दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी ” गुणगौरव सोहळा – २०२३ संपन्न….
कैलास सोनवणे दिघवद :सकल मराठा परीवार तसेच मेरिट होल्डर क्लासेस ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि राजश्री छत्रपती शाहू कनिष्ठ महाविद्यालय ह्यांच्या सौज्यन्याने आज दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी ” गुणगौरव सोहळा – २०२३ संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये मराठा समाज बांधवांच्या १० व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व त्यांच्यावर परिश्रम करणाऱ्या पालकांचा गुण गौरव सोहळा सकाळी १0 वाजता शुभेच्छा लॉन्स, म्हसरूळ, दिंडोरी रोड,नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला होता ह्यासाठी श्री गणेश तुकाराम गाढवे पाटील (राज्य कर निरीक्षक) श्री दिनेश कदम (सकल मराठा परीवार) हिमानी प्रशांत पाटील (प्रेसिडेंट, राजश्री छत्रपती शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालय नाशिक) ह्यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याची गरज आहे .हे वर्ष मुलांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असतात त्याची तयारी करताना पूर्ण योगदान देणे गरजेचे आहे असे मत सकल मराठा परीवार चे दिनेश कदम यानी मांडले या निमित्ताने मान्यवरांनी विद्यार्थी व पालक वर्गाला आपले मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच बदलणारी शिक्षव्यवस्था यावर राजश्री छञपती शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशांत पाटील यांनी माहिती दिली.
सदर कार्यक्रमास मराठा समाज बांधव ,विद्यार्थी पालक ह्यांनी उपस्थिती दर्शवली.याप्रसंगी सकल मराठा परीवार चे पदाधिकारी,पालक उपस्थित होते