Turmeric Market : हिंगोली, वसमतमध्ये हळद दरात वाढ
Turmeric Rate : अनेक महिन्यानंतर हळदीच्या दरात सुधारणा झाल्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला आहे
Hingoli News : जिल्ह्यातील हळदीच्या प्रमुख बाजारपेठा असलेल्या हिंगोली व वसमत कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील हळद दरात तेजीचे संकेत दिसत आहेत. अनेक महिन्यानंतर हळदीच्या दरात सुधारणा झाल्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
हिंगोली बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये शनिवारी (ता.२४) हळदीची २००० क्विंटल आवक झाली. दर किमान ६६०० ते कमाल ७८०० रुपये तर सरासरी ७२०० रुपये मिळाले.
शुक्रवारी (ता.२३) १८७५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६८०० ते कमाल ७९०० रुपये तर सरासरी ७३५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.२२) हळदीची २५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७३०० ते कमाल ८५०० रुपये तर सरासरी ७९०० रुपये दर मिळाले.
बुधवारी (ता.२१) हळदीला २५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६८०० ते कमाल ८३०० रुपये तर सरासरी ७५५० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता.२०) हळदीची ३००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६६०० ते कमाल ८००० रुपये तर सरासरी ७३०० रुपये दर मिळाले.
वसमतमध्ये कमाल ९२०० रुपये दर
वसमत बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता.२३) हळदीची २७८५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल किमान ६६५५ ते कमाल ९२०० रुपये तर सरासरी ७९२७ रुपये मिळाले. बुधवारी (ता.२१) हळदीची २४१६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५०११ ते कमाल ८१०५ रुपये तर सरासरी ६५६८ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता.२०) हळदीची २४२३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६४५० ते कमाल ८५०० रुपये तर सरासरी ७४७५ रुपये दर मिळाले.
पाऊस लांबल्यामुळे हळदीचे लागवड क्षेत्र कमी झाले आहे. आगामी काळात पाऊस कमी राहिला तरउत्पादकतेत घट येऊ शकते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या दरात सुधारणा होत आहे. आगामी काळात दरात आणखी तेजी येऊ शकते.
धन्यवाद
🙏🙏🙏