भाजीपाला पिकांची काळजी अशी घ्या December work

0

*डिसेंबर शेतीची कामे (भाग ४)*

💢 *भाजीपाला पिकांची काळजी अशी घ्या:*💢

🌰कांदा 🌰
रब्बी उन्हाळी कांद्याची लागवड पूर्ण करावी. त्यासाठी फुले सुवर्णा,एन-२-४-१, पुसा रेड, फुले सफेद, या जाती वापराव्यात. रब्बी कांदा लागवडीस महिना झाला असल्यास नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी ५० किलो प्रमाणे  द्यावा. करपा रोगाचे नियंत्रणासाठी डायथेन एम-४५, १२५० ग्रँम ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाबरोबरच किडीपासून संरक्षण करावयाचे असल्यास त्यातच ५ % निंबोळी अर्क अथवा  मँलेथिऑन ५० इ.सी. ५०० मि.ली. अथवा क्विनॉलफॉस २५ इ.सी. ६०० मि.ली अथवा मोनोक्रोटोफॉस ३५ डब्ल्यू.एस.सी. ५५० मि.ली. यापैकी आलटून पालटून एक एक किटकनाशक प्रतिहेक्टरी ५०० लिटर पाण्यात ५०० मि.ली. स्टीकर मिसळून १० ते १२ दिवसांच्या अंतराने फवारावे.

*कोबी, फुलकोबी, ब्रोकोली*

या पिकांमध्ये चौकोनी ठिपक्‍याच्या पतंगाचा प्रादुर्भाव होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजनेचा अवलंब करावा. लागवडीपूर्वी मुख्य पिकाच्या २५ ओळीनंतर २ ओळी मोहरीच्या पेराव्यात. त्याच प्रमाणे शेताच्या बांधावरही मोहरी पेरावी. शेतात पक्षी बसण्यासाठी पक्षीथांबे लावावेत. ते किडीचा फडशा पाडतात. एकरी ५ गंध सापळे लावावेत. मोहरीवर अळ्या दिसू लागताच, डायक्‍लोरव्हॉस १० मि.लि. प्रति १० लिटर प्रमाणे फवारणी करावी. कोबी पिकावर पहिली फवारणी २ अळ्या प्रति रोप दिसू लागताच बी.टी. जिवाणूवर आधारित कीटकनाशक १० ग्रॅम प्रति १० लिटर प्रमाणे संध्याकाळी करावी. त्याच प्रमाणे ट्रायकोग्रामा बॅक्‍ट्री कीटक हेक्‍टरी १ लाख या प्रमाणात सोडावेत. दुसरी फवारणी निंबोळी अर्क ४ टक्के, तिसरी फवारणी इंडोक्‍झाकार्ब १० मि.लि. किंवा स्पिनोसॅड (२.५ एस.सी.) १० मिली प्रति १० लिटर प्रमाणे करावी. चौथी फवारणी ४ टक्के निंबोळी अर्काची करावी.

🔘 *बटाटा*🔘
खंदणी करून भर  द्यावी. नत्र खताचा दुसरा हप्ता हेक्टरी ५० किलो द्यावा.

🍅 *टोमँटो*🍅
झाडांना आधार देण्याचे काम पूर्ण करावे. नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी ५० किलो  द्यावा. फळ पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी पाच ट्रायकोकार्ड शेतात लावावी अथवा २५० एच.एन.पी.व्ही. विषाणूग्रस्त आळ्यांचे द्रावण प्रती हेक्टरी फवारावे अथवा क्लोरो डस्ट १.५% पावडर , ४५ ग्रँम, १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ %, २१ मि.ली.१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानावरील ठिपका रोगनियंत्रणासाठी बाविस्टीन ०.१% फवारावे.

🍆 *वांगी*🍆
शेंडा व फळे पोखरणारी अळी, तुडतुडे, मावा आणि फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी पाच ट्रायकोकार्ड प्रती हेक्टरी लावावी. तसेंच १० ते १५ हजार क्रायसोपर्ला कार्नियाच्या आळ्या प्रती हेक्टरी सोडाव्यात अथवा इमामेक्टिन बेंझोएट ४ ग्राम किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ %, १४ मि.ली. क्लोरो डस्ट १.५% पावडर , ३० ग्रँम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नत्र खताचा दुसरा हप्ता हेक्टरी ५० किलो प्रमाणे द्यावा.

🔘 *वाटाणा*🔘
लागवडीसाठी बोनोव्हील, अर्केल, सिलेक्शन ८२, सिलेक्शन ९३, खापरखेडा या जाती वापराव्यात. लागवड पूर्ण करा. लागवडीपूर्वी रायझोबियम व स्फुरद जीवाणूची प्रत्येकी २५० ग्रँम प्रती दहा किलो बियाण्यावर बिजप्रक्रीया करा. शेंग पोखरणारी अळी व मावा यांचा बंदोबस्त करावा. यासाठी एच.एन.पी.व्ही. ग्रस्त २५० अळ्यांचे द्रावण प्रती हेक्टरी फवारावे व माव्यासाठी १० ते १५ हजार क्रायसोपर्ला कार्नियाच्या आळ्या हेक्टरी सोडाव्यात अथवा मिथिल डिमेटॉन २५ %, ८ मि.ली. किंवा डायमेथोएट ३० %, १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रब्बी पालेभाज्यांची लागवड पूर्ण करावी. *मिरची, गवार, टोमँटो इ.* पिकांवरील भुरी रोग नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारा गंधक २५० ग्रँम अधिक कॉपर ऑक्झिक्लोराईड २५० ग्रँम किंवा हेकझाकोनाझोल १५० मिली १०० लिटर पाण्यातून ८ ते १० दिवसांचे अंतराने फवारावे.

*भोपळावर्गीय भाज्या तसेंच कोबी, कॉलीफ्लॉवर* यावरील केवडा रोग नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड २५० ग्रँम या बुरशीनाशकाची प्रति १०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.भाजीपाला पिकावरील करपा रोग नियंत्रणासाठी दर १० दिवसाचे अंतराने कॉपर ऑक्झिक्लोराईड २५० ग्रँम प्रति १०० लिटर पाण्यातून फवारावे. तसेच विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासाठी रोगट झाडे उपटून त्यांचा नाश करावा. त्याचप्रमाणे रोगप्रसार करणा-या किडींच्या नियंत्रणासाठी क्विनोलफोस १५० मि.ली. ची वरील बुरशीनाशकात मिसळून फवारणी करावी.
✍🏻Source:
​​संकलन-इरफ़ान शेख​​
*​​​​होय आम्ही शेतकरी​​​​*
​​​​महाराष्ट्र राज्य​​​​

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »