भाजीपाला सल्ला जानेवारी

0

भाजीपाला सल्ला

महाराष्ट्रात सध्या सौम्य थंडी, तसेच कोरड्या हवामानामुळे भाजीपाला पिकावर रस शोषणाऱ्या किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 

वाटाणा - 
– वाटाण्यावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, सायपरमेथ्रीन (२५ ईसी) ५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
– मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड ५ मि.लि. अधिक भुरी नियंत्रणासाठी गंधक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. 

टोमॅटो - 
– टोमॅटो पिकास ताटीचा आधार द्यावा. 

टोमॅटोवर करपा व फळसड दिसून आल्यास, जमिनीवर पडलेली रोगग्रस्त पाने, फळे गोळा करून व्यवस्थित जाळून नष्ट करावीत. ती बांधावर अथवा प्लॉट शेजारी टाकू नयेत. 
रोगनियंत्रणासाठी, (फवारणी प्रमाण प्रति १० लिटर पाणी) 
– मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १० मि.लि. 
– पुढील फवारणी गरजेनुसार १०-१५ दिवसांच्या अंतराने करावी. 
– फळसड आणि उशिरा येणाऱ्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, 
वरील बुरशीनाशकाव्यतिरिक्त मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २५ ग्रॅम किंवा स्ट्रेप्टोमायसीन एक ग्रॅम अधिक कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 

मिरची - 
या पिकावर सध्या बोकड्या (लिफ कर्ल), फळसड / डायबॅक (फांद्या वाळणे), पानांवरील ठिपके इ. रोग आढळून येत आहेत. नियंत्रणासाठी, 
फिप्रोनील १५ मि.लि. किंवा थायामेथोक्झाम ४ ग्रॅम किंवा फेनपायरॉक्झिमेट (५ ईसी) १० मि.लि. किंवा फेनाक्झाक्वीन (१० ईसी) २० मि.लि. या पैकी एक कीटकनाशक 
अधिक मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम किंवा डायफेनकोनॅझोल १० मि.लि. या पैकी एक बुरशीनाशक प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी घ्यावी. 
– पुढील फवारणी आवश्यकतेनुसार १० दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी. 

कोबी / फुलकोबी - 
१) करपा (ब्लॅक लिफ स्पॉट) – या रोगाचा दिसून आल्यास, मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. 
२) घाण्या रोग (ब्लॅक रॉट) हा जिवाणूजन्य रोग आढळल्यास, त्याच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन एक ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी. 
३) कोबी पिकामध्ये चौकोनी ठिपक्याचा पतंगाच्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यावर 
– पहिली फवारणी बॅसिलस थुरिन्जियान्सिस १० ग्रॅम प्रति १० लिटर या प्रमाणे करावी. 
– पुढे आवश्यकतेनुसार, स्पिनोसॅड (२.५ एससी) १० मि.लि. किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) २ मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) १० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 

संपर्क – ०२४२६-२४३३४२ 
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प -भाजीपाला पिके, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »