हरभरा लागवड तंत्रज्ञान भाग – २
हरभरा लागवड तंत्रज्ञान-:
( भाग – २ )
हरभरा जाती :
१) बीडीएन-९-३:
लवकर तयार होणारा, पाण्याचा तान सहन करणारा, मर रोग प्रतिकारक, दाणा लहान.
कालावधी-: १०० ते १०५ दिवस.
उत्पादन-: १०- ११क्विं/ हेक्टरी. ( जिरायती )
१८-२०क्विं/ हेक्टरी.
( बागायती )
२) बीडीएनजी- ७९७ ( आकाश )
पिवळसर टपोरे दाणे, कोरडवाहुसाठी उत्तम.
कालावधी-: १०५ ते ११० दिवस.
उत्पादन-: १८- २४ क्विं/ हेक्टरी.
( जिरायती )
३) विजय-:
पाण्याचा तान सहन करणारा, मर रोग प्रतिकारक, जिरायती व बागायतीसाठी योग्य, उशिरा पेरणीसाठी शिफारस, दाणे टपोरे.
कालावधी-: ११० ते ११५ दिवस
उत्पादन -: १५ ते १८ क्विं/ हेक्टरी.
४) विशाल-:
दाणे टपोरे, बागायती व कोरडवाहुसाठी योग्य.
कालावधी-: ११० ते ११५ दिवस.
उत्पादन-: १५- २०क्विं/ हेक्टरी.
( जिरायती )
२०-२५क्विं/ हेक्टरी.
( बागायती )
५) दिग्विजय-:
दाणे मध्यम आकाराचे. बागायती व कोरडवाहु साठी योग्य.
कालावधी-: १०५ ते ११० दिवस.
उत्पादन-: १४- १५क्विं/ हेक्टरी.
( जिरायती )
३०-३५क्विं/ हेक्टरी.
( बागायती )
६)जाकी-:
टपोरे दाणे, मर रोगास प्रतिकारक.
कालावधी-: १०५ ते ११० दिवस.
उत्पादन-: १८- २०क्विं/ हेक्टरी.
७)फुले जी- १२ ( विश्वास )
घाटे लांब मोठे, हिरवा हरभरा म्हणुन चांगला.
कालावधी-: १०५ ते ११० दिवस.
उत्पादन-: २५ ते ३०क्विं/ हेक्टरी.
( बागायती )
या प्रमाणे आपल्या जमिनीनुसार योग्य जातीची निवड करावा.
Source:
– बाबु येवले.
( Bsc. Agri )