प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना new नोंदणी दि.1मेपासून सुरू*

0

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना- 2017-18:ऑनलाईन नोंदणी दि.1मेपासून सुरू*
जळगाव- प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजने अंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना 2017-18 या वर्षाकरिता सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यास व शेतकऱ्यांकडून अर्ज स्विकृती करण्यासाठी ई-ठिबक आज्ञावली सोमवार दि. 1 मे पासुन सुरु करण्यात येत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांचे अर्ज ई-ठिबक आज्ञावलीत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महत्त्वाच्या सुचनाः-
• ई-ठिबक अज्ञावली दि. 1 मे ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत सुरु राहील.
• अर्ज फक्त www.mahaethibak.gov.in मध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारेच स्विकारण्यात येतील.
• आज्ञावलीवर शेतकरी नोंदणीसाठी लाभधारकाचा आधार क्रमांक हाच संबधित लाभधारकाचा ‘लॉग इन आयडी’ असेल.
• नोंदणी अर्जात E-KYC साठी अर्जदारांची संमती असल्याबाबत ‘‘सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार संबधित माझ्या वैयक्तिक माहितीचा उपयोग करण्यास माझी सहमती आहे’’. या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे.
• ई-ठिबक आज्ञावली केंद्र शासनाच्या DBT (Direct Benefit Transfer) पोर्टलशी जोडण्यात येणार आहे.
• पुर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांने 30 दिवसाच्या कालावधीत सुक्ष्म सिंचन संच बसवुन, बिलाची प्रत ई-ठिबक आज्ञावलीवर अपलोड करणे बंधनकारक आहे. विहित कालावधीत शेतकऱ्यांने बिलाची प्रत अपलोड न केल्यास लाभधारकाचा अर्ज ई-ठिबक अज्ञावलीतुन आपोआप (Auto Delete) रद्द केला जाईल. अर्ज आपोआप (Auto Delete) रद्द झाल्यानंतर पुर्व संमती आपोआप रद्द होईल तथापि लाभार्थ्यांस योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा अर्ज करता येईल.
• अर्ज करतांना अर्जामध्ये सुक्ष्म सिंचन संच उत्पादक व वितरक यांचा समावेश नाही. सुक्ष्म सिंचन संच उत्पादकांचे व वितरकाचे नाव बील इनव्हाईस एंट्री नंतर मोका तपासणीच्या वेळी घेण्याची सुविधा देण्यात आली आहे.
• अर्जदारास विविध टप्प्यावर झालेल्या कार्यवाहीची माहिती मोबाईलद्वारे एस.एम.एस. अलर्ट पाठविण्याची सुविधा निर्माण करण्यात आली असल्यामुळे आपला मोबाईल क्रमांक बिनचुक नोंदवावा.
• शेतकऱ्यांच्या बँक खाते क्रमांकात बदल करण्याची सुविधा बंद करण्यात आलेली असल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा बँक खातेक्रमांक बिनचुकपणे नोंदवावा.
तरी शेतकऱ्यांनी वरील कालावधीत ऑनलाईन पद्धतीत अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क करावा. ही सर्व माहिती कृषी विभागाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahaethibak.gov.in वर उपलब्ध आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »