाच्या अंतराने
त्यातील द्रव बदलत रहा.
हेलिकोवेर्पा ( फळपोखर कीड )
मुळे पिकाचे सुमारे 22-37%
नुकसान होते. नियंत्रणासाठी
सुरवातीच्या काळात गोमुत्र
आणि नीम युक्त रसायने
वापरल्यास याचे प्रमाण बरेच
कमी होते.
10 दिवसांच्या अंतराने
संध्याकाळी दोनदा हेक्टरी 250
एलइ दराने एचएएनपीव्ही
फवारल्यास फळपोखर अळीचा
बंदोबस्त होतो.
प्रादुर्भावित फळे नष्ट करा.
जास्त प्रादुर्भाव असल्यास
स्पिनोसॅड ( सक्सेस, ट्रेसर ) @ 6
ml / Ltr + स्टीकर @ 5 ml / 10 Ltr
पाण्यातून फवारा.
आगामी काळात पिकावर
फळपोखर किड आणि मररोगाचा
प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रतिबंध.
मॅन्कोझेब 25 gm किंवा
टॅबूकोनॅज़ोल 5-10 ml / 10 Ltr
पाण्यातून फवारा.
पांढरी माशी
इमिडाक्लोप्रीड ( कॉनफ़िडॉर,
टाटामीडा ) @ 0.5 ml / Ltr
पाण्यात मिसळून फवारा
किंवा अॅसीटामिप्रिड
( प्राइड, अॅसिलॉन ) @ 4 gm / 10
Ltr पाण्यामध्ये मिसळून
10दिवसाच्या अंतराने 2दा
फवारा.
पाने खाणारी अळी
20 gm कार्बारील 50WP किंवा
20 ml क्लोरपायरीफॉस
(स्काउट, ट्रिसेल) / 10 Ltr
पाण्यात + 10 ml स्टिकर
मिसळून फवारा.
फुलकिड
फीप्रोनिल ( जंप, कॉम्बॅट,
फ्रंटलाइन ) @ 25gm/acre/10Ltr
पाण्यामध्ये मिसळून फवारा
किंवा स्पिनोसॅड ( सक्सेस,
ट्रेसर ) @ 160 ml / acre प्रती 350
Ltr पाण्यामध्ये मिसळून फवारा.
मावा आणि तुडतूडे
डायमेथोएट 30EC ( टिका,
रोगर ) @ 15 ml / 10 Ltr ची
पाण्यात मिसळून, आकाश स्वछ
असताना फवारणी करा.
रोग नियंत्रण
भुरी
10 दिवसांच्या अंतराने दोनदा
डिनोकॅप ( कॅराथेन ) @ 1 gm / लि
किंवा वेटेबल सल्फर @ 3 gm / लि
पाणी फवारल्यास बंदोबस्त
होईल
रोप मर
रोपवाटिकेमध्ये मररोगाचा
प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वाफे
कार्बनडॅझिम ( बाविस्टिन, झेन,
सहारा ) 50%WP @ 15-20 gm /
10 Ltr द्रावणाने भिजवा.
रोपांची गर्दी
टाळा.मातीमध्ये वाफसा
ठेवा.मर आढळून आल्यास
मेटॅलॅक्सिल ( रीडोमील ) @ 2.5
gm / Ltr ची 2-3 वेळा फवारणी
करा.
सर्व काळजी घेवून सुद्धा
रोपवाटिकेत मर रोगाचा
प्रादुर्भाव आढळून आल्यास कॉपर
ओक्सीक्लोराईडची @ 3 gm /
Ltr याप्रमाणात भीजवणी
करा.
200gm कार्बनडॅझिम
(बाविस्टिन, स्टेन)100Ltr
पाण्यात मिसळून भिजवणी
करा.
बोकड्या रोग
मुख्य पिकाभोवती 5-6 ओळी
मका. ज्वारी, बाजरीच्या
सापळा पीक म्हणून लावा. ही
पिके पाने वळणा-या
विषाणूपासून संरक्षण करतात.
पाने वळणा-या विषाणूचा
प्रसार रसशोषककीडी मार्फत
होतो. 20%SP अॅसीटामिप्रिड
(प्राइड)@3gm/15Ltr पाण्यामध्ये
मिसळून फवारा.
करपा
पिकात अंतर ठेवणे, रोपाना
आधार देऊन आजूबाजूला पसरू न देणे
आणि पिकात योग्य हवा
खेळती राहणे रोग न
पसरण्यासाठी महत्वाचे असते.
मॅन्कोझेब 75 WP 1500-2000 gm /
750 Ltr पाण्यात किंवा
सायमोक्झॅनिल + मॅन्कोझेब 72
WP @ 1520 gm / 500 लिटर
पाण्यात मिसळून फवारा.
क्लोरोथॅलोनील ( कवच, जटायु )
@ 25 gm / 10 Ltr पाण्यात
मिसळून फवारा. गरजेनुसार 15
दिवसांनी दुसरी फवारणी
घ्या.
मॅन्कोझेब @ 2.5 gm / Ltr किंवा
कॉपर ऑक्झिक्लोराईड @ 2.5
gm / Ltr पाण्यात मिसळून
फवारा.
प्रॉपिकॉनाझोल ( रडार,
टिल्ट ) किंवा हेक्साकोनॅझोल
(कॉंन्टाफ, सितारा) @ 1 ml /
Ltr पाण्यात मिसळून फवारा.
नियमित कॉपर युक्त बुरशींनाशके
2 gm / Ltr + स्ट्रेप्टोसायक्लीन 2
gm / 10 Ltr पाण्यात मिसळून
फवारा
फळसड
मॅन्कोझेब 25 gm / कॉपर
ओक्सीक्लोराईड 30 gm किंवा
क्लोरोथॅलोनील (कवच, जटायु)
25 gm / 10 Ltr पाणी,
15दिवसाच्या अंतराने आलटुन
पालटून फवारा.
स्पॉटेड विल्ट व्हायरसचा
इमीडाक्लोप्रिड ( कॉनफ़िडॉर,
टाटामीडा ) किंवा
फिप्रोनिल ( रिजेन्ट, सरजेंट ) @
0.5 ml / Ltr पाण्यात मिसळून
फवारा.
पानावरील ठिपके
मॅन्कोझेब 1250 g प्रती 500 L
पाण्यात मिसळून फवारावे.
इतर समस्या
पिवळेपणा
पाण्यात विरघळणा-या खताचे
3gm 19:19:19 आणि 50%WP
कार्बेंडॅझीम 1gm/Ltr
पाण्यामध्ये मिसळून फवारणी
करा.
मातीतून येणारे रोग
मातीतून येणा-या रोगांसाठी
बोर्डोमिश्रणाची @ 10 gm /
Ltr किंवा कार्बेन्डॅझीम @ 1 ml /
Ltr भिजवणी करा. 1 महीन्याने
2 kg / acre ट्रायकोडर्मा + 100
kg शेणखत खोडाजवळ मिसळा.
मुळावरील बुरशी
मुळावरील बुरशीसाठी
जमीनीतून 1% युरिया (10 gm /
Ltr) व 0.25% कॉपर
ऑक्सीक्लोराईड (2.5 gm / Ltr)
पाण्यातून झाडाभोवती
फवारणीयंत्राचे नॉझल काढून
द्रावण द्या.
फळ तडकणे
चिलेटेड सूक्ष्मद्रव्ये उदा. कॅल्षियम
आणि बॉरॉन 1gm/Ltr द्या.
सुत्रकृमी
सुत्रकृमी मुळे मुळ्यांची वाढ
थांबते व उत्पादनावर परिणाम
होतो.
सुत्रकृमी नियंत्रणासाठी
कार्बोफ्युरान 3G
(फ्युराडन,डाइफ्युरान
फ्युरी)@10-15kg/एकर
प्रदुर्भावाच्या तीव्रतेनुसार
वापरा.
कापणी आणि काढणी पश्चात
तंत्र
योग्य अवस्था आणि तंत्र
फळे हिरवीगार व संपूर्ण
वळल्यावर तोडे चालू
करा,त्यासाठी फळांच्या
टोकावरी स्त्री-केसर वाळला
आले कि नाही याची खात्री
करून घ्या.फळे झाडावर जास्त
काळ ठेवल्याने ती पिकून
जातात.काही देशांमध्ये लाल
फळांना मागणी आहे परंतु असे
केल्यास उत्पादनात घात होते व
पुढील फळांच्या वाढीवर
परिणाम होतो.फळे झाडावरून
देठासकट
काढावीत.साधारणपणे दर 8
दिवसांनी तोडा
करावा.साधारणपणे 4-5
तोड्यांमध्ये सर्व पिक निघते.
Source:
Web

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »