Goat Farming : नवजात करडांच्या वजनावर कसं ठेवणार लक्ष?

0
goat baby

Goat Farming : नवजात करडांच्या वजनावर कसं ठेवणार लक्ष?

गाभण शेळीस गाभणकाळाच्या ९० दिवसांनंतर जादा खुराक देण्याची गरज असते. गाभणकाळाच्या शेवटच्या ३ ते ४ आठवड्यांमध्ये गर्भाशयातील पिलांच्या उत्तम वाढीसाठी उत्तम प्रतीच्या चाऱ्याबरोबरच दररोज २५० ते ३५० ग्रॅम खुराक द्यावा.
Goat Farming : शेळीपालनातील नफ्याचे प्रमाण हे करडांच्या संख्येवर, मरतुकीच्या प्रमाणावर अवलंबून असते. करडांच्या (Kid) वाढीच्या वयाचे जन्मापासून दोन महिने वय, दोन ते चार महिने वय आणि चार ते सहा महिने वय असे साधारण तीन टप्पे असतात.
जन्मानंतर लगेच शरीर वजनाच्या नोंदीवरून करडे अशक्त आहेत का सशक्त आहेत, याचा अंदाज बांधता येतो. चांगल्या वजनाची, सशक्त करडं जन्मण्यासाठी शेळीच्या गाभणकाळात योग्य व्यवस्थापन करावे.
गाभण शेळ्यांना सहज पचणारा चारा, योग्य प्रमाणात पशुखाद्य द्यावे. या आहारातील पोषणमूल्यांचा वापर गर्भाच्या वाढीसाठी; तसेच शेळीच्या शरीरातील पोषणूल्यांचा साठा वाढविण्यासाठी होतो.
जसजसे विण्याची तारीख जवळजवळ येईल तसतसे चाऱ्याव्यतिरिक्त पोषणमूल्यांच्या पुरवठ्यासाठी अधिक खुराकाचा पुरवठा करावा. गाभण शेळीस गाभणकाळाच्या ९० दिवसांनंतर जादा खुराक देण्याची गरज असते.
गाभणकाळाच्या शेवटच्या ३ ते ४ आठवड्यांमध्ये गर्भाशयातील पिलांच्या उत्तम वाढीसाठी उत्तम प्रतीच्या चाऱ्याबरोबरच दररोज २५० ते ३५० ग्रॅम खुराक द्यावा. विशेषतः जुळे किंवा तिळे देणाऱ्या शेळीची गाभणकाळात जास्तीची काळजी घ्यावी.
शेळीच्या गाभणकाळातच योग्य ती काळजी घेतल्यामुळे जन्मणारी करडं ही सशक्त, वजनदार, चपळ जन्मतात. या करडांची वाढही झपाट्याने होते.नवजात करडांची जन्मानंतर तत्काळ घ्यावयाची काळजी
१) जन्मानंतर पहिल्या २४ तासांत करडांची विशेष काळजी घ्यावी लागते. यावेळी क रडांना जास्त ऊर्जेची गरज असते. नवीन वातावरणातील बदलाशी जुळवून घेणे महत्त्वाचे असते.
२) सर्वसाधारणपणे शेळी व्यायल्यानंतर तिच्या पिलास चाटून स्वच्छ व कोरडे करते. जन्मानंतर पहिल्या २० मिनिटांत करडे उभे राहून दूध पिण्यासाठी प्रयत्न करतात.
करडांची नाळ २ ते ३ इंच अंतरावर निर्जंतुक कात्री किंवा ब्लेडने कापून त्यास टिंक्‍चर आयोडीन किंवा जंतुनाशक लावावे. म्हणजे नाळेमधून जंतुसंसर्ग होणार नाही, करडू आजारी पडून दगावणार नाही.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »