किडनाशक स्वरूपे ad

0

कीडनाशक स्वरूपे
    *****************

    (Pesticide formulations) :—
    **************************

**स्वरूप म्हणजे काय ? :—
   *******************

सक्रीय घटकाचे वापरण्यास तयार औषध बनविण्यासाठी एक अथवा अनेक (वाहक आणि शुष्कक) पदार्थांबरोबर केलेले मिश्रण म्हणजेच स्वरूप होय.

किटकनाशक/बुरशीनाशक/तणनाशक स्वरूप निर्मिती खालील गोष्टी साधण्यासाठी आवश्यक असते.

1)सक्रीय घटकाची कीड/रोग/तण नियंत्रणासाठी अतिशय कमी मात्रा प्रति हेक्टरी लागते.

अशी मात्रा एकसारख्या प्रमाणात दिली जाण्यासाठी त्याची सौम्य स्वरूपात निर्मिती करणे फायद्याचे ठरते.

2)विषबाधकतेपासून होणारे धोके कमी करण्यासाठी.

3)पिकांवर औषधाचे प्रमाण जास्त झाल्यास त्याच्या दाहकतेमुळे ते होरपळून/करपून जाऊ नये म्हणून.

4)स्वरूप निर्मिती केलेली औषधे वाहतुकीस तसेच हाताळण्यास सुलभ असतात.

5)स्वरूपनिर्मिती करताना औषधामध्ये वापरले जाणारे पदार्थ

जसे—

वाहक, पायसीकारक, शुष्कक, विऊर्णीकारक, चिकटणारे इ.

त्यांची परिणामकारकता वाढवण्यास मदत करतात.

स्वरूपनिर्मिती करताना सक्रिय घटकाचे भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यासाठी वापरल्या जाणार्या पदार्थांना अॅडज्युव्हंट (Adjuvant)  अथवा भरणारा पदार्थ (Filler material) म्हणतात.

यामध्ये सर्वसाधारणपणे विऊर्णीकारक, वाहक, द्रावक, स्थिरक, घट्ट करणारे, अपस्करणी, चिकटविणारे, पायसीकारक, शुष्कक, पसरविणारे

आदि पदार्थांचा वापर केला जातो.

ऊदा.–

सायपरमेथ्रिन 25% ई.सी.च्या 1 लि. औषधामध्ये फक्त 250 मिली सायपरमेथ्रिन सक्रिय घटक असतो.

उरलेले 750 मिली अॅडज्यूव्हंट/भरणारा पदार्थ असतात.

मॅन्कोझेब 75% डब्ल्यू.पी.च्या एक किलो औषधामध्ये 750 ग्रॅम मॅन्कोझेब सक्रिय तत्त्व असते.

इतर 250 ग्रॅम भरणारा पदार्थ/अॅडज्युव्हंट असतात.

किटकनाशकाची/बुरशीनाशकाची/तणनाशकाची परिणामकारकता ही प्रामुख्याने सक्रिय/क्रियाशील घटकावरच अवलंबून असते.

याशिवाय अॅडज्यूव्हंट (भरणारा पदार्थ) औषधाची परीणामकारकता वाढविण्यास खालीलप्रमाणे मदत करतात.

***Defloculating agents
     **********************   

     (विऊर्णीकारक):—
     *************

विऊर्णीकारक पदार्थाच्या वापरामुळे घणकणांच्या गुठळ्या होण्यास

किंवा

तळाशी साचा होण्यास

प्रतिबंध होतो.

***Carriers (वाहक) :—
    *****************

ही संज्ञा निष्क्रीय घन पदार्थ दर्शविते.

मूळ पदार्थ सौम्य करण्यासाठी सर्वसाधारणपणे कोरड्या स्वरूपात वाहक/वाहके वापरली जातात.

**Stickers (चिकटविणारे) :—
   **********************

औषधाची फवारणी केलेल्या पृष्ठभागावर चिकटून राहण्याची क्षमता वाढविते.

**Emulsifiers (पायसीकारक) :—
   **************************

तेलाचे पाण्यातील विलंबन स्थिर करते.

**Stabillizers (स्थिरक) :—
   *********************

औषधाचे विघटन होण्यास प्रतिबंध करून आहे त्याच स्थितीत ठेवण्यास मदत करते.

**Spreaders (पसरविणारे) :—
   ***********************

फवारणी केलेल्या पृष्ठभागावर औषध एकसारखे पसरविण्यास मदत करते.

**Solvents (द्रावक) :—
   *****************

सर्वसाधारणपणे क्रियाशील घटक विरघळविण्यासाठी याचा वापर केला जातो.

**Thickners (घट्ट करणारा) :—
   *************************

द्रावणाची विष्यादिता (Viscosity) बदलण्यासाठी वापरतात.

**Dispersing agents
   *******************

   (अपस्करणी पदार्थ) :—
   *****************

फवारणी द्रावणात औषधाची एकसारखी तरंगकारकता वाढविण्यास मदत करते.

**Diluents (शुष्कक) :—
   ******************

सक्रीय घटकाची दाहकता कमी करण्यास मदत करते.

1968 च्या कीटकनाशक कायद्यानुसार भारत सरकारची केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती, (Central Insecticide Board & Registration Committee) फरिदाबाद (नवी दिल्ली) ही संस्था कीटकनाशक, बुरशीनाशक व तणनाशकांची नोंदणी करते व येथे नोंदणी झाल्यानंतरच उत्पादने विक्रीसाठी खुली केली जातात.

या संस्थेने पीक संरक्षणासाठी नोंदणीकृत केलेली काही स्वरूपे खाली दिली आहेत.

1) Aqua flowable
    ***************

   (पाण्यात प्रवाहीकारक) :—
    *******************

उदा.–

क्विनाॅलफाॅस 25% ए.एफ.

2) Dustable powder
    ******************

   (धुरळणीची भुकटी) :—
    ****************

उदा.–

मिथाईल पॅराथिऑन 2% भुकटी.

3) Powder for dry seed treatment)
    ********************************

   (कोरड्या बीजप्रक्रियेसाठी भुकटी) :—
    ****************************

उदा.–

कार्बोसल्फान 25% डि.एस.

  

4) Emulsifiable concentrate
    **************************

   (प्रवाही डाई पायसोकारक) :—
    ***********************

उदा.–

डायमिथोएट 30% ई.सी.,
ऑक्सीफ्लोरफेन 23% ई.सी.

5) Granules (दाणेदार) :—
    *******************

उदा.–

फोरेट 10% जी.,
कार्बोफ्युराॅन 3% जी.

6) Suspension concentrate
    **************************

   (प्रवाही डाई तरंगकारक) :—
   *********************

उदा.–

हेक्झाकोनॅझोल 5% एस.सी.,
इंन्डोक्झाकार्ब 14.5% एस.सी.

7) Soluble liquid (विद्राव्य द्रवरूपी) :—
    *******************************

उदा.–

इमिडॅक्लोप्रिड 20% एस.एल.,
झायरम 27% एस.एल.

8) Water soluble powder
    ***********************

    (पाण्यात विद्राव्य भुकटी) :—
     *********************

उदा.–

अॅसिफेट 75% एस.पी.,
अॅसिटॅमिप्रिड 20% एस.पी.

9) Water dispensable grannules
    *******************************

    (पाण्यात अपस्कारक दाणेदार) :—
     **************************

उदा.–

थायोमिथाॅक्झाम 25% डब्ल्यू.जी.

10) Water dispensable powder for
       *******************************
  
       slurry seed treatment
       ***********************

       (पातळ मिश्रणशील बीजप्रक्रियेसाठी
        *****************************

        पाण्यात अपस्कारक भुकटी) :—
        ************************

उदा.–

इमिडॅक्लोप्रिड 70% डब्ल्यू.एस.,
थायोमिथोक्झाम 70% डब्ल्यू.एस.

11) Water dispensable powder
       ***************************

       (पाण्यात अपस्कारक भुकटी) :—
        ************************

उदा.–

कार्बारिल 50% डब्ल्यू.डि.पी.

कोणत्या परिस्थितीत कोणती स्वरूपे वापरावीत हे स्थानिक परिस्थितीवर, पिकाच्या व किडीच्या प्रकारावर अवलंबून असते.

कोणतेही एक स्वरूप सर्व ठिकाणी वापरता येत नाही.

उदा.–

ऊसाचे पीक दाट व उंची जास्त असल्यामुळे फवारणी करणे कठीण जाते.

म्हणून लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी बहुसंख्य शेतकरी धुरळणीची भुकटी वापरताना दिसतात.

जेथे पाण्याची कमतरता असते तेथे धुरळणीची भुकटी वापरणे अपरिहार्य ठरते.

जमिनीतील कीड व रोग नियंत्रणासाठी दाणेदार, धुरीजन्य तसेच बीजप्रक्रिया स्वरूपांचा वापर केला जातो.

फळझाडे, भाजीपाला पिके, फुलझाडे, कापूस, कडधान्य, तेलबिया इ. पिकांमध्ये फवारणी करणे सुलभ असल्यामुळे या पिकांमध्ये फवारणीच्या स्वरूपांचा

(प्रवाही डाई पायसोकारक, प्रवाही डाई तरंगाकारक, विद्राव्य द्रवरूपी, पाण्यात विद्राव्य भुकटी, पाण्यात अपस्कारक दाणेदार, पाण्यात अपस्कारक भुकटी, आर्द्रणीय भुकटी)

वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

साठविलेल्या धान्यावरील किडीचे नियंत्रण करण्यासाठी धुरीजन्य औषधांचा वापर करावा लागतो.

कारण इतर स्वरूपे वापरल्यास त्यांचे अवशेष त्यामध्ये शिल्लक राहून नंतर ते धान्य खाणार्यास त्यापासून अपाय होण्याचा धोका असतो..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »