वनविभागीय अधिकारी कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने कोल्ह्याला दिले जीवदान

0

उत्तम आवारे : वाकी बुद्रुक येथे पाण्याची भटकती करताना कोल्हा विहिरीत पडला. तर वन विभागीय अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांच्या मदतीने कोल्ह्याला दिले जीवदान.

चांदवड पिण्याच्या पाण्यासाठी भटकती करीत असताना कोल्हा चांदवड तालुक्यातील पांडुरंग दामोदर जगताप वाकी बुद्रुक येथील मालकी हक्क शेतातील शेत गट नं. 432/अ येथील विहिरीत रात्रीच्या सुमारास पाण्यात पडला.
शेतमालक हा आज दिनांक 12 जून 2023 रोजी सकाळी 10: वा. विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर चालू करण्यासाठी गेला असता . त्यास विहिरीत कोल्हा पडल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी समाजसेवक श्री भागवत झाल्टे कातरवाडी कर यांना संपर्क केला व त्यांनी वनरक्षक नवनाथ भिन्नर यांच्याशी संपर्क साधला.

त्यावरून वन विभागाचे अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक व वन मजूर हे घटनास्थळी जाऊन कोल्यास पिंजरा लावून बाहेर काढण्यात आले. मात्र कोल्हा वन कर्मचारी व अधिकारी यांच्या हातातून जवळच असलेल्या वन अधिवासात पळ काढून निघून गेला.

यावेळी वनरक्षक नवनाथ बिन्नर वाहनचालक सुनील बुरक भाऊसाहेब झाल्टे अंकुश गुंजाळ पुष्पक जगताप साहेबराव पोळ पोलीस पाटील बनीचंद गीते किशोर जगताप शिवाजी जगताप विक्रम जगताप दत्ताभाऊ वाकचौरे दिलीप जगताप श्रावण शिंदे भाऊसाहेब गीते ज्ञानेश्वर जगताप समाजसेवक भागवत झाल्टे यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »