कांदा सल्ला

१) पुनर्लागवडीनंतर ४५, ६० आणि ७५ दिवसांनी सूक्ष्मद्रव्यांची ५ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात पानांवर फवारणी करावी. 
२) फूलकिडे व करपा रोग यांच्या नियंत्रणाकरिता, (फवारणी प्रतिलिटर पाणी) 
– कार्बोसल्फान २ मिली + ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम 
– दुसरी फवारणी १५ दिवसांनंतर, प्रोफेनोफॉस १ मिली + हेक्झाकोनॅझोल १ ग्रॅम 
– वरील दोन फवारणीने नियंत्रण न मिळाल्यास, १५ दिवसांनी फिप्रोनील १ मिली + प्रोपिकोनॅझोल १ ग्रॅम. 
– पुनर्लागवडीनंतर ११०-११५ दिवसांपर्यंत आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. काढणीच्या १० दिवसांपूर्वी पाणी देणे बंद करावे. 

ज्यांनी अद्याप पुनर्लागवड केलेली नाही, त्यांनी ४५-५० दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड करावी. 
१) पुनर्लागवडीकरिता रोप निवडताना खूप जास्त वाढ झालेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळावे. रोपे उपटल्यावर त्यांच्या पानांच्या शेंड्याकडील १/३ भाग पुनर्लागवडीपूर्वी कापून टाकावा. 
२) बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता, कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागवड करावी. 
३) दोन ओळींमध्ये १५ सेंमी व दोन रोपांमध्ये १० सेंमी अंतर ठेवून पुनर्लागवड करावी. 
४) पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी नत्र खताचा पहिला हप्ता ३५ किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात द्यावा. 
५) नत्र खताचा दुसरा हप्ता ३५ किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. 
६) पुनर्लागवडीनंतर ४०-६० दिवसांनी खुरपणी करावी. 
७) फूलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी वर दिलेल्या रांगडा कांद्याच्या नियोजनाप्रमाणे फवारणी घ्यावी. 
८) फवारणीद्वारे सूक्ष्मद्रव्ये ५ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ४५, ६० आणि ७५ दिवसांनी घ्यावी. 

 
१) लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी सूक्ष्मद्रव्ये फवारणीद्वारे ५ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात द्यावी. 
२) फूलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी वर दिलेल्या रांगडा कांद्याच्या नियोजनाप्रमाणे फवारणी घ्यावी. 
३) लागवडीनंतर नत्र खताचा पहिला हप्ता २५ किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात ३० दिवसांनी, तर दुसरा हप्ता याच प्रमाणात ४५ दिवसांनी द्यावा. 
४) लाल कोळीचा प्रादुर्भाव आढळल्यास गंधक २ ग्रॅम प्रतिलिटर किंवा डायकोफॉल २ मिली प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करावी. 
५) लागवडीनंतर ११०-११५ दिवसांपर्यंत पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे. 

१) लागवडीनंतर ४०-६० दिवसांनी खुरपणी करावी. 
२) फूलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी वर दिलेल्या रांगडा कांद्याच्या नियोजनाप्रमाणे फवारणी घ्यावी. 
३) लागवडीनंतर नत्र खताचा पहिला हप्ता ३० दिवसांनी ३० किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात द्यावा. दुसरा हप्ता याच प्रमाणात ४५ दिवसांनी द्यावा. 
४) लागवडीच्या ८० दिवसांनंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या करू नयेत, कारण त्यानंतर फुले उमलण्यास सुरवात होते व मधमाश्यांना हानी पोचते. 
५) पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर हे १० ते १२ दिवस इतके ठेवावे. 

संपर्क – ०२१३५ – २२२०२६ 
(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे.) 

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »